08/08/2021
*🙏मा. राजेंद्रकुमार गावीत यांच्या मदतीची परिसिमा...🙏*
*👆असेही दातृत्व👆*
*योगेश्वर कॉलनी, नंदुरबार (मुळ गाव शिंदे ता. नंदुरबार) येथील आपले शिक्षक बंधू कै. प्रशांतभाई भाईदास पटेल (वय ४४ वर्ष) यांचे दि. २८/०७/२०२१ रोजी के. डी. गावित माध्यमिक विद्यालय, कोरीट, ता.जि. नंदुरबार येथील शाळेत जात असताना सकाळी ७.२० वाजता दुर्दैवाने अपघाती निधन झाले. त्यांचे पश्चात आई श्रीमती तापीबाई भाईदास पाटील, पत्नी श्रीमती मिनाक्षी प्रशांत पाटील, मुलगी क्रिष्णा प्रशांत पाटील (वय १५ वर्ष) व मुलगा निरज प्रशांत पाटील (वय १३ वर्ष) असा परिवार आहे.*
*कै. प्रशांतभाई यांच्या अकाली निधनाने त्यांच्या परिवारावर अनेक संकटांचे डोंगर कोसळलेत. त्यांच्या परिवाराला काही अंशी मदतीचा हात पुढे करण्यासह दिलासा देण्याची भूमिका घेत आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद, ता.जि. नंदुरबार या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्रकुमार गावीत साहेब यांनी श्रीमती मिनाक्षीताई या बी.ए., बी.एड. असल्याने त्यांना त्यांचे पती कै. प्रशांतभाई यांच्या जागेवर अनुकंपाखाली के. डी. गावित माध्यमिक विद्यालय, कोरीट, ता.जि. नंदुरबार या शाळेत उपशिक्षक म्हणून सामावून घेण्याचे निश्चित केले.*
*आज दि. ८/८/२०२१ला कै. प्रशांतभाई यांचे उत्तरकार्य होते. या भावपूर्ण दुःखद कार्यक्रमातच आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी, नटावद, ता.जि. नंदुरबार या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्रकुमार गावीत साहेब यांच्या हस्ते श्रीमती मिनाक्षीताई यांना शिक्षक पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी आपले बंधू तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. मुकेशभाई पाटील, शाळेतील शिक्षक व कै. प्रशांतभाई यांचे नातेवाईक उपस्थित होते. या मन हेलावणाऱ्या घटनेने उपस्थितांचे डोळे पाणावलेत.*
*कै. प्रशांतभाई यांच्या परिवाराला आर्थिक पाठबळ व स्थैर्य मिळावे म्हणून संस्थाध्यक्ष मा. गावीत साहेब यांच्या या उदार मानवतावादी कृतीला सर्वांच्या वतीने मनःपूर्वक अभिवादन.*
🙏🙏💐💐🙏🙏
Rajendrakumar Gavit - राजेंद्रकुमार गावीत