Bhanudasrao Chavan College Lohara

Bhanudasrao Chavan College Lohara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhanudasrao Chavan College Lohara, College & University, https://goo. gl/maps/Wb1Aj8ivmNbRFPTWA, Lohara.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यनाने आयोजित '...
11/11/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांच्या संयुक्त विद्यनाने आयोजित 'धाराशिव जिल्हा झोनल आंतरमहाविद्यालीन क्रीडा स्पर्धा ' मध्ये भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
1.ओमकार सगर... 100m रनिंग प्रथम
2. धम्मदीप कांबळे.... थाळी फेक.... प्रथम
3.अमर जाधव... भाला फेक.....प्रथम
....... लांब उडी.... तृतीय
4.ओमकार सगर, धम्मदीप कांबळे, अमर जाधव, सौरभ साळुंके, सम्यक सुरवसे..... 4×100 रिले.... प्रथम
5.प्रथमेश पाटील... 20 km चालणे....
6.सुजाता पवार.... 800m रनिंग... द्वितीय
वरील सर्व खेळाडूंची 'विद्यापीठ केंद्रीय झोनल ' स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी भव!
सर्वांचे अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!

जिल्हा युवा महोत्सवात भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे घवघवीत यश...डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभ...
12/09/2025

जिल्हा युवा महोत्सवात भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे घवघवीत यश...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर आयोजित जिल्हा युवा महोत्सव जवाहर महाविद्यालय, अणदूर येथे 08 व 09 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. युवा महोत्सवामध्ये भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील संघांनी सुगम गायन, समूह गायन, मूक अभिनय, वक्तृत्व अशा विविध कला प्रकारांमध्ये भाग घेतला होता यामध्ये सुगम गायन या कलाप्रकारात कु. संस्कृती (B.Sc.F.Y.) माने हिने वैयक्तिक तृतीय क्रमांक पटकावला तर संस्कृती माने, भुजबळ सावित्री, पवार आकांक्षा, चव्हाण अंजली, कदम प्रज्ञा (सर्व B.Sc. F. Y.) यांच्या संघाने समूहगीतामध्ये तृतीय क्रमांक पटकावून युवा महोत्सवात महाविद्यालयास घवघवीत यश मिळवून दिले. भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाने दोन पारितोषिक पटकावून युवा महोत्सवातील आपला दबदबा कायम राखला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस मा. आ. सतीश चव्हाण, अध्यक्ष प्रकाश सोळंके, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश इंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ) रामदास ढोकळे, महाविद्यालयाचे युवा महोत्सव समन्वयक डॉ. व्यंकट चिकटे, युवा महोत्सव सह समन्वयक प्रा. ज्योती साठे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दिनांक 21 जून 2025 रोजी भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथे सर्वांच्या उपस्थितीत व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाल...
21/06/2025

दिनांक 21 जून 2025 रोजी भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथे सर्वांच्या उपस्थितीत व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली "आंतरराष्ट्रीय योग दिवस" साजरा करण्यात आला.महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला उपस्थित होते.या योग दिनानिमित्त योगगुरु म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे हे होते.महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वजण उपस्थित राहून योगगुरु माननीय डॉ.रामदास ढोकळे यांनी सर्वांना योगाभ्यास शिकवला व सर्वांनी शिकवलेले योग आनंदाने पूर्ण केले.यावेळी प्राचार्य डॉ.रामदास ढोकळे यांनी सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले...

आज आपला प्रवेश निश्चित करा...
17/05/2025

आज आपला प्रवेश निश्चित करा...

12/09/2024
आज महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे ( १७ ते १९ वयोगट मुले व मुली) आयोजन करण्यात आले होते. स्पर्धे...
10/09/2024

आज महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे ( १७ ते १९ वयोगट मुले व मुली) आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील क्रीडा शिक्षक श्री. सोमवंशी एम. डी. (आष्टा), श्री. क्षीरसागर व्ही. एन. (कानेगाव), श्री. कवाळे व्ही. एम. (भातागळी), श्री. सुतार डी. एस. (लोहारा), श्री. जाधव एस. जी. (माकणी), श्री. पाटील बी. व्ही. (जेवळी), पंच श्री. रोहन जगताप (भातागळी) यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तसे...
10/09/2024

आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

ICAR-National Research Centre on Pomegranate (राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र , सोलापूर) या ठिकाणी आज भानुदासराव चव्हाण क...
09/09/2024

ICAR-National Research Centre on Pomegranate (राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र , सोलापूर) या ठिकाणी आज भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील ११-१२ वी क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

Address

Https://goo. Gl/maps/Wb1Aj8ivmNbRFPTWA
Lohara
413608

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhanudasrao Chavan College Lohara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Bhanudasrao Chavan College Lohara:

Share