Vilas Tambe College Of Education, Otur, Pune

Vilas Tambe College Of Education, Otur, Pune One of the best college of Education for pre-service teacher training courses

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये B.Ed. प्रथम वर्षात प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या CET परीक्षा दिलेल्या व CAP Registration केलेल...
06/10/2023

शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये B.Ed. प्रथम वर्षात प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या CET परीक्षा दिलेल्या व CAP Registration केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, 3rd Round साठी Option Form भरण्याची प्रक्रिया आज, दिनांक 06/10/2023 ते सोमवार, दिनांक 09/10/2023 सुरू असणार आहे. तरी सर्वांनी https://bedcap23.mahacet.org/Public/Home.aspx या लिंक वर जाऊन आपले Option Form भरावेत.

Latest updates and statistic charts

सर्व वृत्तपत्र व प्रतिनिधींचे बातमी प्रसिद्धी बद्दल मनःपूर्वक आभार...
27/07/2023

सर्व वृत्तपत्र व प्रतिनिधींचे बातमी प्रसिद्धी बद्दल मनःपूर्वक आभार...

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...
26/07/2023

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...

बी.एड. CAP Registration प्रक्रिया 30 जून 2023 पासून सुरू झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी https://bedcap23.mahacet.org/Pu...
05/07/2023

बी.एड. CAP Registration प्रक्रिया 30 जून 2023 पासून सुरू झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी https://bedcap23.mahacet.org/Public/Home.aspx या लिंक वरून आपले CAP Registration पूर्ण करावे व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच आपली कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने Verify केली जाणार आहेत. तरी प्रत्येकाने CAP Registration केल्यानंतर सातत्याने आपले लॉगिन करून आपली कागदपत्रे Verified झालेली आहेत की नाही, हे काळजीपूर्वक पहावे व कागदपत्रांना काही त्रुटी आलेल्या असल्यास त्या त्रुटींची तात्काळ पूर्तता करावी. जेणे करून आपल्याला बी. एड. प्रवेशासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांना त्रुटी येतील व ते त्याकडे दुर्लक्ष करतील. अशा विद्यार्थ्यांची नावे अंतिम पात्रता यादीत येत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे Caste valiidity Certificate, Non Creamy Layer Certificate यासाठी प्रकरण दाखल केलेले आहे. परंतु अद्याप पर्यंत Certificate मिळालेले नाही. अशा विद्यार्थ्यांनी सदर प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची संबंधित कार्यालयाची पावती अपलोड करावयाची आहे व नंतर प्रमाणपत्र मिळताच त्या ठिकाणी प्रमाणपत्र अपलोड करावयाचे आहे. B.Ed. CAP Registration ची अंतिम मुदत दि. 10 जुलै 2023 ही आहे.

Latest updates and statistic charts

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डुंबरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन ...
24/04/2023

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डुंबरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन "सृजनोत्सव, भावी शिक्षकांचा!!! 2023" हा कार्यक्रम रविवार, दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सन्माननीय सचिव श्री वैभवशेठ तांबे व प्रमुख अतिथी म्हणून शिवनेरी भूषण मा. श्री. रमेश खरमाळे हे उपस्थित होते. श्री. बशीर शेख, श्री. कैलास करपे सर व शिल्पकार श्री. यतीन शेटे हे मान्यवर देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये वर्षभरातील विविध स्पर्धा व कार्यक्रम यांच्या बक्षीस वितरणाचा समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. रमेश खरमाळे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होत असलेले नुकसान व पर्यावरण संवर्धनाची गरज याबद्दल विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करण्याचे काम केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसुदेव राऊत यांनी केले, महाविद्यालयांच्या अहवाल वार्षिक अहवालांचे वाचन डॉ. रमेश काकड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अजय हांडे व अर्चना साबळे यांनी केले यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचा सहभाग दिला.

वार्षिक स्नेहसंमेलन "सृजनोत्सव, भावी शिक्षकांचा!!! 2023" मधील सांस्कृतिक कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...
24/04/2023

वार्षिक स्नेहसंमेलन "सृजनोत्सव, भावी शिक्षकांचा!!! 2023" मधील सांस्कृतिक कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...

21/04/2023

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...

दि. २३, २४ व २५ एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या बी. एड्. सीईटी परीक्षेचे हॉल तिकीट Website वर उपलब्ध झालेले आहेत. https://a...
20/04/2023

दि. २३, २४ व २५ एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या बी. एड्. सीईटी परीक्षेचे हॉल तिकीट Website वर उपलब्ध झालेले आहेत. https://admitcard.mhexam.com/MAH-B-Ed-CET-2023/ या लिंक वरुण सर्वांनी आपले Hall Ticket डाऊनलोड करून घ्यावेत.

शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या बी.एड. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे.
11/03/2023

शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या बी.एड. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे.

आज महाविद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्री गजानन मह...
25/02/2023

आज महाविद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. श्रीहरी तांबे सर, प्रमुख अतिथी म्हणून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, श्री. वैभव तांबे सर तसेच शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य डॉ. गोविंद खरात सर, शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. रमेश काकड सर उपस्थित होते. या उपक्रमात महाविद्यालयातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे......

शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन.....
23/02/2023

शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन.....

ज्ञानविलास आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याची विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्धी केल्या बद्दल परिसरातील सर्व आदरणीय पत...
15/02/2023

ज्ञानविलास आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याची विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्धी केल्या बद्दल परिसरातील सर्व आदरणीय पत्रकार मंडळींचे मनःपूर्वक धन्यवाद......

Address

Nagar/Kalyan Road
Otur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vilas Tambe College Of Education, Otur, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Vilas Tambe College Of Education, Otur, Pune:

Share