04/01/2020
- ४ जानेवारी फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक लुई ब्रेल यांचा जन्मदिन.
ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी झाला.
लुई ब्रेल यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत/लिपी विकसीत केली म्हणून ४ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस साजरा करतात.
लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला.
त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर होते.
लुई तीन वर्षांचा असतांना लुईने वडिलांच्या कामाची आरी उचलली आणि अनावधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली.
लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोळ्यावर काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञाने त्याच्यावर उपचार केले.
काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता.
एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुई दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला.
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला छोटा लुई स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे.
पुढे अनेक प्रयत्न करून पाद्री पॅलुय यांनी पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत लुईला प्रवेश मिळवून दिला.
अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता.
तत्कालीन अंधासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीच्या मदतीने इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली.
मात्र ती लिपी वापरायला सोपी नसल्याने सहज वापरता येईल अशी लिपी लुईब्रेल यांनी स्वतः विकसीत केली. जी आज जगभरत वापरली जाते.
ब्रेल ही भाषा नव्हे; तर ती एक डॉटस् नामक सिस्टम आहे.
अंध व्यक्ती किंवा डोळ्यांना कमी दिसते, अशा व्यक्ती या डॉटस्ना स्पर्श करून पुस्तके वाचू शकतात.
याबरोबर शिक्षक, पालक, अन्य लोक जे डोळस आहेत, अशांनाही ब्रेल लिपी वाचता येते.
ब्रेल ही वैश्वितक भाषा बनली आहे.
जगातील अन्य भाषा ब्रेलमधील वर्णमालेचा उपयोग करतात.
लुईस ब्रेल यांच्या नावावरून ब्रेल ही लिपी ओळखली जाते.
https://sbgimiraj.org