priyadarshani institute of pharmaceutical sciences and research,kasegaon

  • Home
  • India
  • Pandharpur
  • priyadarshani institute of pharmaceutical sciences and research,kasegaon
Directions Website

priyadarshani institute of pharmaceutical sciences and research,kasegaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from priyadarshani institute of pharmaceutical sciences and research,kasegaon, College & University, Kasagaon anvali by-pass Road , Kasegaon, Pandharpur.

06/05/2026

प्रियदर्शनी इन्स्टिट्यूटमध्ये करिअर मार्गदर्शन सेमिनार उत्साहात संपन्न
जिद्द, चिकाटी आणि सातत्यानेच यश मिळते : सुहास राजेभोसले”
प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुहास राजेभोसले सर आणि दुष्यंत राजेभोसले सर, सौ. शिवांजली राजेभोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक मा. संग्राम वसंतनाना देशमुख होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. राही संग्राम देशमुख, संस्थेचे सचिव सज्जनराव शिवाजीराव मोरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना योग्य दिशादर्शन मिळावे आणि त्यांच्या करिअर निवडीबाबत स्पष्टता निर्माण व्हावी, हा या सेमिनारचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
मुख्य मार्गदर्शक सुहास राजेभोसले यांनी बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना विविध शैक्षणिक शाखा आणि करिअरच्या संधींबाबत माहिती दिली. त्यांनी फार्मसी, मेडिकल, नर्सिंग, इंजिनिअरिंग, बीएससी अ‍ॅग्री, आर्ट्स, कॉमर्स, आयटीआय आणि हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रांतील शिक्षणाच्या संधी स्पष्ट केल्या. यासोबतच MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांद्वारे मिळणाऱ्या संधींबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी विशेषतः फार्मसी क्षेत्रातील वाढत्या संधींवर प्रकाश टाकत सांगितले की, आजच्या काळात फार्मसी क्षेत्रात संशोधन, उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, मार्केटिंग आणि हॉस्पिटल फार्मसी अशा विविध पदांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
मार्गदर्शन करताना त्यांनी मुलींना विशेष संदेश देत सांगितले की, आजचा काळ बदललेला असून मुलींनीही उच्च शिक्षण घेऊन स्वतःची ओळख निर्माण करावी. तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा योग्य आणि सकारात्मक वापर करावा, नवीन संशोधनासाठी उत्सुकता ठेवावी आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात जाण्यास घाबरू नका, नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आयुष्यात मोठे ध्येय निश्चित करा. एकलव्याप्रमाणे जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवून आपल्या ध्येयासाठी प्रयत्नशील राहा. स्वतःचे लक्ष्य ओळखा आणि त्याच्या पूर्ततेसाठी अखंड परिश्रम करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
दुष्यंत राजेभोसले सर यांनीही विद्यार्थ्यांना करिअर निवडीमध्ये आत्मविश्वास, नियोजन आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. या संवादामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते.
अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा मिळते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

25/04/2026
20/02/2026

PIPSR, KASEGAON

Address

Kasagaon Anvali By-pass Road , Kasegaon
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when priyadarshani institute of pharmaceutical sciences and research,kasegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share