Dagadojirao Deshmukh D. Pharmacy College, Almala,

Dagadojirao Deshmukh D. Pharmacy College, Almala, Established in 2006
Approved by PCI, New Delhi , DTE Mumbai and Affiliated to MSBTE, Mumbai.

निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट योगदानाबद्दल विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानशैक्षणिक क्ष...
15/05/2026

निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट योगदानाबद्दल विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक, प्रशासकीय आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय योगदान देणाऱ्या विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला या संस्थेचा लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ या निवडणुकांसाठी मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यात संस्थेने मोलाची भूमिका बजावली.

निवडणूक प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, प्रशस्त सभागृह, तांत्रिक साधने, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच इतर सर्व मूलभूत बाबी संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक विभागाचे प्रशिक्षण नियोजनबद्ध, सुरळीत आणि यशस्वीरित्या पूर्ण झाले. संस्थेच्या या उल्लेखनीय सहकार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संस्थेला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेवजी खिचडी सर, शिवलिंगेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे, विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे तसेच दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास…
‎Read more
[15/05/26, 5:06:10 PM] Prashant Dharashive: निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट योगदानाबद्दल श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

आलमला, प्रतिनिधी :
शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक, प्रशासकीय आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय योगदान देणाऱ्या श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला या संस्थेचा लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ या निवडणुकांसाठी मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यात संस्थेने मोलाची भूमिका बजावली.

निवडणूक प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, प्रशस्त सभागृह, तांत्रिक साधने, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच इतर सर्व मूलभूत बाबी संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक विभागाचे प्रशिक्षण नियोजनबद्ध, सुरळीत आणि यशस्वीरित्या पूर्ण झाले. संस्थेच्या या उल्लेखनीय सहकार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संस्थेला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेवजी खिचडे सर, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे, विश्वेश्वरय्या इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी कॉलेजचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे तसेच दगडोजीराव देशमुख डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास कापसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सन्मान लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय दंडाधिकारी अविनाश कोरडे तसेच तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला.

विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता समाजहिताच्या विविध उपक्रमांत सातत्याने कार्यरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, करिअर मार्गदर्शन शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण कार्यक्रम, पर्यावरण जनजागृती तसेच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन अशा विविध सामाजिक उपक्रमांमुळे संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संस्थेअंतर्गत कार्यरत शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, विश्वेश्वरय्या इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी आणि दगडोजीराव देशमुख डी फार्मसी महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, तांत्रिक कौशल्य आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन देण्याचे काम संस्थेमार्फत प्रभावीपणे केले जात आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत दिलेले योगदान आणि समाजाभिमुख कार्यामुळे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचा हा सन्मान संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. विविध मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून आगामी काळातही अशाच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Celebration of Ambedkar Jayanti at DDDP, Almala. Students gathered to pay heartfelt tribute to Dr. B. R. Ambedkar, the a...
14/04/2026

Celebration of Ambedkar Jayanti at DDDP, Almala. Students gathered to pay heartfelt tribute to Dr. B. R. Ambedkar, the architect of the Indian Constitution and a great leader who dedicated his life to equality, justice, and social empowerment.
The program included a floral tribute, remembrance of his inspiring thoughts, and a brief discussion on his vision for education and social reform. Such occasions inspire us to follow his ideals and contribute towards building an inclusive and progressive society. 🌼📘

02/03/2026

Mental Health Awareness 🧠😔
Shoot And Edit :-

मराठी भाषा गौरव दिन ❤️🚩
27/02/2026

मराठी भाषा गौरव दिन ❤️🚩

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!🧡👑🚩
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!🧡👑🚩

From roots to rhythm.......❤️Pride in every step, India in every beat 🔥✨
16/02/2026

From roots to rhythm.......❤️
Pride in every step, India in every beat 🔥✨

The rhythm of Shiva, the roar of Tandav 🕉️🔱
16/02/2026

The rhythm of Shiva, the roar of Tandav 🕉️🔱

Back to the golden era 🪩
16/02/2026

Back to the golden era 🪩

Colour Day🌈🤍💫
11/02/2026

Colour Day🌈🤍💫

Proud of the effort, proud of the team❤️ .🏐🔥  Volley Cup  ⚡
10/02/2026

Proud of the effort, proud of the team❤️
.🏐🔥
Volley Cup ⚡

10/02/2026

https://youtube.com/live/C7EOuwKtVvY

🔥🏐✨ !! अकराव्या राज्यस्तरीय फार्मा व्हॉली कप 2026 – उद्घाटन सोहळा !! ✨🏐🔥
🏫 शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी
🤝 दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज
यांच्या संयुक्त विद्यमाने
🎉 ‘अकराव्या राज्यस्तरीय फार्मा व्हॉली कप 2026’ 🎉 या भव्य व थरारक स्पर्धेचे आयोजन
📅 दि. 10/02/2026 ते 11/02/2026
🕙 वेळ : सकाळी 10:00 वा.
📍 ठिकाण : विश्वेश्वर संकुल, आलमला
📡🎥 उद्घाटन समारंभ व सर्व सामने LIVE पाहा 👇👇
🔴📺 YouTube Live Link📍 :
👉 https://youtube.com/live/C7EOuwKtVvY�

🏛️ श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला (ता. औसा, जि. लातूर).
👏🔥 खेळाडूंना प्रोत्साहन द्या | व्हॉलीबॉलचा जल्लोष अनुभव घ्या 🔥👏
📢 सर्वांनी लाईव्ह पाहा व शेअर करा! 🚀

Address

Latur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dagadojirao Deshmukh D. Pharmacy College, Almala, posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dagadojirao Deshmukh D. Pharmacy College, Almala,:

Share