09/01/2021
*रोटरी क्लब ऑफ कांदिवली पश्चिम मुंबई तर्फे सौरऊर्जा यंत्रणेचे उद्घाटन!!*
कांदिवली पश्चिम येथील हिल्डा कॅस्टेलिनो एज्युकेशन ट्रस्ट संचालित हिल्डा कॅस्टेलिनो मराठी व हिंदी हायस्कूल मध्ये रोटरी क्लब ऑफ कांदिवली पश्चिम मुंबई तर्फे बसविण्यात आलेले विनामूल्य ६ किलोवॅट विद्युत क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती संयंत्र याचे उद्घाटन आज शनिवार दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता रोटरीचे जिल्हा गव्हर्नर सुनील मेहरा, संस्थेचे सचिव अल्बर्ट कॅस्टेलिनो,रोटरीयन मयांक देसाई, दिपक चौधरी, राजेंद्र भाटिया, राकेश शहा, श्रीमती भावना भद्रेश्वरा, हिमांशूभाई आगाशीवाला, आयपीसीएचे जग्गाभाई राजू, जय व्यास यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत रेडीज, हिंदी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली राणे व प्राथमिक हिंदीच्या मुख्याध्यापक सौ.सविता पाण्डेय व शिक्षक- शिक्षकेतर वर्ग उपस्थित होता.