23/08/2013
. . . एकदा. . वाचुन तर बघा. . .
" मला डॉक्टर व्हायचंय, " "
मला इंजिनिअर
व्हायचंय, " " मला सी.ए. व्हायचंय ".
एस.एस.सी. च्या परीक्षेत 90 टक्के ते 99
टक्के मार्क्स
मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची हीच
स्वप्नं असतात. त्यापलीकडे
त्यांच्या स्वप्नांची झेप कधी जात नाहि.
ती खरीही होतात. पुढे आयुष्यभर
कुणाची तरी गुलामी पत्करून ते
सुखासमाधानात
जगतात. पण त्याच वेळी 50-60 टक्के
मार्क्स
घेणारे मात्र अफाट स्वप्न पाहात
असतात.
त्यातील बहुसंख्य ती यशस्वीही करून
दाखवतात.
अन त्यांच्याच कंपन्यामद्धे ते हुशार,
बुद्धिमान
विद्यार्थी मोठा पगार
मिळाल्याचा आनंद
साजरा करीत आयुष्य कंठत असतात.
धीरूभाई
अंबानी, बिल गेट्ससारखे जेमतेम शिक्षण
घेणारे
कुठल्या कुठे पोहोचले. आणि लाखो स्कॉलर
आज
त्यांच्या कंपन्यामद्धे नोकर म्हणून काम
करताहेत, आणि त्याचा त्याना अभिमान
वाटतो.
हि कहाणी आहे एका सामान्य माणसाची,
ज्याचं
शिक्षण जेमतेम झालं होतं, पण त्याच्याकडे
होती प्रचंड महत्वाकांक्षा. त्याने
पाहिलं होतं
एक भव्य स्वप्नं. ते वास्तवात
आणण्यासाठी त्याने आकाश पाताळ एक
केलं,
अन देशाचा झेंडा अटकेपार रोवला. गेली ३
०- ३
५ वर्ष " हिरो होंडा " हे नाव
घराघरात जाउन
पोहोचलं पण ज्याने ती कंपनी स्थापन
केली त्या ब्रिजमोहन मुंजाल यांचे नाव
मात्र
देशातील करोडो जनतेलाच नव्हे तर
हिरो होंडा चालवणाऱ्या लाखो तरुणाना
नसावे हि अत्यंत खेदाची गोष्ट आहे.
भाजीपाल्याचा वडिलोपार्जित व्यवसाय
करणारा ब्रिजमोहनलाल मुंजाल एक
दिवस
इतका मोठा होईल कि सायकल
निर्मिती आणि ,
नंतर मोटर सायकल निर्मिती करून जगात
पहिल्या क्रमांकाची कंपनी स्थापन करेल
असं
भविष्य
करायला कुठलाही ज्योतिषी त्यावेळी धज
भाजीपाला विकणे बंद करून जेव्हा त्याने
सायकलीचे स्पेअरपार्ट
विकायचा व्यवसाय सुरु
केला तेव्हा बस्तान बसायच्या आधीच ४
वर्षांनी देशाची फाळणी झाली,
आणि ब्रिजमोहन
अडचणीत आला. तरीही हिम्मत न
हारता त्याने
व्यवसायात पुन्हा जम बसवला. तेव्हाच
त्याने
सायकल निर्मितीच्या क्षेत्रात
उतरायचा निर्णय
घेतला. तेव्हा एटलस सायकल आणि राले
सायकलची चलती होती. त्यांच्या समोर
हिरो सायकल आणून ती चालवणे कठीण
होते.
तरीही ते आव्हान त्यांनी यशस्वीपणे
पेललं.
बघता बघता हिरो सायकलने 57 टक्के
बाजारपेठ
काबीज केली. 88 देशात
त्यांनी सायकलची निर्यात सुरु
केली आणि संपूर्ण जगातली सर्वात
मोठी सायकल
निर्मिती करणारी कंपनी म्हणून
हिरो सायकलचे नाव गिनीज बुकात नोंदले
गेले.
त्याच
वेळी त्यांनी स्कूटरच्या बाजारपेठेत
उतरायचा निर्णय घेतला. तेव्हा बजाज
हि एकमेव
कंपनी त्या क्षेत्रात अग्रेसर होती.
बुकिंग
केल्यावर वर्ष दोन वर्षाने
ती मिळायची.
नेमकी त्याच वेळी सरकारी धोरणामुळे
स्कूटर
आणि मोटार सायकलमधीच दरामधील
तफावत
कमी झाली . म्हणून त्यांनी मोटार
सायकल
निर्मितीचा निर्णय घेतला. अचानक
बदललेला हा निर्णय
त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरल
त्यांच्या हिरो होंडा मोटर सायकलने
अक्षरशः देशात तुफान निर्माण केलं.
प्रत्येक
तरुणाला आपल्याकडे मोटार सायकल
असावी तर
हिरो होंडा सारखीच
हि भावना निर्माण करण्यात
ते प्रचंड यशस्वी ठरले. आज दर
महिन्याला हिरो होंडाच्या ५ लाख
बाईक्स
विकल्या जातत. येत्या २-३ वर्षात ८
लाख
बाईक्स विकल्या जातील. एके
काळी भाजी विकणाऱ्याची आजची वार्षि
उलाढाल आहे २५ हजार कोटीची.
मित्रानो, ज्या देशात भ्रष्टाचार करून
हजारो कोटी कमावणारे बदनाम लोक
आहेत,
त्याच देशात प्रामाणिकपणे व्यवसाय
करून
अब्जाधीश होणारे सामान्य घरातील
लोकही अहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवा.
त्यांची हि कहाणी घराघरात
कशी पोहोचेल हे
पहा. दुर्दैवाने
मिडीयाला अशा कर्तुत्ववान
लोकांच्या कर्तुत्वापेक्षा सलमान खान,
शहरुख
खानमद्धे जास्त रस असतो. त्यामुळे
ब्रिजमोहनलाल मुंजाल सारखे लोक
आजही अंधारातच आहेत. 80
वर्षाच्या ब्रिजमोहनलाल
मुंजालना दीर्घायुष्य
चिंतून त्यांचा आदर्श समोर ठेऊन असे
असंख्य
उद्योजक आपल्या देशात निर्माण होवोत
हीच
ईश्वर चरणी प्रार्थना..