05/02/2026
श्री सिद्धेश्वर जिनियस इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
⭐⭐⭐⭐⭐⭐
दि. 04/02 /2026 वार बुधवार रोजी श्री सिद्धेश्वर जिनियस स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन दोन सत्रात मोठ्या थाटामाटात संपन्न झाले
सत्र पहिले--या सत्रामध्ये उद्घाटन व बक्षीस वितरण करण्यात आले 🎖️🏅🏆 या सत्राची सुरुवात सांघिक पद्याने झाली अध्यक्ष भा शि प्र संस्था सद्स्य मा. श्री प्रकाश भाऊ दुगड तर उद्घाटक गट शिक्षण अधिकारी मा.श्री .रविंद्रजी महामुनी होते
तर प्रमुख उपस्थिती केंद्रीय कार्यकारणी सदस्य. श्री अमरनाथ जी खुर्पे , सिद्धेश्वर संकुल चे कार्यवाह श्री विश्वासजी जोशी , सिद्धेश्वर संकुल चे अध्यक्ष मा .श्री सुरेंद्रजी रेदासनी सिद्धेश्वर स्कूल चे अध्यक्ष,मा.श्री तेजसजी महाजन , सिद्धेश्वर स्कूल चे कार्यवाह मा.श्री शशिकीरणजी गडम सिद्धेश्वर स्कूल चे अर्थसमिती सदस्य श्री रामप्रताप कलंत्री , शालेय समिती सदस्य श्री अंबादास रोकडे ,प्राचार्य श्रीमती वंदना मिटकरी व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते शै . वर्षात घेण्यात आलेल्या स्पर्धाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बक्षिसांचे वाचन श्रीमती ज्योती होके आणि भाले जया यांनी केले प्रास्तविक वंदना मिटकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनघा देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावी चे विद्यार्थी ची. अथर्व बंडे आणि अर्जुन ठोसर यांनी केले कार्यक्रमाची सांगता ची. कुणाल कुलकर्णी यांच्या सांगता मंत्राने झाली🏅🏆🎖️
🌸🌸🎤🎼🎹🎸🏵️
दुसरे सत्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे होते यामध्ये अध्यक्ष सिद्धेश्वर संकुल चे कार्यवाह मा. श्री ऍड विश्वास जी जोशी , तर प्रमुख अतिथी मा. श्री नागेश ताथोडे युवा उद्योजक. प्रमुख उपस्थिती सिद्धेश्वर संकुल चे अध्यक्ष मा.श्री सुरेंद्रजी रेदासणी , केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री प्रकाशजी दुगड , सिद्धेश्वर स्कूल चे अध्यक्ष श्री तेजस महाजन, कार्यवाह श्री शशिकीरण गडम , अर्थसमिती सदस्य श्री रामप्रताप कलंत्री , शालेय समिती सदस्य श्री अंबादास रोकडे, प्राचार्य वंदना मिटकरी संमेलन प्रमुख श्री शंकर कोलते ,विद्यार्थी प्रतिनिधी अर्जुन ठोसर कु . सई विद्यार्थी नी प्रतिनिधी उपस्थित होते प्रमुख अतिथी यांनी मार्मिक शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम बहारदार झाला चिमुकल्या नी सुंदर आशा गीतावर नृत्य सादर केले
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य लोकांनी व सर्व पालकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सूत्रसंचालन भाले जया व नवल प्रतिभा यांनी केले
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम कुणाल कुलकर्णी व त्यांच्या संच्या ने केली.