SNDT Women's University Mumbai India

SNDT Women's University Mumbai India SNDT Women’s University is the first Women’s University in South Asia. The University was founded by Maharshi Dr. Dhondo Keshav Karve.

SNDT Women's University functions from its three campuses, two in Mumbai and one in Pune. SNDT Women’s University is the first Women’s University in South-East Asia. The University was founded by Maharshi Dr. Dhondo Keshav Karve in 1916 for offering higher education to girls. SNDTWU has 3 campuses: Churchgate, Juhu and Pune. Several affiliated colleges (about 165) all over Maharashtra and other 6

States of India have affiliated themselves to SNDT Women's University, ie students learn SNDTWU curriculum and area awarded degree of the University. SNDTWU offers about 250 programmes under 12 different faculties from PhD to Certificate.

Build your future in Instructional Design and Digital Learning!: Whenever we learn through an online course, learn a con...
22/08/2026

Build your future in Instructional Design and Digital Learning!:

Whenever we learn through an online course, learn a concept through a simulation or animation, or learn through an interactive video, someone has planned what that learning experience should be like. The professional who plans this is called an Instructional Designer. Such professionals are also known as eLearning specialists or Learning Experience Designers.

Today, eLearning is highly useful for learning across many fields, from school education to higher education, including Medicine, Engineering, Architecture, Fine Arts, Music, etc. Consequently, many eLearning industries and corporate houses are creating learning experieces and learning resources according to their requirements. They have a great need for such designers.

M.A. / M. Sc. eLearning, the Master's level programme has been developed by the Department of Educational Technology, SNDT Women's University, Mumbai. This is the Silver Jubilee year of the
programme. Recognising the requirements of the present digital learning environment, it is the only university among India's state universities to have developed such an innovative programme.
The programme brings together four elements-learning, technology, instructional design and creativity-resulting in a rich learning experience.
Students learn to analyse learning needs, plan different learning approaches accordingly,
organise appropriate learning strategies and experiences through which learners can interact with one another, and make appropriate and effective use of digital technology.

The emphasis is not on learning how to use technology, but on learning to create meaningful learning experiences by using appropriate technology.

पावसाच्या पाऊलखुणा उमटणार कवितेतून; एसएनडीटी महिला विद्यापीठात विशेष काव्य कार्यक्रममुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२६ : पावसाळ्या...
21/08/2026

पावसाच्या पाऊलखुणा उमटणार कवितेतून; एसएनडीटी महिला विद्यापीठात विशेष काव्य कार्यक्रम

मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२६ : पावसाळ्याच्या रम्य वातावरणाचा आणि निसर्गाच्या विविध रूपांचा काव्यमय अनुभव देण्यासाठी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे ‘पावसाच्या पाऊलखुणा’ या विशेष कवितेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता विद्यापीठाच्या वर्गखोली क्र. ६०९ (सहावा मजला) येथे हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पावसाळा, निसर्ग, मातीचा सुगंध, आठवणी आणि मानवी भावविश्व यांना कवितेच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून साहित्यप्रेमींना मिळणार आहे. मराठी साहित्यात पावसाचे विविधांगी चित्रण, पावसाशी जोडलेल्या भावना आणि निसर्गानुभव यावर कार्यक्रमात काव्यमय सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला कवयत्री यामिनी दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या वेळी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील रामटेके, डॉ. अनुराधा पोतदार आणि डॉ. राजश्री पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
पदव्युत्तर मराठी विभागाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून साहित्य, निसर्ग आणि संवेदना यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार असून विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्यप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

21/08/2026
एसएनडीटी महिला विद्यापीठात नव्याने प्रवेशित विद्यार्थिनींसाठी वैद्यकीय तपासणी शिबिरमुंबई, दि. २० ऑगस्ट २०२६ : नव्याने प्...
20/08/2026

एसएनडीटी महिला विद्यापीठात नव्याने प्रवेशित विद्यार्थिनींसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर

मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२६ : नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या आरोग्याची तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि एल. टी. कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, रोटरी क्लब ऑफ वरळी आणि जसलोक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या तीनही परिसरांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात येत असून चर्चगेट परिसरात १७ ते १९ ऑगस्ट, जुहू परिसरात २० व २१ ऑगस्ट आणि पुणे परिसरात २४ व २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

चर्चगेट परिसरातील शिबिराची सुरुवात १७ ऑगस्ट रोजी झाली. उद्घाटन कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रुबी ओझा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ वरळीचे सदस्य पंकज तन्ना, विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. नितीन प्रभूतेंडुलकर आणि एल. टी. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शोभा गायकवाड उपस्थित होत्या.टी

शिबिराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनींची सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उंची, वजन, बीएमआय, नेत्र तपासणी, शारीरिक तपासणी तसेच आवश्यक पॅथॉलॉजिकल तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पहिल्या दिवशी १०९ विद्यार्थिनींनी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी थॅलेसेमिया समुपदेशन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ वरळीच्या वतीने PATUT (Parents Association Thalassemic Unit Trust) यांच्या सहकार्याने ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करण्यात आले. थॅलेसेमिया ट्रेट आढळलेल्या विद्यार्थिनींचे पालक तसेच इतर विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या. थॅलेसेमियाबाबत जनजागृती करण्याबरोबरच संबंधित विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना आवश्यक समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, जपान येथील टोकियो विद्यापीठातील प्राध्यापकांनी वैद्यकीय शिबिराला भेट दिली. त्यांनी शिबिरातील नोंदणी, उंची-वजन मोजणी, बीएमआय तपासणी, नेत्र तपासणी, शारीरिक तपासणी आणि पॅथॉलॉजिकल तपासणी अशा विविध विभागांची पाहणी केली. शिबिराचे सुनियोजित व्यवस्थापन आणि एल. टी. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनी व शिक्षकांनी केलेल्या समर्पित कार्याचे त्यांनी कौतुक केले.

विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन (CPR) प्रात्यक्षिकाचेही आयोजन करण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत वेळेवर मदत करण्यासाठी आवश्यक प्राथमिक जीवनरक्षक तंत्रांची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २८६ विद्यार्थिनींनी वैद्यकीय तपासणी व विविध आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घेतला. नव्या विद्यार्थिनींच्या आरोग्याची सर्वसमावेशक काळजी घेण्यासोबतच त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक सवयी, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्राथमिक प्रतिसाद याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.

20/08/2026
SNDT महिला विद्यापीठात ‘ड्रग-फ्री इंडिया’साठी १० कोटी संकल्प महाअभियानाचा माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या...
19/08/2026

SNDT महिला विद्यापीठात ‘ड्रग-फ्री इंडिया’साठी १० कोटी संकल्प महाअभियानाचा माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, १९ ऑगस्ट ‘ड्रग-फ्री इंडिया’ अर्थात नशामुक्त भारतासाठी ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित १० कोटी संकल्प पूर्ण करण्याच्या महाअभियानाचा शुभारंभ आज मुंबई येथील SNDT महिला विद्यापीठाच्या पाटकर हॉलमध्ये महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
विविध महाविद्यालयांमधून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना राज्यपालांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली तसेच ‘नशामुक्ती अभियान व्हॅन’ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त प्रशासकीय प्रमुख राजयोगिनी संतोष दीदी, ब्रह्माकुमारी संस्थेच्या मेडिकल विंगचे प्रमुख बी. के. बनारसी लाल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला, ब्रह्माकुमारीजच्या विविध केंद्रांतील बंधू व भगिनी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी मुंबईतर्फे सुरू करण्यात आलेल्या या महाअभियानाचा उद्देश युवकांमध्ये अमली पदार्थ व व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती निर्माण करणे तसेच व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.

मातृत्वाची संकल्पना महिलांपुरती मर्यादित नाही; पुरुषांमध्येही ती आहे — कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेवजुहू कॅम्पसमध्ये प्रा...
19/08/2026

मातृत्वाची संकल्पना महिलांपुरती मर्यादित नाही; पुरुषांमध्येही ती आहे — कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव
जुहू कॅम्पसमध्ये प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी कुलगुरूंचा संवाद

मुंबई, दि. १९ ऑगस्ट : विद्यापीठातील प्रत्येक कर्मचारी हा विद्यापीठ परिवाराचा अविभाज्य घटक असून, सर्वांनी एकजुटीने विद्यापीठाच्या प्रगतीसाठी कार्य करणे आवश्यक आहे. विद्यापीठाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेली भावना व्यक्त झाली, तर विद्यापीठाशी असलेले नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. विद्यापीठाची एकता हीच त्याच्या प्रगतीची खरी ताकद आहे. मातृत्वाची संकल्पना केवळ महिलांपुरती मर्यादित नसून, पुरुषांमध्येही मातृत्वाची भावना असते, असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी केले.

जुहू कॅम्पसमध्ये आयोजित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी विद्यापीठातील कर्मचारी ही एक कुटुंबव्यवस्था असल्याचे सांगत, भारताच्या सामाजिक व्यवस्थेतही कुटुंबसंस्थेला विशेष महत्त्व असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात जुहू कॅम्पसमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी, तर दुसऱ्या सत्रात प्राध्यापकांशी कुलगुरूंनी संवाद साधला. या वेळी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच विविध प्रश्न व अडचणी कुलगुरूंसमोर मांडल्या. कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी समाधानकारक निरसन केले.

विद्यापीठाच्या विकासासाठी परस्परांमध्ये संवाद, सहकार्य आणि एकजूट कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. या संवाद कार्यक्रमाला जुहू कॅम्पसमधील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कॅम्पस प्रमुख डॉ. अजय लहाने यांनी विशेष परिश्रम घेतले.

टोकियो विद्यापीठाचा एसएनडीटी महिला विद्यापीठासोबत शैक्षणिक सहकार्यासाठी सकारात्मक पुढाकारमुंबई, दि. १८ ऑगस्ट २०२६ : जपान...
18/08/2026

टोकियो विद्यापीठाचा एसएनडीटी महिला विद्यापीठासोबत शैक्षणिक सहकार्यासाठी सकारात्मक पुढाकार

मुंबई, दि. १८ ऑगस्ट २०२६ : जपानमधील जगप्रसिद्ध टोकियो विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट परिसराला भेट देत कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्याशी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सहकार्याच्या विविध शक्यतांवर सविस्तर चर्चा केली. सुमारे १५० वर्षांची समृद्ध शैक्षणिक परंपरा असलेल्या टोकियो विद्यापीठाला १११ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठासोबत सहकार्य करण्यास विशेष रस असल्याचे या भेटीत स्पष्ट झाले.
यावेळी विद्यापीठाचे कॅम्पस प्रमुख डॉ. संजय फड, डॉ. मीरा देसाई, डॉ. नितीन वाणी, डॉ. मनिषा माधवा, राजस लिमये उपस्थित होते.
टोकियो विद्यापीठाच्या कार्यकारी उपाध्यक्ष प्रा. काओरी हयाशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांच्याशी विविध शैक्षणिक व संशोधन उपक्रमांबाबत विचारविनिमय केला. या प्रतिनिधीमंडळात आंतरराष्ट्रीय प्रकल्प प्रोत्साहन गट, संशोधन प्रोत्साहन विभागातील डॉ. फेगन जेम्स जोसेफ तसेच न्यूयॉर्क येथील विद्यापीठाच्या सल्लागार ॲना यांचा समावेश होता.

या बैठकीत दोन्ही विद्यापीठांमध्ये औपचारिक शैक्षणिक व संशोधन भागीदारी, संयुक्त संशोधन व नवोपक्रम, आंतरविद्याशाखीय संशोधन, शाश्वतता, आरोग्यविषयक अभ्यास आणि सामाजिक शास्त्रे या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर प्राध्यापक व विद्यार्थिनींसाठी अल्पकालीन शैक्षणिक भेटी, संशोधन इंटर्नशिप, संयुक्त मार्गदर्शन तसेच विद्यार्थी-शिक्षक देवाणघेवाण कार्यक्रम राबविण्याच्या शक्यतांचाही आढावा घेण्यात आला.

भारत-जपान शैक्षणिक व संशोधन सहकार्याच्या विविध योजनांअंतर्गत संयुक्त प्रकल्प आणि निधीच्या संधी शोधण्याबाबतही चर्चा झाली. दोन्ही विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून संयुक्त परिसंवाद, परिषदा व कार्यशाळा आयोजित करण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक विचारविनिमय झाला.

यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महिला शिक्षण, संशोधन आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानाची माहिती टोकियो विद्यापीठाच्या शिष्टमंडळाला देण्यात आली. दोन्ही विद्यापीठांच्या दीर्घ आणि समृद्ध शैक्षणिक परंपरेचा लाभ घेत परस्पर सहकार्याच्या माध्यमातून भविष्यात नवीन शैक्षणिक, संशोधन व नवोपक्रमाच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

बैठकीनंतर टोकियो विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाला तसेच एल. टी. महिला नर्सिंग महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी संबंधित विभागातील शैक्षणिक उपक्रम, संशोधन कार्य आणि उपलब्ध संधींबाबत शिष्टमंडळाने माहिती जाणून घेतली. भारत आणि जपानमधील उच्च शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Address

1, N. Thackersey Road
Mumbai
400020

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm

Telephone

+912222030948

Alerts

Be the first to know and let us send you an email when SNDT Women's University Mumbai India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share