Vaadasabha,S.P.College,Pune

Vaadasabha,S.P.College,Pune Debating Union of S. P. College with tradition of over 109 years. It has 100 year old tradition. Vaadasabha also organises Dr P G Sahasrabuddhe Vaktrutva Spardha.

Annual Inauguration of Vaadasbha begins with Lokmanya Tilak's Death Anniversary.

ज्याप्रमाणे एखादी सुंदर वेल असते अन् त्यावर उमललेली सुंदर फुले असतात; सारीच तशी सारखी, पण तरीही खूप वेगळी. तीच वेगळी ओळख...
13/04/2026

ज्याप्रमाणे एखादी सुंदर वेल असते अन् त्यावर उमललेली सुंदर फुले असतात; सारीच तशी सारखी, पण तरीही खूप वेगळी. तीच वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो, तोच त्यांना अधिक सुंदर बनवतो. अशीच एक सुंदर फुलांची सुरेल वेल स्वरांच्या, कलांच्या आधारे फुलत गेली अन् त्यावर सुंदर फुले उमलली. कानांवर सुंदर स्वर पडत कलेचे बाळकडू घेऊनच ही फुले वाढत गेली. त्यातलेच एक फुल म्हणजे आशाताई.
दिनानाथ मंगेशकर या सुरेल वेलीवर वाढलेले एक फुल. लहानपणापासून सुरांशी मैत्री करत, गीतांच्या बोलांवर स्वार होत, त्यांनी त्यांचे जीवनगीत सजवले.
स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला घ्याव्या लागणाऱ्या कष्टांनी त्यांना जिद्दी बनवले. वडिलांचा आधार अकाली जीवनातून हरवल्यामुळे त्यावरील साऱ्याच फुलांना लवकर मोठे व्हावे लागले.
आशाताईंनी देखील खूप लवकर कामास सुरुवात केली, परंतु सुरवातीची काही वर्षे संघर्षाची ठरली. तरीही हार न मानता, गाण्यावरच्या निस्सिम भक्तीने त्यांनी प्रयत्न कधीही सोडले नाहीत. अन् असा दिवस आला की आज असा कोणताही गीत प्रकार नाही जो आशाताई गायल्या नाहीत. संगीत विश्वात असे कोणीही नसेल ज्यांनी आशाताईंचे नाव ऐकले नसेल.
विविध भाषांतून आपला गोड आवाज त्यांनी श्रोत्यांना भेट देत त्यांना सुखी केले. सात दशकांच्या त्यांच्या संगीत प्रवासात त्यांनी बारा हजाराहून अधिक गाणी गायली अन् आपल्या भावपूर्ण गायनाने ऐकणाऱ्याच्या मनात घर केले. त्यांना अगणित पुरस्कारांनी सन्मानित केले गेले, परंतु प्रत्यक्षात आशाताई याच आपल्या साऱ्यांच्या आयुष्यातील सुरेल पुरस्कार आहेत. त्यांनी आपल्या संगीत क्षेत्राला एक वेगळी उंची मिळवून दिली. आपल्या साऱ्या भावनांची सोबत करणारी त्यांची गाणी आहेत. त्यांनी केलेली ही संगीत सेवा कायम सर्व श्रोत्यांच्या अन् या मातीच्या स्मरणात राहील.
अशा या आयुष्यभर सुरांच्या वेलीवर फुललेल्या जीवनगीतास आमचे अभिवादन!

Caption By Vaadasabha Member- Pranjal Katkar
Poster By Vaadasabha Member- Krutika Mali

27/03/2026

नवरस शृंखला - शांत रस 🎭
शांत रस हा मनाची शांतता, समाधान आणि परिपूर्णता दाखवणारा रस. रंगमंचावर पडदा पडतो तेव्हा जाणवते, ती शांतता. हा रस बाकीच्या रसांच्या पलीकडचा, मन शांत करणारा असा रस आहे.
हा रस तिच्या शब्दांत मांडत आहे वादसभा सदस्य वेदिका कण्णव.
आणि या शांत रसासोबत ही नवरस शृंखला आज, जागतिक रंगभूमी दिनानिमित्त पूर्ण होत आहे.
जगाच्या रंगभूमींवर आणि आयुष्याच्या रंगभूमीवरही हे नवरस भावनांचे रंग भरून, त्यांना अर्थ देतात. आणि या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त या नवरसांची केवळ नावे नाही, तर या नवरसांना संपूर्णपणे समजून घेऊन त्यांचे महत्त्व जाणून घेऊया!

#नवरस #नाट्य #शांत

26/03/2026

नवरस शृंखला - अद्भुत रस 🎭
अद्भुत रस हा विस्मय, आश्चर्य निर्माण करणारा रस आहे. शब्दांच्या पलीकडच्या भावना जागृत करून, माणसाला स्तब्ध करतो तो हा रस.
याच अद्भुत रसाचे सौंदर्य मांडत आहे वादसभा सदस्य ईशा बर्वे.✨

#नवरस #नाट्य #अद्भुत

25/03/2026

नवरस शृंखला - बीभत्स रस 🎭
बीभत्स रस घृणा आणि तिटकारा दर्शवितो. या रसामुळे माणूस वाईट व अनैतिक गोष्टींपासून लांब होतो, तर समाजातील चांगल्या मूल्यांची साथ देतो. हा रस वादसभा सदस्य चैत्राली अडके तिच्या शब्दांत मांडत आहे.

#नवरस #नाट्य #बीभत्स

24/03/2026

नवरस शृंखला - भयानक रस 🎭
भयानक रस म्हणजे भीती दर्शविणारा रस. हा रस बऱ्याचवेळा अनिश्चितता आणि अज्ञातता यामुळे निर्माण होतो. या रसाचे मूळ हे बघणाऱ्या दृश्यात असते की आपल्या मनात? याबद्दल आपल्याला सांगत आहे वादसभा सदस्य सुहानी बेंद्रे.

#नवरस #नाट्य #भयानक

23/03/2026

नवरस शृंखला - वीर रस 🎭
वीर रस हा उत्साह, धैर्य आणि आत्मविश्वासाचा रस आहे. हा रस आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी मदतीला धावून येणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीपर्यंत, सगळ्यांमध्ये झळकताना दिसतो.
या रसाचे बळ आपल्याला वादसभा सदस्य भारवी मुळे तिच्या शब्दांत मांडत आहे.✨

#नवरस #नाट्य #वीर

22/03/2026

नवरस शृंखला - रौद्र रस🎭
तीव्र, अस्वस्थ करणारा रौद्र रस, हा केवळ नकारात्मक रस नसून, हा एकमेव असा रस आहे जो विनाश आणि सृजन दोन्हीही घडवू शकतो. या रसाच्या शक्ती बद्दल आपल्याला सांगत आहे वादसभा सदस्य उत्कर्षा निगडे.✨

#नवरस #नाट्य #रौद्र

21/03/2026

नवरस शृंखला - करुण रस 🎭
करुण रस म्हणजे दुःखाचा आणि संवेदनशीलतेचा रस. या करुण रसामुळे येणाऱ्या अश्रूंची माणुसकीच्या रुपात होणारी फुले, ही मानव जीवनासाठी गरजेची असतात.
हा रस आपल्या शब्दांत मांडत आहे वादसभा सदस्य आर्यन पाध्ये.✨

#नवरस #नाट्य #करुण

20/03/2026

नवरस शृंखला - हास्य रस🎭
सगळ्यांना हवाहवासा वाटणारा 'हास्य रस' हा आनंदाचा आणि सुखाचा रस आहे. या रसात फक्त आनंद पसरवणे, मनोरंजन करणे हेच नाही तर सामाजिक बदल आणण्याचे बळ आहे. हा रस तिच्या शब्दात मांडत आहे वादसभा सदस्य प्रांजल काटकर.✨

#नवरस #नाट्य #हास्य

19/03/2026

'नवरस' – केवळ रंगमंचावरच नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यातही खोलवर रूजलेल्या भावना... यंदाच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त वादसभा आपल्यासाठी नवरसांची शृंखला सादर करीत आहे. त्यातील हा पहिला रस- रसांचा राजा, हा शृंगार रस म्हणजे प्रेमाचा, आकर्षणाचा आणि माधुर्याचा रस. हा रस अगदी मिलनाच्या माधुर्यापासून ते विरहाच्या कटुतेपर्यंत सगळ्यांत उमटलेला दिसतो. या रसाचं सौंदर्य मांडत आहे वादसभा सदस्य वेदश्री अग्निहोत्री.

#नवरस #नाट्य #शृंगार

पु.ग. सहस्रबुद्धे राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा ही प्रामुख्याने तिच्या सखोल आणि अभ्यासपूर्ण विषयांसाठी ओळखली जाते. यंदाच्या...
28/02/2026

पु.ग. सहस्रबुद्धे राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा ही प्रामुख्याने तिच्या सखोल आणि अभ्यासपूर्ण विषयांसाठी ओळखली जाते. यंदाच्या वर्षीच्या वैविध्यपूर्ण विषयांवर वादसभा सदस्यांनी लिहीलेली लेखमालिका प्रस्तुत करीत आहोत. सदर लेख हे वादसभेच्या blogpage वर उपलब्ध असून blogpageची link bioमध्ये आहे.

Address

S. P. College (Autonomous), Tilak Road
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaadasabha,S.P.College,Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Vaadasabha,S.P.College,Pune:

Share