26/09/2026
सर्व सज्जता झाली,
मेहनत फळाला आली...
काही तासात मिळेल त्याचे प्रमाण,
संचालकगणांचा होईल सन्मान...
*कोचिंग क्लासेस संचालक संघटना, महाराष्ट्र राज्य,*
आयोजित
💐💐💐🏆🏆🏆💐💐💐
*शिक्षक सन्मानदिन सोहळा - 2026*
💐💐💐🏆🏆🏆💐💐💐
हा आपला, आपल्यातीलच गुणवंत शिक्षकांना गौरविण्याचा आपणच मिळून साजरा करणारा सोहळा. आता अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. सर्व सिद्धता झाली आहे, जे काही बाकी आहे त्याचेही युद्धपातळीवर नियोजन सर्वच सन्माननीय सदस्य करत आहेत.
*आपणही या सोहळ्याला काहीही करून हजर राहण्याची तयारी अतिशय उत्साहाने नक्कीच केली असेल.*
फक्त आपल्याला सोहळा अतिशय दिमाखदार आणि यशस्वी होण्यासाठी वेळेचे बंधन हे आपल्याला शिक्षक म्हणून जसे विद्यार्थ्यांवर ठेवतो तसेच आपल्याला उद्या पाळावे लागेल.
*कार्यक्रम ठीक सकाळी 10.00 वाजताच सुरू होणार असल्याने आपल्याला 15 मिनिटे आधी उपस्थित व्हायचं आहे.*
बाकी आपल्या आगमनानंतर जो काही उत्साह निर्माण होईल त्यानेच कार्यक्रम सहजरित्या पार पाडला जाईल हे निश्चित...
*चला तर उद्या सकाळी ठीक 10:00 वाजता भेटू....*
*आम्ही वाट पाहत आहोत...*
ठिकाण - कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका, संत ज्ञानेश्वर पथ, पाचपाखाडी, ठाणे (प.)
-मास मीडिया (CCPA)