Dr. B. R. Ambedkar College , Diksha Bhoomi , Nagpur.

Dr. B. R. Ambedkar College , Diksha Bhoomi , Nagpur. Type your confession here :- http://goo.gl/RHXGMD Welcome to Dr.B.R. R. Ambedkar, the architech of the Indian Constitution, embraced Buddhism. H. E. Hon'ble Shri. S.

Ambedkar College, Nagpur

NAAC RE-ACCREDITED WITH "A" GRADE

Founded by visionary Late Padmshri Dadasaheb Gaikwad in 1964, Dr. Ambedkar College, Nagpur (DACN), affiliated to RTM Nagpur University is indeed a time tested Centre for higher learning. DACN is located in the centre of the Orange City at the Holy Deeksha Bhoomim where Bhrat Ratna Dr. B. DACN functions under the aegis of Param Dr. B

abasaheb Ambedkar Smarak Samiti. Gavai, Governor of Kerala and the President of the college management and the Secretary Shri. J. Fulzele are the pillars of our institution. Under the direction of Dr. R. Krishnakumar, Vice Chancellor, Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik, we are a dedicated group of individuals working hard to impart Quality Education to one and all. DACN originally began with a vision of becoming a seat of excellence in education and took first modest step in the direction in 1964 with introduction of Arts and Commerce faculties. Change of time, increasing inquisitive minds around the vicinity and explosion in scientific awareness encouraged us to introduce Science faculty in 1969. Those aspiring to wear the fabled Black coat to fight for justice, were provide the right opportunity when DACN started the Law faculty in 1982. To keep pace with time DACN also provided Management Education from 1984 till 1996 when a separate Management Institute was established.

07/02/2021

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||
बघ, वाच, ठरव !

माझ्या लाडक्या मुला.
मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन.
1) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अत्यर्र्क्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या.
2) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
3) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर!

* माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे.
तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.

* जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.

* आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.

* प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.

* अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!

* माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचास.

* आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.


- युवर डॅड

( एका हॉँगकॉँगच्या टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा:या मुलाला लिहिलेलं पत्र असं म्हणत हे इंग्रजी पत्र सध्या व्हॉट्सअॅपवर फिरतंय. त्याचा हा मराठी अनुवाद.)

03/11/2020

*१९९०*

पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती. अभ्यासाचं टेन्शन आम्ही शिसपेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं

पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा *दृढ* विश्वास होता.

कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा.

आई वडिलांना आमचे शिक्षण म्हणजे *फी चा बोजा* नव्हते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती.

एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!!

शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच माहीत नव्हतं.

मार खाणं ही आमच्या *दैनंदिन* जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. *मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे.* मार खाणारा यासाठी की 'चला!,कालच्यापेक्षा तरी आज कमी *धोपटला* गेलो 'म्हणून आणि मारणारा 'आज पुन्हा *हात धुवून* घ्यायला मिळाले' म्हणून......

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही *तुमच्यावर किती प्रेम करतो,* कारण आम्हाला *'आय लव यू'* म्हणणं माहीतच नव्हतं.

आज आम्ही असंख्य टक्के टोणपे खात, संघर्ष करत *दुनियेचा एक हिस्सा झालोय.* काहींना जे हवं होतं ते त्यांनी *मिळवलंय* तर काही 'काय माहीत....? *कुठे हरवलेत* ते ...??!

कपड्यांना *सुरकुत्या* पडू न देणं आणि नात्यांमध्ये *औपचारिकता जपणं* आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही *मूर्खच* राहिलो.

आपल्या *नशिबाला* कबूल करून आम्ही आजही *स्वप्नं* पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला *जगायला मदत करतायत* नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची *वर्तमानाशी* काहीच तुलना होणार नाही.

आम्ही जगात कुठेही असू पण हे *सत्य* आहे की आम्ही *वास्तव दुनियेत जगलो,* आणि *वास्तवात* वाढलो. मग आम्ही *चांगले असू किंवा वाईट*, पण आम्ही या दुनियेत जगलो.*

अनामिक.

🙏🏻🙏🏻🙏🏻

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
14/10/2020

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

27/09/2020
May this Independence Day bring fortune and success for each and every one of us. May our country see more progress in t...
14/08/2020

May this Independence Day bring fortune and success for each and every one of us. May our country see more progress in the coming years! Happy Independence Day!

03/06/2020

*बाबा नेहमीच मागे कां असतात हे माहित नाही* 🤔

◆ आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात, दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही बाबा मागे कां आहेत ??? हे माहित नाही.

◆ आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात, त्यांचे दोन्ही प्रयत्न समान आहेत, तरीही बाबा मागे कां पडतात ??? माहित नाही.

◆ आई आपल्याला पाहिजे ते शिजवते, बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात, त्यांचे दोन्ही प्रेम समान आहेत, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शविले गेले आहे. बाबा मागे कां आहेत ??? हे माहित नाही.

◆ जेव्हा आपण फोनवर बोलतो तेव्हा आपल्याला प्रथम आईशी बोलायचे असते, दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असे ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असेल फक्त तेव्हाच त्यांची आठवण होते, परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही की आपण इतर वेळी त्यास आठवत नाही? पिढ्या अन् पिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो की बाबा नेहमीच मागे पडतात... !!!

◆ कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरले जातात, परंतु वडिलांचे कपडे फारच कमी आहेत, कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नाही. बाबा अजूनही मागे कां आहेत ??? हे माहित नाही.

◆ आईकडे सोन्याचे अनेक दागिने आहेत, पण वडिलांकडे एकच रिंग आहे जी त्यांच्या लग्ना दरम्यान देण्यात आली होती. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते आणि बाबा तसे करत नाहीत. अजूनही पप्पा मागे कां आहेत ??? हे माहित नाही.

◆ आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात, पण जेव्हा जेव्हा ओळख मिळते तेव्हा तो नेहमीच मागे राहतो.

◆ आई म्हणते, आम्हा मुलांना या महिन्यात महाविद्यालयीन शिकवणी देण्याची गरज आहे, कृपया सणानिमित्त माझ्यासाठी साडी खरेदी करू नका, परंतु वडिलांनी नवीन कपड्यांचा विचारही केला नाही. तरीही त्यांचे प्रेम समान आहे, एवढे असूनही बाबा कां मागे पडतात ??? हे माहित नाही.

◆ आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीतकमी घरातील कामकाजात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत.

●●● वडील *मागे किंवा ‘मागच्या बाजूला’*
*(पिछाडीस)* आहेत कारण *ते कुटुंबाचा कणा आहेत.* त्यांच्यामुळेच आम्ही, आपण सगळे उभे आहोत. कदाचित, हेच कारण आहे की ते ... *मागे* आहे.

●●● *आई श्रेष्ठ आहे,* पण, म्हणून... *बाबा कनिष्ठ नाहीत,* ... एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की..., *_...कुठलाही मोठेपणा न मिरवणारा हा आमचा भक्कम आधार आहे._*

16/05/2020

*अपने जिस घर में बैठे बैठे आप बोर हो रहे हैं उसी घर तक पहुंचने के लिये हज़ारों लोग सैकड़ो किलोमीटर पैदल चल रहे हैं और बहुतों ने तो अपनी जान गवाँ दी और हज़ारों लोग अभी भी इस आस में बैठे हैं कि कब किसी तरह हम अपने बच्चों के साथ वहाँ पहुँच पायें। आज यदि आप सपरिवार अपने घर मे हैं स्वस्थ हैं और आपको 2 टाइम का भोजन मिल रहा है तो समझ लीजिए कि आप दुनिया के बहुत भाग्यशाली व्यक्ति हैं।*

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
07/05/2020

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रदिनाच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना तसेच मराठी बांधवांना मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा।। महाराष्ट्रदिन चिरायु होव...
01/05/2020

महाराष्ट्रदिनाच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना तसेच मराठी बांधवांना मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा

।। महाराष्ट्रदिन चिरायु होवो ।।

गर्व आहे मला मी मराठी असल्याचा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजयंती निमित्तत्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
13/04/2020

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जयंती निमित्त

त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

Address

Acharya Kripalani Road
Nagpur
440010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. B. R. Ambedkar College , Diksha Bhoomi , Nagpur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dr. B. R. Ambedkar College , Diksha Bhoomi , Nagpur.:

Share