24/12/2014
नागोठणे भारतीय एज्युकेशन विदयासंकुल चेअरमन मा. श्री. किशोर जैन सर यांच्या प्रेरणेने बुधवार दि. २४ डिसेंबर २०१४ रोजी नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन विदयासंकुलात ठीक ११.०० वाजता विविध वार्षिक क्रिडा स्पर्धेचे आयोजन करणायत आले होते. साधारणत: तीन दिवस चालणाऱ्या या कार्याक्रमचे उदघाटन मा. श्री. दिनेशजी परमार यांच्या हस्ते नारळ वाढवून करणायत आले. या प्रसंगी त्यांनी स्वतः हातामध्ये बॉट घेऊन ह्या कार्याक्रमची सुरवात केली. तसेच सर्व भारतीय एज्युकेशन विदयासंकुलात विद्यार्थी यांना विविध वार्षिक क्रिडा स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या. पुढे तीन दिवस चालणारया या वार्षिक क्रिडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, लगोरी, यांसारखे आउट डोअर तसेच कॅरम, चेस, यांसारखे इन डोअर सामन्याचाही समावेश करण्यात आला होता. या उदघाटन समारंभासाठी मा. श्री. साधुराम बांगरे, (विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग), श्री. दिपक गायकवाड (भा. ए. सो. संचालक), श्री. बळीराम बडे , श्री. संजय टेमकर, श्री. मनोज धात्रक, श्री. संजय जाधव सर, श्री. गौतम सोलंकी सर, सौ. मयुरा अनगत, तसेच भारतीय एज्युकेशन विदयासंकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी वर्गाचीही उपस्थिती होती.
आशा प्रकारे तीन दिवस चालणारया ह्या वार्षिक क्रिडा स्पर्धा भारतीय एज्युकेशन विदयासंकुलात खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत सुरळीतपणे चालू आहेत.