06/11/2025
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी माझी निवड करुन माझ्यावर जो विश्वास ठेवला गेला, त्या अमूल्य विश्वासासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार-कृतज्ञ आहे. माझ्या राजकीय प्रवासातील हा क्षण केवळ पदाचा सन्मान नाही, तर कार्यकर्त्यांच्या भावनांची, जनतेच्या आशेची आणि माझ्यावरच्या विश्वासाची पवित्र जबाबदारी आहे.
प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे साहेब, माननीय खा.सुप्रिया ताई सुळे आणि माननीय आ.रोहित दादा पवार यांच्या सततच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार. आपलं प्रेम, आधार आणि प्रेरणा हीच माझी शक्ती आहे.
संघटनेला कणखरपणे उभं ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात मला माझं कर्तव्य दिसतं. जनतेच्या विश्वासाचा मान राखायला, गावागावात पक्षाचा विचार पोहोचवायला आणि धाराशिव जिल्ह्याच्या भविष्याला सक्षम दिशा देण्यासाठी मी अखंड प्रयत्न करणार आहे.
आपल्या विश्वासाला यशाची भेट देणे हेच माझे ध्येय…
आपल्या प्रेमाचा ऋण मी कार्यातूनच फेडेन.
आभारी आहे !!
आपला
डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष-धाराशिव.
•
•
• #शरदपवार
• #पवारसाहेब
•
•
•
•
•
•
•
•