08/04/2026
*डॉ. आनंद पाथ्रीकर यांना शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल “एजुकॉन-2026” पुरस्कार*
परभणी येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांना “एजुकॉन-2026” या प्रतिष्ठित शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते डॉ. आनंद पाथ्रीकर यांना पुरस्कार, मानपत्र - स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढ, संशोधनाला चालना आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळेयांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या भाषणात डॉ. पाथ्रीकर यांच्या कार्याचे कौतुक करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या योगदानाचे विशेष उल्लेख केले.डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी शिक्षण, संशोधन व शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता, उद्योगसहभाग, संशोधन प्रकल्प, तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून त्यांनी अनेक संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. नवभारत समूहाच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. या उल्लेखनीय यशाबद्दल म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस श्री सतीशभाऊ चव्हाण, सहसचिव श्री अनिलभाऊ नखाते तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री संग्रामभैया जामकर, श्री स्वराजसिंह परिहार, श्री रणजीत काकडे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.तसेच शैक्षणिक क्षेत्रातून तसेच समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.