13/02/2026
श्रीगणेश रामचंद्र कत्रुवार फार्मसी मानवत येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय टेकनिकल पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा 2025–26 उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली.या स्पर्धेचे उद्घाटन पी.टी.एस.पी. मंडळाचे अध्यक्ष मा. श्री विजयकुमार कात्रुवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्तिती परीक्षक म्हणून श्री. भुकतारे सर, डॉ. राठोड सर, डॉ. वीर सर, डॉ. बिंदू सर,श्री. सूर्यवंशी सर, श्री पिंपळे सर व प्राचार्य डॉ. कदम एन. आर., प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती विकसित करून फार्मसी क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करण्याचे आवाहन केले.या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील विविध आधुनिक विषयांवर संशोधनपर व नाविन्यपूर्ण पेपर सादर केले.स्पर्धेचे मूल्यमापन तज्ज्ञ परीक्षकांद्वारे करण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक एसआरके कॉलेज ऑफ फार्मसी, मानवत यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक नांदेड कॉलेज ऑफ फार्मसी, नांदेड यांनी मिळविला, तर तृतीय क्रमांक महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, निलंगा यांनी प्राप्त केला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार, व पाच हजार रुपये पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील आयोजन समिती, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशाबद्दल मुख्य समन्वयक डॉ.श्वेतनिशा माडे यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक, परीक्षक व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संशोधन व सादरीकरण कौशल्याला चालना देणारा ठरला असून शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाची वेगळी ओळख निर्माण करणारा ठरला आहे.