Prabodhankar Mahila Mahavidyalaya Ramtek

Prabodhankar Mahila Mahavidyalaya Ramtek Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prabodhankar Mahila Mahavidyalaya Ramtek, College & University, Near Main Busstop, Tilak Ward, Nagpur, Ramtek.

प्रबोधनकार महिला महाविद्यालयातर्फे बारावी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचे स्वा...
06/05/2026

प्रबोधनकार महिला महाविद्यालयातर्फे बारावी मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले.

*जागतिक महिला दिनाचे आयोजन*         प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक येथे आज दिनांक ११ मार्च २०२६ रोज बुधवारला जागति...
18/03/2026

*जागतिक महिला दिनाचे आयोजन*

प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक येथे आज दिनांक ११ मार्च २०२६ रोज बुधवारला जागतिक महिला दिनानिमित्त “लैंगिक जागरूकता व कायदेविषयक मार्गदर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावं व विद्यार्थिनींना लैंगिक जागरूकता, महिला सन्मान, कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, रामटेक येथील न्यायाधीश व इतर अधिवक्ता वर्ग यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपल्या महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. संगीता टक्कामोरे यांनी स्वीकारले, प्रमुख वक्ता म्हणून श्रीमती दीप्ती वॊराणी मॅडम, न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती जे. डी. गायकवाड अधिवक्ता, श्रीमती जयश्री मेंघरे अधिवक्ता, श्रीमती स्वाती वहाने अधिवक्ता, कुमारी प्रीती महाजन अधिवक्ता, श्रीमती छाया खापरे अधीक्षक व श्री. किरण खोब्रागडे लिपिक, दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक, हे उपस्थित होते.तसेच सर्व प्राध्यापक वृंद व सर्व शाखेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी शनिवारला  प्रबोधनकार महिला महाविद्यालयात *“शिवजयंती महोत्सव व क्रीडा स्पर्धा - २०२६* अंतर...
17/03/2026

दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी शनिवारला प्रबोधनकार महिला महाविद्यालयात *“शिवजयंती महोत्सव व क्रीडा स्पर्धा - २०२६* अंतर्गत "आनंद मेळावा" चे आयोजन करण्यात आले होते. आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून उत्साहाने सहभाग घेतला. मेळाव्याच्या समन्वयक म्हणून प्रा. अश्विनी धमगाये यांनी कार्य पाहिले. आनंद मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. महेश मोहनकर यांनी केले. प्रबोधनकार महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता टक्कामोरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यात आला.

शिवजयंती महाेत्सव -संगीत खुर्ची,  प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक
17/03/2026

शिवजयंती महाेत्सव -संगीत खुर्ची, प्रबोधनकार महिला महाविद्यालय,
रामटेक

*आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव "युवारंग " स्पर्धेत विद्यार्थींनीचा सहभाग*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर व...
17/03/2026

*आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव "युवारंग " स्पर्धेत विद्यार्थींनीचा सहभाग*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने १० ते १२फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘लोकनृत्य’ या स्पर्धेचे आयोजन झाले.
या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयातील खालील विद्यार्थिनींनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला :
१. लक्ष्मी बागडे (B.A. द्वितीय वर्ष)
२. मयुरी पंधरे (B.A. द्वितीय वर्ष)
३. पायाल सय्यम(B.A. द्वितीय वर्ष)
४. नीलम कुंभलकर(B.A. द्वितीय वर्ष)
५. इशा राऊत (B.A. द्वितीय वर्ष)
६. सानिया कोकोडे (B.A. द्वितीय वर्ष)
७. वैशाली धुर्वे (B.A. द्वितीय वर्ष)
८. आकांक्षा नारनवरे(B.A. द्वितीय वर्ष)
९. रितिक्षा मडावी (B.A. तृतीय वर्ष)
१0. वंशिका भोयर (B.A. तृतीय वर्ष)

या सर्व विद्यार्थिनीं आपल्या कलागुणांना वाव देत हर्षोल्हासाने स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या.या प्रसंगी प्रा. माधुरी महाजन व श्री. जोगेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

*मराठी राजभाषा दिन* आयोजक: मराठी विभागप्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक येथे दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी राजभाष...
17/03/2026

*मराठी राजभाषा दिन*
आयोजक: मराठी विभाग
प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक येथे दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य मा. संगीता टक्कामोरे मॅडम यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. स्वाती संजय खैरकर( सहाय्यक शिक्षिका रामजी महाजन देशमुख नगरपरिषद विद्यालय, रामटेक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली ठेंगरे यांनी प्रभावीपणे केले. प्रारंभी मराठी विभागाच्या प्रमुख प्रा.रसना भगत यांनी प्रास्ताविक सादर करताना मराठी भाषेचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट केले तसेच आजच्या डिजिटल युगात मराठीच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली.
यानंतर विद्यार्थिनी आरती पाल हिने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने प्रभावी भाषण केले. तिने मराठी भाषेच्या अभिमानाबरोबरच तिच्या जतन-संवर्धनासाठी भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी मा.स्वाती संजय खैरकर मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्यिक परंपरा व जागतिक पातळीवरील स्थान याविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या संगीता टक्कामोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले व मराठीच्या अभ्यास-संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी नीलम कुंभलकर हिने आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशाप्रकारे आजचा कार्यक्रम अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

शिवजयंती महाेत्सव क्रिकेट स्पर्धा- प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक
17/03/2026

शिवजयंती महाेत्सव क्रिकेट स्पर्धा- प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक

13/03/2026
*आंतर महाविद्यालयीन क्रीडा व सांस्कृतिक युवोत्सव - २०२६*महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय, पारशिवनी, जिल्हा नागपूर य...
13/03/2026

*आंतर महाविद्यालयीन क्रीडा व सांस्कृतिक युवोत्सव - २०२६*
महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय, पारशिवनी, जिल्हा नागपूर यांच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडल्या.
या अंतर्गत वादविवाद, गीतगायन, एकल नृत्य तसेच सामूहिक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले—

*एकल नृत्य स्पर्धा :* बी.एस्सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी धनश्री वाढीवे हिने *प्रथम क्रमांक* मिळवला.

*वादविवाद स्पर्धा :* बी.एस्सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी धनश्री नगरे हिने *द्वितीय क्रमांक* प्राप्त केला.

*समूह गीतगायन स्पर्धा :* पलक चिमुरकर, प्राजक्ता नागपुरे व ओझल समरीत या विद्यार्थिनींनी *प्रथम क्रमांक* पटकावला.

*सामूहिक नृत्य स्पर्धा :* बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सर्व विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांना वाव देत आनंदोल्हासाने स्पर्धेत सहभाग घेतला व प्रबोधनकार महिला महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या प्रसंगी प्रा. छाया वांढरे व प्रा. सुहाना खान उपस्थित होत्या.

*प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक* *राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दि...
12/03/2026

*प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक*
*राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा*
दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयात आज दिनांक ०६ मार्च २०२६ रोजी “आरोग्य आणि जागरूकता” तसेच “कॅरिअर गाईडन्स” या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. सुहाना खान होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात विज्ञानाचा उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कल्पनाताई हटवार, आशा वर्कर ,दुधाळा येथील होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व, स्वच्छता, योग्य आहार आणि आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज याबद्दल सोप्या शब्दांत माहिती दिली.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते निलेश नारनवरे (संस्थापक – नेचर ऑफ फाउंडेशन) होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधींबद्दल मार्गदर्शन केले आणि योग्य ध्येय निश्चित करून मेहनत केल्यास यश मिळू शकते, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेक राखळे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. महेश मोहनकर यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विकास डांगरे, प्रा. छाया वांढरे, प्रा. माधुरी महाजन, प्रा. रसना बीसेन ,प्रा. हर्षु हटवार, प्रा. अश्विनी धमगाये, प्रा. प्रीती धमगाये , प्रा. राम बावनकुळे, अर्चना कळंबे, प्राची बोंडणे, सचिन डोणारकर, जोगेंद्र सूर्यवंशी, भारती बागडे आणि जयश्री बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम उत्साहात आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

*प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक*     * *जागतिक महिला दिनाचे आयोजन* प्रबोधनकार महिला महाविद्यालय रामटेक येथे आज दिन...
12/03/2026

*प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक*
* *जागतिक महिला दिनाचे आयोजन*

प्रबोधनकार महिला महाविद्यालय रामटेक येथे आज दिनांक ११ मार्च २०२६ रोज बुधवारला जागतिक महिला दिनानिमित्त “लैंगिक जागरूकता व कायदेविषयक मार्गदर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावं व विद्यार्थिनींना लैंगिक जागरूकता, महिला सन्मान, कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने दिवाणी व फौजदारी न्यायालय, रामटेक येथील न्यायाधीश व इतर अधिवक्ता वर्ग यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपल्या महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. संगीता टक्कामोरे यांनी स्वीकारले, प्रमुख वक्ता म्हणून श्रीमती दीप्ती वॊराणी मॅडम, न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक,कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती जे. डी. गायकवाड अधिवक्ता, श्रीमती जयश्री मेंघरे अधिवक्ता, श्रीमती स्वाती वहाने अधिवक्ता, कुमारी प्रीती महाजन अधिवक्ता, श्रीमती छाया खापरे अधीक्षक व श्री. किरण खोब्रागडे लिपिक, दिवाणी व फौजदारी न्यायालय रामटेक, हे उपस्थित होते.तसेच सर्व प्राध्यापक वृंद व सर्व शाखेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

**प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक        * अमृतमहोत्सवी संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे  आयोजन  ***           प्रबोध...
26/11/2025

**प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक

* अमृतमहोत्सवी संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन ***

प्रबोधनकार महिला महाविद्यालय रामटेक येथे आज दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोज शुक्रवारला अमृतमहोत्सवी संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपल्या महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. संगीता टक्कामोरे मॅडम यांनी स्वीकारले. स्पर्धेचे आयोजक राजेश राठोड सर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे )हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर श्री बगमारे व श्री डोले सर यांनी पर्यवेक्षक म्हणून भूमिका पार पाडली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत स्पर्धक म्हणून दमयंती ताई देशमुख प्रशासकीय महाविद्यालय,रामटेक येथील विद्यार्थिनी व प्रा.डॉली नागदिवे, तसेच जनप्रभा प्रशासकीय महाविद्यालय,रामटेक येथील विद्यार्थिनी व प्रा.बुराडे उपस्थित होत्या. प्रा. माधुरी महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संविधानाचे महत्त्व व प्रश्नमंजुशा स्पर्धेचे उद्देश समजावून सांगितले.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण तीन गट तयार करण्यात आले. या गटांची न्यायमंडळ( प्रबोधनकार महिला महाविद्यायल येथील स्पर्धक) , कायदेमंडळ( दमयंती ताई देशमुख प्रशासकीय महाविद्यालय येथील स्पर्धक ) तसेच कार्यकारी मंडळ ( जनप्रभा प्रशासकीय महाविद्यालय येथील स्पर्धक )अशी नावे देण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण पाच फेऱ्या घेण्यात आल्या. यामध्ये कृती फेरी, विश्लेषण फेरी, नाद फेरी, स्पष्टीकरण फेरी अशा प्रकारच्या फेऱ्या घेण्यात आल्या. पाचही फेऱ्या मिळून २२ गुण घेऊन कायदेमंडळ प्रथम,१७ गुण घेऊन न्यायमंडळ द्वितीय तर १३ गुण मिळवून कार्यकारी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्हे देऊन गौरवांवित करण्यात आले.

Address

Near Main Busstop, Tilak Ward, Nagpur
Ramtek
441106

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabodhankar Mahila Mahavidyalaya Ramtek posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Prabodhankar Mahila Mahavidyalaya Ramtek:

Share