Late Sow. Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya, Parbhani

Late Sow. Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya, Parbhani Our Mission- Women Empowerment In 2016, the Nutan Vidya Mandir Education Society has completed its centenary year. It is the first women’s college in Parbhani. A.

Late Sow Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya, Parbhani is a resplendent gem in the incredible history of Nutan Vidya Mandir Education Society, Parbhani, a hundred years old institution established during pre-independence era in the year 1916 with the noble cause of catering to the educational needs of denied and depressed classes of the social strata. Late Sow Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya

, Parbhani was incepted during June 1983 under the leadership of the visionary leader Bharat Bhushan Late Shri Raosahebji Jamkar, former Minister of States, Government of Maharashtra and his comrades, Subhedar Bandhu and others including freedom fighters of Marathwada Liberation Movement who strived to liberate Marathwada region from the brutal tyranny of the Nizam rule. Late Shri Raosaheb Jamkar, Former Minister of States, Maharashtra, had been one of the pillar strengths shaping the Constitution of the Nutan Vidya Mandir Education Society, Parbhani. Late Sow Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya is the manifestation of his socially and intellectually fostered desire to bring women of the so-called backward region of Parbhani area to the mainstream with a vision based on equality for women. Parbhani is renowned as one of the districts of Marathwada region that is supposed to be lagging behind in overall development in comparison with the rest of the Maharashtra State. Late Shri Raosaheb Jamkar was quite aware of the trailing status of Parbhani district due to traditional set up, hence, he came out prominently with his inventive perception for the benefit of women of the district and laid foundation of the First Women’s College in Parbhani. He realized his dream through the inception of this women’s college in the city of Parbhani during June 1983 that has been later named as Late Sow Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya in the memory of his wife, Late Sow Kamaltai Jamkar. Late Sow Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya is about to step in its fortieth successful year devoted to the noble cause of disseminating higher education to women of the area to achieve the mission of Women Empowerment. The institution has gained immense popularity being the prime teaching-learning institute entirely devoted to the upliftment of women’s education. With this substantially gained status, it aspires to face 4th NAAC accreditation cycle. Since its inception it has achieved milestones in the field of education by creating complete personalities as the continuum of its vision. Late Sow Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya, Parbhani plays a vital role in transforming women as empowered citizens and entrepreneurs tuned to the demand of the enormous changes in the world scenario. Initially, started with B. and B. Com. programmes. The institution now runs 4 UG (B. A., B. COM., B. C. VOC. (Fashion Technology)) and 4 PG (M.A. (Music), M Sc (CS), M. Com, M. Voc (Fashion Technology) programmes. This move has added feather to the crown of the institution as the most applauded academic programmes by the community as well as the experts. Moreover, employability-oriented courses like Fashion Designing (COC), Home Science, Music, Yoga, Arabic Language, Writing Skills, Spoken English etc. rationally contribute in transforming the students into employable citizens of the society. Furthermore, value added courses, certificate courses and add-on courses also are better options for the girl students of the area. In all, the institution runs 4 UG, 4 PG and 27 Diploma/Certificate Courses, 3 certificate courses in collaboration with CASI Global Academy and SWAYAM Online Courses during the last five years. Institution received 2f and 12B from UGC. In the year 2015-16 institution has been awarded College with Potential for Excellence (CPE) status from UGC. Institution has been accredited in first cycle with B+ Grade (2004), in second cycle with ‘A’ Grade with 3.02 CGPA (2013) and in third cycle with B++ with 2.92 CGPA (2018). Institution received Best College Award by affiliating University in the year 2012-13. It has been enlisted as a Lead College by affiliating University. The institution possesses noble thoughts for the welfare of the society.

24/05/2026

🎓✨ उज्ज्वल भविष्यासाठी योग्य पाऊल…!

🌸 *कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी*🌸

📢 *शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी प्रवेशपूर्व नाव नोंदणी सुरू…!*

बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी सुवर्णसंधी…!
उच्च शिक्षणासाठी सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व आधुनिक सुविधा असलेले परभणी शहरातील नामांकित महिला महाविद्यालय आपल्या सेवेत…!

💫 *उपलब्ध अभ्यासक्रम*💫

📚*पदवी अभ्यासक्रम (UG Degree)*
🔹 बी. ए. (B.A.)
🔹 बी. कॉम. (B.Com.)
🔹 बी. सी. ए. (B.C.A.)
🔹 बी. व्होक. फॅशन टेक्नॉलॉजी (B.Voc Fashion Technology)

🎓 *पदव्युत्तर अभ्यासक्रम (PG Degree)*

🔹 एम. ए. (M.A.)
विषय – मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, संगीत व गृहविज्ञान

🔹 एम. कॉम. (M.Com.)
🔹 एम. एस्सी. संगणक विज्ञान (M.Sc. Computer Science)
🔹 एम. व्होक. फॅशन टेक्नॉलॉजी (M.Voc Fashion Technology)

📚*दूरशिक्षण अभ्यासक्रम (YCMOU)*

🔹 बी. ए. (B.A.)
🔹 बी. कॉम. (B.Com.)
🔹 एम. ए. (M.A.)

📚*डिप्लोमा अभ्यासक्रम*

🔹 फॅशन टेक्नॉलॉजी – १ वर्ष
🔹 फॅशन टेक्नॉलॉजी अॅडव्हान्स – २ वर्ष
🔹 फॅशन डिझायनिंग – १ वर्ष
🔹 ब्युटिशियन कोर्स – १ वर्ष

🌟 *महाविद्यालयाची वैशिष्ट्ये*🌟

✅ अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग
✅ उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण
✅ सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा
✅ विद्यार्थिनींसाठी सुरक्षित परिसर
✅ स्वतंत्र मुलिंचे चे वसतिगृह
✅ लेडीज जिम व इनडोअर स्पोर्ट्स हॉल
✅ संगणक कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✅ सांस्कृतिक,क्रीडा व व्यक्तिमत्व विकास उपक्रम
✅ उज्ज्वल निकालाची गौरवशाली परंपरा

🌱 प्रिय विद्यार्थिनींनो,
तुमच्यातील क्षमता ओळखा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी योग्य शिक्षणाची साथ निवडा.
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.

📚 बारावी नंतर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी Google Form भरून आपली नाव नोंदणी करावी.
https://forms.gleB7YtzMs9ieHpNXam7

🖊️ आजच नोंदणी करा…!
फक्त लिंक वर क्लिक करा व
✨ आपल्या स्वप्नांना यशाची नवी दिशा द्या…!
संपर्क- प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे

मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अरुण पडघन यांना Ph.d पदवी नुकतीच प्राप्त झाली. त्याबद्दल संस्थेचे सचिव मा.विजयराव जामकर साहे...
23/05/2026

मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. अरुण पडघन यांना Ph.d पदवी नुकतीच प्राप्त झाली. त्याबद्दल संस्थेचे सचिव मा.विजयराव जामकर साहेब व संचालक मा.संग्रामभैया जामकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित प्राचार्य, डॉ. रामचंद्र भिसे सर

प्रा. विठ्ठल कांगणे सर संचालक, स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी, परभणी यांनी आज महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी...
12/05/2026

प्रा. विठ्ठल कांगणे सर संचालक, स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी, परभणी यांनी आज महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक उपक्रम कसे राबवता येतील, यावर या चर्चेत भर देण्यात आला.

08/05/2026

BCA / M.Sc. तसेच इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
📚 अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करा.
+91 9579399593

मा. ॲड. बाळासाहेब जामकर साहेब नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी चे सन्माननीय संचालक, परभणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध...
08/05/2026

मा. ॲड. बाळासाहेब जामकर साहेब नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था, परभणी चे सन्माननीय संचालक, परभणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे व कर्मचारी वर्ग
साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

महाविद्यालयाने १२ वी पास विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून खालील अभ्यासक्रमां...
05/05/2026

महाविद्यालयाने १२ वी पास विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून खालील अभ्यासक्रमांसाठी नाव नोंदणी सुरू आहे. तुम्ही खालील लिंक चा वापर करून नाव नोंदणी करू शकता.
https://forms.gle/XjaQV18mQznhYDTg7

१ मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आज महाविद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. सकाळी ठीक ७:५० वाजता महाविद्यालय...
01/05/2026

१ मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आज महाविद्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. सकाळी ठीक ७:५० वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन-           या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राम...
30/04/2026

• राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन-
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे व प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अरुण पडघन, मराठी विभाग प्रमुख यांना आमंत्रित केले होते. प्रसंगी प्रा. अरुण पडघन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाज सुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता व बंधुभाव इत्यादि पैलू उलगडले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांच्या वतीने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रवींद्र इंगळे यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यामुळे आणि त्यांच्या विविध पैलूंचा अभ्यास होऊन प्रेरणा मिळते असे मत व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रवींद्र इंगळे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

• ज्ञान वाढवून जगाला देण्यासाठी सावित्री ज्योती सारखं स्त्री शिकली पाहिजे- डॉ.प्रल्हाद लुलेकर.        जगाकडे नीट पाहण्या...
29/04/2026

• ज्ञान वाढवून जगाला देण्यासाठी सावित्री ज्योती सारखं स्त्री शिकली पाहिजे- डॉ.प्रल्हाद लुलेकर.

जगाकडे नीट पाहण्याची दृष्टी देणार शिक्षण आज काळाची गरज आहे.छत्रपती शिवरायांनी शहाजी राजेंच्या निधना नंतर राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेबांना सती जाण्यापासून रोखले.जिजाऊंनी राजे शिवबांना शिक्षणासह संस्कार दिले.सावित्री ज्योतीबांनी इंग्रजी सह मराठी भाषेतून समाजातील अनिष्ट, रुढी,प्रथा, परंपरा नाकारत शिक्षण परंपरेत पुरुषांच्या बरोबरीनं‌ स्त्री शिक्षणाला महत्त्व देत समताधिष्ठित जगा सह लोकजीवनात वास्तवाचं भान निर्माण केल.त्या काळातही ज्या मुली,महिला लेखन करत त्यांना सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुले पंचवीस रुपयांचे बक्षिस देवून प्रोत्साहन देत असत. स्त्री शिक्षणाच्या साठीची आस्था आज दिसून येत नाही.वर्तमान काळात ज्योतीराव असते तर त्यांनी शासनाकडे महाविद्यालय आणि विद्यापीठ बंद करण्याची मागणी केली असती असे अभ्यासपूर्ण मत मांडत डॉ.आशा सोपानराव गीरी लिखित अण्णाभाऊंच्या
कथानायिका समीक्षात्मक लेखन आणि नक्षी कविता संग्रह वाचक अभ्यासकांना नवा विचार देत साहित्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन प्रदान करणारा आहे असे मत विमोचन समारंभात उदघाटक म्हणून डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी मांडले.
कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी येथील कमलताई जामकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हेमंतराव जामकर (अध्यक्ष नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था, परभणी) उदघाटक जेष्ट साहित्यिक विचारवंत डॉ प्रल्हाद लुलेकर ( माजी परीक्षा नियंत्रक , मराठी विभाग प्रमुख डॉ.बा.आं.मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर ) पुस्तकावर भाष्य करणारे भाष्यकार डॉ.केदार काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ) प्रमुख अतिथी विजयराव जामकर (सचिव ,नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था, परभणी.) नूतन विद्या मंदिर शिक्षण,
संस्थेचे संचालक सौ.कविता ताई सुभेदार, ॲड.मंगेशराव सुभेदार, सदस्य सौ.मृणालताई सुभेदार , डॉ.मिनाताई टाकळकर, के.एस अतकरे (कैलास पब्लिकेशन , छत्रपती संभाजी नगर) डॉ.विठ्ठल भंडारे ( संस्थापक अध्यक्ष, साहित्यसम्राट, अण्णाभाऊ साठे परिषद महाराष्ट्र राज्य.), प्रस्तुत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले (माजी परीक्षा नियंत्रक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.) डॉ.सुर्यकांत देशमुख (संचालक, परभणी आय.सी.यू, परभणी ) प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे, व्यासपीठावर सोपानराव गीरी,सौ.प्रभावती गीरी,डॉ.आत्माराम पुरी, प्रा.डॉ.आशा पुरी,प्रा.अरुण पडघन ( मराठी विभाग, प्रमुख ) आदींची उपस्थिती होती.
प्रसंगी सावित्रीबाई फुले आणि कै.सौ. कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
हेमंतराव जामकर यांचे हस्ते डॉ.प्रल्हाद लुलेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉ.आशा गीरी यांनी प्रास्ताविक केले.डॉ.विठ्ठल भंडारे यांनी दोन्ही पुस्तकावर भाष्य करत आशा गीरी यांच्या लेखनाचे वेगळे पण मांडले.प्रा.डॉ.केदार काळवणे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्यकृतीचा आढावा घेत आशा गीरी लिखित पुस्तकांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
डॉ.आशा गीरी यांच्या पुस्तक लेखना बाबत शुभेच्छा देत विजयराव जामकर यांनी कौतुक केले.डॉ.आशा गीरी यांनी अधिकाधिक दर्जेदार लेखन करावे या साठी प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.या वेळी सौ.प्रभावती आणि सोपानराव गीरी, डॉ.आशा गीरी आणि डॉ आत्माराम पुरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे यांनी अध्यक्षीय समारोपात मान्यवरांच्या मतांचा आढावा घेत.डॉ.आशा गीरी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य सांगत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, मित्रमंडळी, नातेवाईक यांची उपस्थिती व योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण पडघन यांनी केले तर आभार डॉ.आशा गीरी यांनी मानले.

29/04/2026

प्रा.डॉ. आशा गिरी लिखित 'नक्षी'आणि 'अण्णाभाऊंच्या कथानायिका' या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा...

Address

Dargha Road
Parbhani
431401

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late Sow. Kamaltai Jamkar Mahila Mahavidyalaya, Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share