PES's Bhausaheb Nene College

PES's Bhausaheb Nene College Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PES's Bhausaheb Nene College, College & University, PES's Bhausaheb Nene College Behind Pen Private Highschool, Dist. Raigad, Pen.

Pen Education society was established in 1990 with the motto 'सा विद्या या विमुक्तये' which means that,education should be available to all.Pen Education Society established Arts,Science and Commerce Senior College in July 1990.

23/12/2025

भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव 'मैत्रेय -२०२५' ची रंगीत तालीम...😍😊

*भाऊसाहेब नेने महाविद्यालयात महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा!*          पे. ए. सो. च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात गु...
21/07/2025

*भाऊसाहेब नेने महाविद्यालयात महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा!*

पे. ए. सो. च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात गुरूवार दि. २६ जून रोजी आषाढ महिन्यातील पहिला दिवस अर्थात महाकवी कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने लेखिका, संशोधक असलेल्या दिपाली पटवाडकर यांच्या 'भारतीय साहित्याचा भारताबाहेरील प्रवास' या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सदानंद धारप,विविध क्षेत्रांतील जाणकार श्रोते, विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संस्थेचे अध्यक्ष अॅड मंगेश नेने यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सुरूवातीला महाविद्यालयाच्या वार्षिकांक 'प्रतिबिंब'चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यानंतर प्राचार्य डॉ सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकाला सुरूवात करताना छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. कवी कालिदास दिन दरवर्षी साजरा करण्यामागे ,जगाच्या इतिहासावर अमीट ठसा उमटवलेल्या आपल्या महत्तम भारतीय संस्कृतीची महती विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविणे, त्यांना या संस्कृतीच्या संवर्धनासाठी प्रेरित करणे हे प्रमुख प्रयोजन असल्याचे प्राचार्यांनी यावेळी सांगितले.
तर प्रमुख वक्त्या लेखिका दिपाली पटवाडकर यांनी भारतीय संस्कृतीतील ग्रंथ, मंदिरे, शिलालेख, लेणी, देवता आदी स्वस्ती चिन्हांचा परिचय देत ही चिन्हे भारतीय संस्कृतीचा आत्मा असल्याचे सांगुन विविध माध्यमातून या सृजनाच्या पाऊलखुणा जगभर कशा पसरल्या हे सांगताना पंचतंत्र, रामायण-महाभारत, जातककथा, कवी कालिदासाचे रघुवंश आदी साहित्याचा संदर्भ देऊन विविध देश आणि भाषांत त्यांच्या झालेल्या स्थित्यंतराच्या कथा रंजकतेने पी पी टी च्या माध्यमातून उलगडून सांगितल्या. नंतर श्रोत्यांच्या शंकांचे वक्त्यांकडून निरसन केले गेले. महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. देवीदास बामणे यांनीही कवी कालिदासावर आधारित स्वरचित कवितेचे सादरीकरण यावेळी केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देवीदास बामणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राधिका गोंधळी यांनी केले. सांस्कृतिक विभागाने सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

25/06/2025
*नेने महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा..!*        पे. ए. सो च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात मंगळवार, दि. २४ ...
25/06/2025

*नेने महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा..!*

पे. ए. सो च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात मंगळवार, दि. २४ जून रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डी. एल. एल. ई युनीट यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने अॅड विवेक भोपी यांच्या विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप, पेण पोलिस स्टेशनचे पी. एस. आय मा. रसाळ, मा. घरत, सी. एफ. आय च्या कार्यक्रम अधिकारी सौ. अक्षता सावंत, नेने महाविद्यालयातील रा. से. यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.तुकाराम माळवे, प्रा.डॉ. सुभाष लकडे, प्रा.सायली पितळे, डी. एल. एल. ई चे समन्वयक प्रा. डॉ. देवीदास बामणे, विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात अंमली पदार्थांचे वाढते सेवन हा एक प्रकारचा आजार असल्याचे सांगत, या आजाराने समस्त तरूण पिढीला ग्रासले असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रयत्न पूर्वक स्वत:ला व्यसनांपासून दूर ठेवून शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी चांगले आचार-विचार, योगासने आदीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तर प्रमुख वक्ते अॅड.विवेक भोपी यांनीही व्यसनाचे विविध प्रकार, माध्यमे, त्याचे शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम आणि व्यसनांपासून मुक्तीचे मार्ग आदी संदर्भात सखोल माहिती दिली. त्यांनीही विद्यार्थ्यांना शरीर व मन सुदृढ राखण्याचे आवाहन केले. यानंतर उपस्थितांच्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. तुकाराम माळवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. देवीदास बामणे यांनी केले.

नेने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन  उत्साहात साजरा!     पे. ए. सो. च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा...
23/06/2025

नेने महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

पे. ए. सो. च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना ,जिमखाना विभाग व डी. एल. एल. ई युनीट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २१ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी योग अभ्यासक डॉ.अशोक भोईर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदानंद धारप, IQAC प्रमुख डॉ.बी.एम.शिकारे,जिमखाना प्रमुख डॉ.विनोद भाबड, रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ.तुकाराम माळवे, डॉ.सुभाष लाकडे, प्रा.सायली पितळे, डी. एल. एल. ई युनीट चे समन्वयक डॉ.देवीदास क. बामणे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. गिरीश उपाध्ये,विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

प्राचार्य डॉ.सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात योग दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा देत, योग ही आपली प्राचीन परंपरा असून त्या योगे आपली आत्मजागृती होऊन शारीरिक व मानसिक संतुलन राखले जाते,अशा शब्दांत योगाचे महत्त्व विशद केले. यावेळी प्राचार्यांनी नियमित योगासनांचा अवलंब करून कायम सुदृढ राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यानंतर प्रमुख अतिथी डॉ. अशोक भोईर यांनी प्राचार्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत अष्टांगयोग,सूर्यनमस्कार,प्रणवाचा जप आदीं चे महत्त्व प्रात्यक्षिकांतून विशद केले.यावेळी उपस्थित सर्वांनी अतिथींसोबत योगासनांचा आनंद लुटला. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुकाराम माळवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.देवीदास क. बामणे यांनी केले.

19/09/2024

नेने महाविद्यालयात स्त्री चैतन्यशक्तीवरील व्याख्यानात डॉ. मैथिली सावंत यांनी अंतरंगात दडलेल्या चैतन्यशक्तीला जागृत करून स्वत:ला कणखर कसे बनवायचे, हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले.

नेने महाविद्यालयात स्त्री चैतन्यशक्तीवर व्याख्यान संपन्न..!       पे.ए.सो च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात महिला विकास क...
19/09/2024

नेने महाविद्यालयात स्त्री चैतन्यशक्तीवर व्याख्यान संपन्न..!

पे.ए.सो च्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे स्त्री मध्ये असणाऱ्या चैतन्यशक्तीचा परिचय करून देऊन तिला सर्वार्थाने सक्षम बनविण्याच्या हेतूने शुक्रवार,दि.३०ऑगस्ट रोजी 'स्त्री उर्जा-एक चैतन्यशक्ती' या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी डॉ. मैथिली सावंत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, संस्थेचे अन्य पदाधिकारी, नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप, महिला विकास कक्षाचे प्रमुख प्रा. ए. झेड. आझमी, कला विभाग व इतिहास विभागप्रमुख डॉ. यु. ए. खाडिलकर, महिला विकास कक्षाच्या सदस्या डॉ. एच्. ए. सावंत, विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात मूळातच उर्जा ही दैवी संकल्पना असल्याचे सांगत स्त्री हा चैतन्याचा स्त्रोत असून या चैतन्याला जागृत करून प्रत्येक स्त्री ने स्वत:ला कणखर बनवावे, असे आवाहन केले. यानंतर प्रमुख वक्त्या डॉ. मैथिली सावंत यांनी श्रोत्यांसोबत संवाद साधताना स्त्री आणि पुरूष या दोघांतही प्रचंड उर्जा सामावली असल्याचे सांगत सशक्त जीवन जगण्यासाठी दोघांनाही आपल्या अंतरंगातील उर्जेचा शोध घेऊन त्याचा सकारात्मक उपयोग करता येणं गरजेचं असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अंतरंगात दडलेल्या चैतन्यशक्तीला जागृत करून स्वत:ला कणखर कसे बनवायचे हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून दिले. यादरम्यान काही श्रोत्यांना आलेला अलौकिक अनुभव त्यांनी इतरांना उलगडून सांगितला. यानंतर अध्यक्षीय मनोगतात अ‍ॅॅड. मंगेश नेने यांनी इतिहासातील स्त्री चैतन्याचे दाखले देत प्रत्येक स्त्री ने स्वत:चा शोध घेण्यासाठी स्व:मधील उर्जेचा सुयोग्य वापर केला पाहिजे,असे मत व्यक्त केले.

यानंतर आभारप्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आभारप्रदर्शनात डॉ. खाडिलकर यांनी प्रमुख वक्त्यांचे आभार मानत सदर व्याख्यानामुळे स्वत:कडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पुनम चव्हाण हिने, आभार प्रदर्शन डॉ. यु.ए.खाडिलकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. एच. ए. सावंत यांनी करून दिला.

Address

PES's Bhausaheb Nene College Behind Pen Private Highschool, Dist. Raigad
Pen
402107

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when PES's Bhausaheb Nene College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to PES's Bhausaheb Nene College:

Share