02/08/2026
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनिया ॥
तुळशीहार गळा कांसे पितांबर ।
आवडे निरंतर हेचि ध्यान ॥
---संत श्री तुकाराम महाराज
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात स्वागत
तरडगाव, दि. २ ऑगस्ट २०२६ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या परतीच्या पालखी सोहळ्याचा आज रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे सौ वेणुताई चव्हाण ज्युनिअर कॉलेज तरडगाव येथे विसावा झाला. या पावन प्रसंगी श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तरडगाव यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
या स्वागत सोहळ्यास संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव मा. डॉ. श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या सदस्या सौ. ज्योती सचिन सूर्यवंशी ( बेडके), संस्थेचे सदस्य श्री. महेंद्र भैय्या सूर्यवंशी (बेडके), तसेच कु. शर्मदा सचिन सूर्यवंशी (बेडके)आणि चि. रिद्धिमान सचिन सूर्यवंशी (बेडके) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन चरणी वंदन केले.
प्राचार्या सौ. काकडे एस. जी. मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षक श्री. निंबाळकर सर तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. डांगे सर यांच्या सहकार्याने स्वागत सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
पालखीच्या स्वागतासाठी प्रशालेच्या प्रवेशद्वारासमोर सौ. मोरे मॅडम, सौ. झोरे मॅडम, सौ. गवळी मॅडम आणि सौ. देशपांडे मॅडम यांनी आकर्षक व भक्तिमय रांगोळी साकारली. फुलांची उधळण, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभागातून वारकरी परंपरेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
"अवघाची संसार सुखाचा करीन|आनंदे भरीन तिन्ही लोक||
जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेरा आपुलिया!!"
---संत श्री ज्ञानेश्वर महाराज
भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा संदेश देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. याप्रसंगी माऊलींच्या दिंडीच्या विश्वस्तांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आदरणीय सविता काकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव मा.डॉ. श्री सचिन सुभाषराव सूर्यवंशी ( बेडके) ,त्याचप्रमाणे संस्थेच्या सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्या सौ. काकडे एस जी मॅडम पर्यवेक्षक श्री. निंबाळकर सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. डांगे सर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच संस्थेच्या पदाधिकारी यांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न झाले.
ालखीसोहळा_तरडगाव