23/07/2026
*शिवजागृती महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती संपन्न* ----------------------------------- नळेगाव: येथील शिवजागृती महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३जुलै २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रथम लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्राचार्य डॉ.संजय वाघमारे यांनी 'लोकमान्य टिळक यांचे जीवन,चरित्र आणि कार्य'या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.लहू वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. चंद्रशेखर ढोले,प्रा.विजयकुमार तोंडारे,प्रा. निळकंठ बोळेगाव यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.