Nowrosjee Wadia College Official

Nowrosjee Wadia College Official To provide a holistic all round education to our young generations of students

सर परशुराम महाविद्यालय येथे पार पडलेल्या “परशुरामीय क्रिकेट करंडक”२०२६ या क्रिकेट स्पर्धेमध्ये नौरोसजी वाडीया महाविद्याल...
12/02/2026

सर परशुराम महाविद्यालय येथे पार पडलेल्या “परशुरामीय क्रिकेट करंडक”२०२६ या क्रिकेट स्पर्धेमध्ये नौरोसजी वाडीया महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन

*नौरोसजी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा**महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित महाराष्ट्र राज्य न...
10/02/2026

*नौरोसजी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*

*महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित महाराष्ट्र राज्य नाट्य एकांकिका स्पर्धेत वाडिया महाविद्यालयास दुसरे पारितोषिक*

प्रथम महाराष्ट्र राज्य नाट्य एकांकिका स्पर्धा 2026 (पुणे विभाग) मध्ये नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या “नाचसोहळा” एकांकिकेला सांघिक द्वितीय क्रमांक मिळाला. त्यासोबतच नैपथ्य प्रथम क्रमांक (ऋषिकेश बागवे आणि पौर्णिमा काकडे), वेशभूषा प्रथम क्रमांक (कृत्तिका कांबळे), प्रकाश योजना प्रथम क्रमांक (अथर्व ढेबे), अभिनय नैपुण्य (आदित्य परतूडकर) ही पारितोषिके देखील महाविद्यालयाने पटकावली.

महाविद्यालयाच्या या अभिमानास्पद यशात आपल्या संस्थेचे मा. विश्वस्त प्रा. सचिन सानप व प्रा. डॉ. अशोक चांडक, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुभाष अहिरे आणि प्रा. डॉ. समिना बॉक्सवाला काळे यांच्या विशेष सहकार्य आणि मार्गदर्शनाबद्दल खूप आभार.
सांस्कृतिक समन्वयक प्रा. डॉ. हनुमंत लोखंडे आणि संपूर्ण टीम, तसेच सर्व सहभागी विद्यार्थी यांच्या अथक आणि कठोर मेहनतीबद्दल खूप अभिनंदन.💐💐

*नौरोसजी वाडिया महाविद्यालयामध्ये दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले ...
01/02/2026

*नौरोसजी वाडिया महाविद्यालयामध्ये दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.*

या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले उच्चपदस्थ असलेले सन्माननीय विद्यार्थी *श्री. सुधीर देवरे, माजी परराष्ट्र सचिव, भारत सरकार. श्री. सतिंदर पाल वालिया, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू, श्री. राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे पोलीस* हे उपस्थित होते त्यांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.

तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी ज्यांनी आत्ताच पार पडलेल्या *पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवले त्या सर्व नगरसेवकांना* महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

या स्नेह मेळाव्याला संस्थेतील व महाविद्यालयातील *माजी प्राचार्य डॉ. महेश अंडार, प्राचार्य डॉ. ऍस्टन, प्रा. डॉ. पि. के. पटेल यांच्यासह अनेक माजी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी* आवर्जून उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे *विश्वस्त डॉ. अशोक चांडक, प्रा. सचिन सानप व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. भारत बहुले* यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत केले.

तसेच मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी या स्नेह मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते.

30/01/2026

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित (दादा) अनंतराव पवार यांचे दि. 28 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले. आज महाविद्यालयामध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वर्गीय अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महाविद्यालयातील प्रत्येक जण स्वर्गीय अजित दादांच्या आठवणीत भावूक झाला होता. जनसेवा, नेतृत्व आणि समर्पणाने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि समाजासाठी एक अमूल्य वारसा आहे. त्यांचे योगदान सदैव स्मरणीय राहील आणि त्यांच्या स्मृती नेहमी प्रत्येकाच्या हृदयात कायम जिवंत राहतील.

ॐ शांति 🙏

26/01/2026

चला, भारतीय संविधानिक मूल्यांचा सन्मान करूया, राष्ट्रीय एकता व एकात्मता जपूया आणि आपली लोकशाही अधिक बळकट करूया!
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! समस्त देशवासीयांना भारतीय गणराज्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Honouring the spirit of our Constitution and the values that bind us as one nation. Let’s continue to strengthen our democracy and progress. Happy Republic Day!

23/01/2026

💫Once a Wadian, Always a Wadian!💫






homecoming
nostalgia
collegereunion
alumnireunion

Address

19, Late Prin. V. K. Joag Path, Wadia College Campus, Pune –
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nowrosjee Wadia College Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Nowrosjee Wadia College Official:

Share