ESD College Varvand

ESD College Varvand Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ESD College Varvand, College & University, Eknath Sitaram Divekar College , Varvand. , Tal-Daund, Dist-Pune, Pin. , Near by Pune-Solapur Highway, Pune.

शैक्षणिक वर्ष २०२६=२७ मध्ये FYBA या वर्गा मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना  महाविद्यालयातील विविध विभागाची माहिती ...
07/08/2026

शैक्षणिक वर्ष २०२६=२७ मध्ये FYBA या वर्गा मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागाची माहिती देण्यासाठी गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता NEP 2020 बाबत मार्गदर्शन व स्वागत असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी
1.प्रा.डॉ. प्रविण आढाव- परीक्षा विभाग
2.प्रा.डॉ.मंगेश पालवे- जिमखाना विभाग
3.प्रा.डॉ.जालिंदर बागल- N E P विभाग
4.प्रा डॉ सुधीर पाटील- विद्यार्थी कल्याण योजना
5.प्रा. दत्तात्रय साळुंके- राष्ट्रीय सेवा योजना विभाग
6.प्रा तुळजाराम खैरे- ग्रंथालय विभाग
7.प्रा.राणी नांदखिले N C C विभाग (8) प्रा सुरज देविकर- स्पर्धा परीक्षा (9) ॲड संतोष रणधीर- महाविद्यालय प्रशासन व विविध शिष्यवृत्ती या विविध विषयांवर मार्गदर्शन केले . यावेळी प्राचार्य डॉ अनिल शितोळे , उप प्राचार्य डॉ शरद गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम संयोजन व सुत्रसंचलन प्रा डॉ नानासाहेब गोफणे, आभार प्रा डॉ नामदेव बनसोडे , यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा‌ हनुमंत हेगडे यांच्या गिताने झाली . तसेच यावेळी प्रा डॉ ज्योती माने यांनी पसायदान म्हटले. प्राचार्य

महाविद्यालया मध्ये बुधवार दिनांक २२/०७/२०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजता महाराष्ट्र राज्याचे मा.उप मुख्यमंत्री अजित दादा पवार ...
22/07/2026

महाविद्यालया मध्ये बुधवार दिनांक २२/०७/२०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजता महाराष्ट्र राज्याचे मा.उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या ६७ व्या जयंती निमित्त संस्थेचे विश्वस्त मा अंकुश भाऊ दिवेकर यांनी दादांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.यावेळी प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Adm Bfg
01/07/2026

Adm Bfg

01/07/2026

Proud to welcome 2 MAH BN NCC Pune to our college for the State Level Combined Annual Training Camp (CATC 2026). 🇮🇳
Wishing all honourable officers and cadets a successful, disciplined, and memorable camp.
*Jai Hind!* ❤️

*एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यवरांची सदिच्छा भेट*वरवंड, ता. दौंड : वरवंड...
01/07/2026

*एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यवरांची सदिच्छा भेट*

वरवंड, ता. दौंड : वरवंड ग्राम शिक्षण संस्थेच्या एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा व सर्वांगीण विकासकार्याची पाहणी केली. या भेटीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीस नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.
मंगळवार दिनांक ३०/०६/२०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके, सिनेट सदस्य डॉ. रमेश गायकवाड, बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मोहन आमरोळे, नौरोजी वाडिया महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अशोक मुंढे, डॉ. स्वप्नील देशमुख तसेच डॉ. महाजन यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.

मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत व सन्मान केला. यावेळी प्राचार्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थी विकासाच्या योजना, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली.

मान्यवरांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरी तसेच संस्थेच्या प्रगतीशील वाटचालीचे कौतुक करत भविष्यातही महाविद्यालयाने गुणवत्ता, संशोधन, क्रीडा व सामाजिक बांधिलकी यांचा उत्कृष्ट समन्वय साधत नवे आदर्श निर्माण करावेत, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक कॅप्टन मंगेश पालवे, डॉ. राजेश सुरवसे, डॉ. सुरेश जगताप तसेच कार्यालयीन अधीक्षक ॲड. संतोष रणधीर उपस्थित होते. सर्व मान्यवरांशी विविध शैक्षणिक व क्रीडा विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या सदिच्छा भेटीमुळे महाविद्यालयाच्या भावी वाटचालीस निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

The State Level Combined Annual Training Camp (CATC 2026). 🇮🇳*Jai Hind!* ❤️
01/07/2026

The State Level Combined Annual Training Camp (CATC 2026). 🇮🇳
*Jai Hind!* ❤️

Interviews
29/06/2026

Interviews

Prof. Mahadik Shaila (Dept of Zoology) and Prof. Jagtap Vidya (Dept. Of Botany) has published textbook on Ecology and En...
29/06/2026

Prof. Mahadik Shaila (Dept of Zoology) and Prof. Jagtap Vidya (Dept. Of Botany) has published textbook on Ecology and Environmental Zoology.

23/06/2026
23/06/2026

Address

Eknath Sitaram Divekar College , Varvand. , Tal-Daund, Dist-Pune, Pin. , Near By Pune-Solapur Highway
Pune
412215

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ESD College Varvand posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share