23/06/2026
💻🇮🇳 डिजिटल शक्ती अभियान २०२६ 🇮🇳💻
"स्वातंत्र्यदिन समारंभ २०२६" निमित्त महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी उपक्रम!
एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डिझाईन, अॅनालिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी विभाग तसेच संजीवनी स्वयंरोजगार सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय संगणक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
✨ कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
🔹 संगणक साक्षरता प्रशिक्षण
🔹 डिजिटल कौशल्यांचा विकास
🔹 सायबर सुरक्षा जागरूकता
🔹 महिलांचे डिजिटल सक्षमीकरण
🔹 राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागासाठी प्रेरणा
📅 दिनांक: २७, २९ व ३० जून २०२६
📍 स्थळ: एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी
🌸 सर्व इच्छुक महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
"डिजिटल साक्षर महिला – सक्षम कुटुंब, सक्षम समाज, सक्षम राष्ट्र!"