PDEA's College Of Engineering, Manjari Bk., Hadapsar , Pune

  • Home
  • India
  • Pune
  • PDEA's College Of Engineering, Manjari Bk., Hadapsar , Pune

PDEA's College Of Engineering, Manjari Bk., Hadapsar , Pune PDEA'S COEM Is An Educational Institute Having 5 Different Engineering Branches, MBA And Many Circ

*Pune District Education Association's College Of Engineering Manjari Is An Educational Institute Having 5 Different Engineering Branches And Many Circular Activities....!!!

01/08/2026
मा.अजितदादा पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मांजरी गावात स्वच्छता व प्लास्टिक संकलन अभियान संपन्न पुणे जिल्हा शिक्षण मंडळ...
30/07/2026

मा.अजितदादा पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्त मांजरी गावात स्वच्छता व प्लास्टिक संकलन अभियान संपन्न

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २९ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी (बु.) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मांजरी गावात स्वच्छता व प्लास्टिक संकलन अभियान उत्साहात राबविण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या सहकार्याने पार पडला.
कार्यक्रमादरम्यान स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसर निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांना डॉ.आर.के. मोजे यांनी दिला. या अभियानात प्रा.एन.व्ही. गवळी, प्रा. एस.एस. शिरसाट शस, श्री.एस.बी. बोराटे, प्रा.ए.पी. देशमुख, श्रीमती.ए.पी. जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमात ५० हून अधिक राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मांजरी गाव परिसरात स्वच्छता व प्लास्टिक संकलनाचे कार्य केले. स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी भविष्यातही स्वच्छतेचा संकल्प कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न       पुणे, द...
27/07/2026

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

पुणे, दि. २७ जुलै : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बुद्रुक, हडपसर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष मा.ना.अजितदादा पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्त अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहयोगाने भव्य रक्तदान शिबिर व साई केअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, मांजरी बुद्रुक यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.आर.के. मोजे व डॉ.संदीप कराड यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केलेले होते. शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले व मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
याप्रसंगी डॉ. एस.ए. पाटील, प्रा.के.बी. डुंबरे, प्रा.एस.एस. शिरसाट, प्रा. ए.डी. गायकवाड, प्रा.एन. व्ही. गवळी, प्रा. प्रीतम मोडे, श्री.संतोष बोराटे व श्री.अजित गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत, नियमित रक्तदानाद्वारे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, असे सांगितले.
रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. समाजाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी जपत महाविद्यालयाच्या वतीने अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रथम स...
27/07/2026

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यातर्फे दिनांक २६.०७.२०२६ रोजी अल्ट्रारन आरोग्यवारीचे आयोजन करण्यात आलेले होते. आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय खेळाडू श्री. सुहास साळुंखे यांनी ही अल्ट्रारन आरोग्यवारी श्रीमंत दगडूशेठ गणपती, पुणे ते बारामती हे १०० किमी अंतर १३ तास २९ मिनिटमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले.
माननीय आमदार सुनील शेळके (मावळ विधानसभा) यांच्या शुभहस्ते श्री. सुहास साळुंखे यांना गौरविण्यात आले. आपल्या महाविद्यालयातर्फे श्री.सुहास साळुंखे यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.

*महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्...
20/07/2026

*महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या जयंतीनिमित्त अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व प्लास्टिक संकलन अभियान*

मांजरी (बु.), दि. २० जुलै २०२६ : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष मा. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी (बु.) येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व प्लास्टिक संकलन अभियान उत्साहात राबविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात डॉ.एस.ए. पाटील, प्रा. एम.पी. रणनवरे, प्रा. एन.व्ही. गवळी (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी), प्रा.एस. एस. शिरसाठ, प्रा.जी. एन. जगदाळे, प्रा.ए. पी. देशमुख, श्रीमती अनिता जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गायत्री चव्हाण, ओंकार गावळी, पार्थ फुले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमात महाविद्यालय परिसरात कदंब, अर्जुन, रबर प्लांट यांसारख्या पर्यावरणपूरक वृक्षांची तसेच विविध रंगांच्या गुलाब, कलांचो (Kalanchoe) व इतर शोभिवंत फुलझाडांची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या सर्व रोपांचे नियमित संवर्धन करून परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
याचबरोबर महाविद्यालय परिसरात प्लास्टिक संकलन अभियान राबवून परिसर प्लास्टिकमुक्त, स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याचा संदेश देण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि महाविद्यालयीन कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाबाबतची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकाने "एक विद्यार्थी – एक वृक्ष" आणि "प्लास्टिकमुक्त परिसर" या संकल्पनांचा स्वीकार करून पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

17/07/2026

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२६

CDC Meeting | PDEA's College of Engineering, Manjari Bk., PuneThe CDC Meeting was held in the presence of Hon'ble Shri. ...
03/07/2026

CDC Meeting | PDEA's College of Engineering, Manjari Bk., Pune

The CDC Meeting was held in the presence of Hon'ble Shri. Rajendra Ghadge Saheb, Vice-president, PDEA, Pune, Hon'ble Shri. A. M. Jadhav Saheb, Joint Secretary admin, PDEA, Pune, Principal Dr. R. V. Patil Sir, and all committee members.
Key discussions focused on academics, infrastructure, research, and future growth. Faculty and students were felicitated for their achievements.
Grateful for the continued support and guidance.

पीडीईएच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २४ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसत्र संपन्नमांजरी, दि. २४ जून २०२६ : ...
25/06/2026

पीडीईएच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २४ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगसत्र संपन्न

मांजरी, दि. २४ जून २०२६ : पीडीईएच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने २४ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात योगसत्राचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शन व परवानगीने आयोजित करण्यात आला.

या योगसत्राचे मार्गदर्शन योगगुरू श्री. अतुल रासकर (मुक्ता योग केंद्र, पुणे) यांनी केले. त्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक करून नियमित योगाभ्यासाचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना पटवून दिले.

हा कार्यक्रम निसर्ग सृष्टी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या सौ. शशिकला कुंभार (प्रकल्प प्रमुख) तसेच श्री. राजेंद्र कुलकर्णी (व्यवस्थापक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ. एम. पी. बोरावके, राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी प्रा. एन. व्ही. गवळी, प्रा. आर. एम. साहू, प्रा. एस. बी. कांबळे, प्रा. बी. एस. तुपे, प्रा. पी. आर. मोढे, प्रा. डी. कोलते, सौ. ए. पी. जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

योगसत्रात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. नियमित योगाभ्यासातून निरोगी व संतुलित जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Address

Manjari(bk)
Pune
412307

Opening Hours

Monday 10am - 5am
Tuesday 10am - 5am
Wednesday 10am - 5am
Thursday 10am - 5am
Friday 10am - 5am
Saturday 9am - 1:30am

Telephone

+18888776206

Alerts

Be the first to know and let us send you an email when PDEA's College Of Engineering, Manjari Bk., Hadapsar , Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to PDEA's College Of Engineering, Manjari Bk., Hadapsar , Pune:

Shortcuts

Share