An Official Facebook Handle of the MIT School of Food Technology, MIT-ADT University, Pune
🔬 Innovating for a healthier future through Food Science & Technology
🎓 Academic excellence | Industry-driven curriculum | Research & Innovation मी एक "FTL "
कधी लॅब मध्ये प्रॅक्टिकल करणारा,
कधी लेक्चर्स बंक करून बाहेर फिरणारा,
कॉलेज ला लवकर येवो न येवो... पण गॅदरिंग आणि स्पोर्ट्स ला वेळेआधी हजर राहणार
ा,
दोन तीन नोट बुक्स मध्येच कधी वर्षाचा... तर कधी सगळ्या डिग्री चा नॉलेज साठवणारा,
कधी क्लास रूम च्या कॉरीडोर मध्ये उगाच फिरणारा,
तर कधी नोटीस बोर्ड ला गर्दी करून रिझल्ट बघणारा,
लेक्चर मध्ये टीचर ने प्रश्न विचारला तर एक-मेकां मागे लपणारा,
आणि कॉलेज सुटल्यावर मात्र, मस्त, फेसाळता चहा प्यायला 'शांताईला' नाहीतर 'राजला' निघणारा,
संध्याकाळी राज जवळ त्याची/तिची वाट पाहत उभा राहणारा,
नसलंच कुणी वाट पाहण्यासारखं तर उगाच मस्करी करत फिरणारा,
सबमिशन जवळ आलेत कि मग घाईत (ह्याच्या-त्याच्या कडून) जर्नल्स कम्प्लीट करणारा,
आणि एक्झाम्स जवळ आल्या कि "एका रात्रीत करू रे अभ्यास" अशी एक-मेकांची समजूत घालणारा,
शिवजयंतीला सिंहगडाहून रात्रभर मशाल पळवत आणणारा मीच,
आणि गणेशोत्सवाची जोरदार तयारी करून शेवटच्या दिवशी बेभानपणे नाचणाराही मीच,
मी आहे FTL
मी तिथेच आहे..
कधी लेक्चरला, कधी प्रॅक्टिकलमधे तर कधी कुठे ..
मी तुमच्यात आहे, मी सर्वांत आहे,
कधीही शोधा, मी तुम्हाला सापडेन...
"मी नेहमी तिथेच राहीन,
फक्त...दर वर्षी माझा चेहरा असेल नविन......!!"
मी.., एक FTL
--तुमच्यातलाच एक FTL
(स्त्रोत - वर लिहिलेले विचार कॉपी-पेस्ट चा चमत्कार नसून, उत्स्फुर्तपणे सुचलेला अविष्कार आहे आणि इथे तो केवळ ह्या पेज च्या सेवेसाठी लिहिलाय.
त्यामुळे त्या काव्य कल्पनेवर कुणीही आपला हक्क सांगू नये.
आपला आभारी, FTL- 29/08)
Welcome to MIT College of Food Technology! The vision is to take India ahead in the field of Food Processing qualitatively and quantitatively. The college is affiliated to Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri and Maharashtra Council of Agricultural Education and Research, Pune (M.S.). The college offers an undergraduate program leading to B. (Food Technology) a Four years degree course.