S R Desai Adhyapak Vidyalaya Ratnagiri

S R Desai Adhyapak Vidyalaya Ratnagiri s r adhyapk vidyala ratnagiri is well known ded college,this college has created thousands of teacher

स.रा. देसाई रत्नागिरी परिवाराचा *विठ्ठल* काळाच्या पडद्याआड 💐  रत्नागिरीच्या मराठा मंदिराचे स.रा. देसाई अध्यापक विद्यालया...
18/11/2023

स.रा. देसाई रत्नागिरी परिवाराचा *विठ्ठल* काळाच्या पडद्याआड 💐

रत्नागिरीच्या मराठा मंदिराचे स.रा. देसाई अध्यापक विद्यालयाची नाळ महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या शिक्षण क्षेत्राशी जुळलेली आहे,सर्वात जुने आणी उपक्रमशील अशी ख्याती. हे नावाजलेले कॉलेज तेथील प्राध्यापकांच्या शिक्षण क्षेत्राशी आणी दर्जेदार शिक्षक घडविण्यासाठीच्या समर्पित जीवनाचे फलितच.

*प्रा नामदेव कुंभार* हे स रा देसाई परिवाराला एकत्र बांधून ठेवणारा एक शब्दप्रभू अवलिया. त्यांच्या दुखःद निधनाच्या बातमीने मन सुन्न झाले. त्यांच्या सानिध्यात घालवलेल्या क्षणांची व विविध विषयांवर केलेल्या चर्चांची आठवण झाली.

सरांच्या मार्गदर्शाखाली डी एड् पूर्ण करताना प्रतिभावान ज्ञानयोग्याच्या सहवासाच्या लहरी अनुभवता आल्या हे आमचे भाग्य !
परिस्थितीशी संघर्ष करत सरांनी पाली येथून म.मं.न्यू इंग्लिश स्कूल पाली येथून शैक्षणिक कार्याची सुरवात केली व म.मं.स.रा. देसाई अध्यापक विद्यालयाच्या ज्ञानकुंडात स्वतःला झोकून दिले.

सरांच्या जीवनावर स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांच्या शिक्षणविषयक तत्वांचा सखोल अभ्यास होता. *ज्ञान* व *सेवा* यामध्येच आपले आयुष्य गुंफलं जाव असा त्यांचा आग्रह असायचा. स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर ज्यांचा प्रभाव होता त्या जॉन स्टुअर्ड मिल व हर्बाट स्पेन्सर यांच्या विचारांच्या अभ्यास करून भावी शिक्षक घडविण्यात त्याचे उपयोजन करण्यात सरांचा हातखंडा असायचा.

कॉलेज मध्ये शारदीय ज्ञानसत्रात व्याख्यांनांची अनेक पुष्पे त्यांनी आपल्या मधुर वाणींनी गुंफली,*खूर्ची कोचावर बसली* ही विनोदी कथा अजूनही आठवते. विविध विषयांवर स्फुटलेखन, हिंदी कथासंग्रह, कविता संग्रह त्यांनी लिहले. भारतीय समाज आणी प्राथमिक शिक्षण हा विषय त्यांनी सहजतेने आम्हांला समजावला .

मला वैयक्तिकदृष्टया सरांचे मार्गदर्शन कायमच लाभले, कौतुकाची थाप पाठीशी राहिली. विविध स्पर्धांमधील मिळवलेल्या यशानंतर सरांनी मिठीत घेऊन केलेले अभिनंदन आजन्म विसरू शकत नाही.

सरांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फोनवर मोजक बोलणे व्हायचे पण त्या आवाजात देखील जिव्हाळा होता !

ज्यांच्या पायांवर मस्तक ठेऊन नतमस्तक व्हावे अश्या दुर्मिळ पायांना आज मुकलोय. *प्रा नामदेव कुंभार सरांना भावपूर्ण श्रद्धांजली*💐💐💐

- श्री रामदास हणमंत कोकरे,सहशिक्षक
श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्यूनि कॉलेज जत.

डीएडला आमच्या बॅचच्या A व B अशा दोन तुकड्या. दोन्हीत ४०, ४० विद्यार्थी. A तुकडीत रत्नागिरीच्या काही मुली व महाराष्ट्राती...
20/02/2023

डीएडला आमच्या बॅचच्या A व B अशा दोन तुकड्या. दोन्हीत ४०, ४० विद्यार्थी. A तुकडीत रत्नागिरीच्या काही मुली व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या काही मुली होत्या. B तुकडीत मी व इतर जिल्ह्याच्या अशा आम्ही दोन्ही तुकडीत मिळून २३ मुली होतो. रत्नागिरीच्या स्थानिक ६ मुली सोडल्या तर बाकी सर्वजण आम्ही एकाच हॉस्टेलला राहायचो. अ तुकडीतील स्थानिक मुलींशी आमचं जास्त बोलणं व्हायचंच नाही. कामापुरते बोलणं झाल्यामुळे त्यांचे स्वभाव तेवढ्या जवळून कधी अनुभवता आले नाहीत. तसंही कोकणातील व घाटातील असं काहीसं आमच्यात अंतर असावं. त्या फुल्ल एन्जॉय करायच्या अन् आम्ही त्यात विशेषत: मी घुम्या बैलासारखी बसायची. क्रिडास्पर्धेला मात्र अ विरुद्ध ब मुली चुरशीने खेळायच्या. कबड्डीत मी व प्रियाने मात्र अ तुकडीला पुढे जाऊ दिलं नाही. याची बोच या अ तुकडीतील मुलींना राहायची. मग तेव्हा मात्र म्हणायच्या 'कृष्णा, फक्त तू अन् प्रियामुळे आम्ही कबड्डीत मागे राहतो.' अ तुकडीतील मुली मात्र नेहमी काही न काही इव्हेंट मध्ये असायच्या. नृत्यात देखील त्या कोकणी पद्धतीप्रमाणे अग्रेसर असायच्या. ब तुकडीतही अनेक गुणी मुली होत्या पण गावाकडच्या पद्धतीप्रमाणे म्हणून शांत असायच्या. त्यात मिळणार्‍या संधी या अ तुकडीला जास्त असायच्या. तर अशा वातावरणात रत्नागिरीतील मुलींशी आमचा जास्त परिचय नव्हता. त्यामुळे त्या 'शिष्ट' अशी माझी भावना असायची.

पण परवा रत्नागिरीत गेल्यावर अ तुकडीतील एकांती व त्याच तुकडीतील अमन(कपल) यांच्या घरी गेले. खरंतर बस ने पोहोचायला मला रात्री ८ वाजून गेले. अमन दाभोळेत न्यायला आला. दाभोळे ते शिपोशी(घर) सात आठ किमी. अंतर. जाता जाता मी अमनला विचारलं. तुझ्या गावच्या बस स्टॉपचं नाव काय? तर 'वाकडा फणस' हे नाव ऐकून मला भारी मजा वाटली. मी म्हटलं, इथले फणस तर सरळ आहेत ना! यावर दोघेही हसलो.

दोन तीन दिवस मनसोक्त राहून समजलं की अ तुकडीतील एकांती स्पष्टवक्ती, नेटनेटकी, सरळ स्वभावाची व आपुलकी व जिव्हाळा जपणारी आहे. बर्‍याचदा माणूस कोणाचंही लांबूनच मोजमाप करतो. त्यामुळे दोघात एक असंवादाचा फुगा तयार होतो आणि माणूस चुकतो. जवळ आलं की म‍ाणसाचा खरा स्वभाव कळतो. त्यामुळे सुसंवादाने फुगा फुटून त्यांच्यातील अंतर कमी होतं. माणसं अशीच जवळ येत असतात.

कोकणातील एका वाडीत असलेलं, भातखाचरात व कडेने जंगल असलेले अमन व एकांतीचं घर कोणाला प्रिय होणार नाही. त्यातून मला एकांत अतिशय प्रिय असल्याने अशा ठिकाणचं ममतेचं घर मला सुखावून गेलं. त्यांच्या देवू व कावूचा किलबिलाट घराला घरपण देऊन जातो.

परगावी ज्या घरात आपल्या घराप्रमाणं मनसोक्त राहायला मिळतं ते घर कधी परकं वाटत नसतं. माझं केलेलं आदरातिथ्य, माझे आ‍वडणारे फ्राय फिश, माझ्या आवडत्या भटकंतीचा केलेला मानपान, त्यासाठी द्याव्या लागणार्‍या वेळेचं नियोजन, मनमोकळ्या मारलेल्या गप्पा, मला दिलेला वेळ यासारख्या सर्व गोष्टीतून एकांतीच्या स्वभावाची झलक समजते. त्यासोबत (आमच्या दृष्टीने) शांत व आपुलकी असलेल्या अमनची तिला असलेली साथ हेही अधोरेखित होतं. त्यामुळेच स्ट्रिक्ट व मायाळू एकांतीचा स्वभाव काटेरी व वाकड्या फणसातील गोड गर्‍यासारखा आहे हे आता वेगळं सांगायला नको.

✍🏻फुटूवाली मी
कृष्णा

22/11/2020
*स.रा.देसाई अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यपदी मा.श्री.नेताजी कुंभार सर यांची पदोन्नती झाली आहे.त्याबद्दल सरांचे खूप खूप...
02/06/2020

*स.रा.देसाई अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यपदी मा.श्री.नेताजी कुंभार सर यांची पदोन्नती झाली आहे.त्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा!!!*🌷🌸🌺🌹💐💐🌹🌺🌸🌷

16/04/2020

*अन् मी मास्तर झालो**
-------------------------------------------
अचानक मळमळ होऊ लागल्याने मला जाग आली. आजपर्यंत बऱ्याच वेळा मी लांबचा बसप्रवास केला होता परंतु ,मला मळमळ किंवा उलटी असं कधी झालं नव्हतं.मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर मला खूप खोल दरी दिसली.दूरवर नजर जाईल तिथपर्यंत उंचच उंच डोंगर आणि त्या डोंगरावर ढग दाट वस्ती करत आहेत,त्याच्या अंगाखांद्यावर थुईथुई नाचत आहेत,त्याच्याशी लपाछपीचा खेळ खेळत आहेत,असं दृश्य मला लांबपर्यंत दिसत होते.हे ढग नसून पांढराशुभ्र धुकं आहे हे मला नंतर समजलं.दूरवर हिरवीगार घनदाट झाडी यांनी तो परिसर नटला होता. आमची गाडी डोंगर बाजूने पोखरुन तयार केलेल्या रस्त्यावर डोंगरमाथ्यावरुन चालत होती.अतिशय कठीण वळंण थोड्याथोड्या अंतरावर अचानक ब्रेक दाबावयास भाग पाडत होती.ब्रेक दाबताच झटक्याने मी सीटवर पुढे मागे ढकलल्या जात होतो. थोडंसं अंतर पुढे गेल्यावर खूप खोलवर खाली वाहत येणारे ओहळ छोट्या नदीला येऊन मिळत होते.भाताची शेती आणि कौलारू वस्त्यांचे गाव दिसत होतं . आणि मनात एक प्रश्न आला,'एवढ्या खोल दरीत चारी बाजूंनी डोंगर असलेल्या ठिकाणी ही वस्ती कशी वसली असेल?इथली माणसं कशी राहत असतील?या गावाला रस्ता कुठून गेला असेल?इथं माणसं कशी राहत असतील?'हे प्रश्न मनात येणं तसं साहजिकच होतं कारण, आमच्या बीड जिल्ह्यात विशेषतः अंबाजोगाई- लातूर परिसरात असले अवघड घाट,एवढे उंच डोंगर आणि खोल दऱ्या मी पाहिलेल्या नव्हत्या.सपाट जमिनीवर असलेले सरळ व वळणदार रस्ते ,एखादा माळ आल्यास थोडासा चढ उतार इतकंच.
मनात या रस्त्याची भिती वाटत होती.मला मळमळ होत असल्याने मी बप्पाला म्हणालो,
"बप्पा ,मळमळ व्हायलंय, आवळासुपारी हाय का? आणखी किती वेळ लागंल रत्नागिरी ला पहुंचायला?"
बप्पांनी आवळा सुपारी दिली.मी समोर बोर्ड वाचला,' घाट समाप्त' माझ्यासाठी नकोनकोसा वाटणारा तो 'आंबाघाट' संपला होता. पांचाळ चे अण्णा आणि पांचाळ दोघेही आता जागे झाले होते.
"लयं लांब हाय बाबा रत्नागिरी, आणखी एक तास लागतंय म्हणं आणि ही रस्तेसुद्धा लईच धोकादायक दिसाय लागलेत."
अण्णा बोलतं होते.अण्णांची अन् बप्पांची दोघांची कालंच पुण्यात दुसऱ्या राऊंडच्या शेवटी पत्र घेताना ओळख झाली होती.हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजारजळ त्यांच
गाव असल्याने ,बप्पानी त्यांना जवळाबाजारच्या आमच्या पाहुण्यांच्या ओळखी सांगितल्या होत्या.रस्ता कटत होता.
कधीही न पाहिलेली झाडं मी पाहत होतो. ( फणसं,काजू, सुपारी इ..) आपल्या गावाकडं डोंगरात बाभळ आणि कडूनिंबाची झाडं कुठंही येतात ,तशी आंब्याची झाडे त्या माळावर जिकडं पाहील तिकडं दिसतं होती.त्यातच नवल म्हणजे गावाकडची आंब्याची झाडे ही खूप मोठ्या बुडाची असतात .त्याच्यावर चढायला एक वेगळी मजा येते.परंतू या आंब्याच्या फांद्या तर जमिनीतूनंच
वेगवेगळ्या बाजूंनी पसरलेल्या होत्या.आंबे लागल्यानंतर हातानेच आंबे सहज तोडून घेता येत असावीत.याच्या फांद्यांना काठ्या का लावल्या आहेत? ते मला समजत नव्हतं. अतिशय छोटीछोटी आकाराची शेतं(गावाकडंच्या एका एकरचे चार भाग करावेत एवढी) आणि त्यात डोलणारी साळं(भातशेती)दिसत होती.ज्वारी ,तूर, कापूस,ऊस यासारखी पिके त्या रानात नव्हती.पुन्हा मनात प्रश्न 'इथले लोक चपात्या , भाकरी खात नसतील का? फक्त भात मासेच खातात की काय? 'या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरे तिथला एखादा स्थानिकचा माणूस देऊ शकला असता पण शेजारी बप्पा आणि पुढच्या सीटवर पांचाळ व त्याचे वडील,मग विचारा कुणाला?या सर्व प्रश्र्नांची उत्तरे मला नंतर मिळाली.
कंडक्टर ने बेल दिली,,'चला शिवाजीनगर आलं,उतरून घ्या'.आम्ही चौघेजण उतरलो.सकाळी सात वाजताची वेळ ,निर्जन रस्ता, बसस्टॉपवर कुणीही नाही; आता 'स.रा.देसाई अध्यापक विद्यालय शिवाजीनगर' हा पत्ता शोधणार कसा?आम्ही रस्त्याने चालत थोडंसं पुढे आलोत . रस्त्यावर झाडलोट करणारी एक व्यक्ती भेटली.आम्ही त्या व्यक्तीला पत्ता विचारला.तो म्हणाला,"तुम्ही खूप लांब उतरला आहात, इथून माळनाका खूप लांब आहे.तुम्ही माळनाक्याला उतरायला हवं होतं".आता आम्हाला कुठं माहित की माळनाका नावाचा बसस्टाॅप आहे.आम्ही आपलं शिवाजीनगर पत्त्यात दिलं होतं , शिवाजीनगर हा प्रमुख भाग असावा म्हणून कंडक्टरला शिवाजीनगर सांगितलं,माळनाका सांगितलं असतं तर त्यानं माळनाक्यावर उतरलं असतं .आम्ही चालतं होतो ,मागून एक रिक्क्षा आली .आम्ही कॉलेजच्या सांगितलेल्या पत्त्यावर त्यानं आम्हाला आणून सोडलं.' स.रा.देसाई.अध्यापक विद्यालय' असा फलक असलेली दोन मजली इमारत उभी होती.माझं भविष्य घडविण्यासाठी मला ती आपल्याकडे बोलवित होती.इमारत पाहिल्यानंतर मला कॉलेज आवडलं होतं.सामान घेऊन आम्ही आता कॉलेज उघडण्याची वाट पाहत बसलो होतो.मनात विचार येत होता कि,एवढ्या लांब आपल्या ओळखीचं कोणी भेटेल का?गावाजवळच आपल्या तालुक्यातील कोणी असेल का?असे निरनिराळे प्रश्न मनात येत होते.कॉलेजमागच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता केला.गप्पागोष्टीमध्ये वेळ निघून गेला.कॉलेजची घंटा वाजली आ णि प्रार्थनासुद्धा झाली.
आम्ही प्राचार्याच्या कॅबिन समोर वाट पाहत उभे राहिलो होतो इतक्यात माझ्या नावाने मला बोलावणे आले मी व माझे वडील केबिनमध्ये गेलो .प्राचार्य प्रताप सावंतदेसाई ही नेमप्लेट मी वाचली . सावंत आणि देसाई ही दोन आडनावे एकत्र कशी काय जोडली गेली याचं मला आश्चर्य वाटलं होतं.असो माझी कागदपत्रे सरांनी बघितली आणि खूप कडक शब्दात इथले नियम समजावून सांगितले .
मला सावंत देसाई सर म्हणजे खूप कडक शिस्तीचं व्यक्तिमत्त्व आहे, याची जाणीव झाली 1700 रुपये फीस भरा असं सरांनी सांगितल्या वर माझे वडील बप्पा नम्रपणे म्हणाले,
"सर मी गरीब मजूर माणूस कॉलेजला फीस आहे याची मला माहिती नव्हती. मी पुढच्या येळंला आल्यावर सगळी फीस भरून टाकतो. माझ्या मुलाला अॅडमिशन द्या." 'असं करता येणार नाही, तुम्ही क्लर्कच्या केबिनमध्ये जाऊन बघा.सर्व मुलांना फिस भरूनच अॅडमिशन दिलं आहे.तुम्हाला सवलत देता येणार नाही".बप्पांनी खूप विणवणी करून हतबलता दाखविल्यावर सरांनी पाचशे रुपये भरुन अॅडमिशन घेण्याची परवानगी दिली.आता राहण्याचा प्रश्न होता.

"साहेब आमी खूप लांबचे माणसं इथं आमच्या वळखीचं कुणीच न्हाई.आमची राहण्याची सोय कुठं होईल?"बप्पांनी शंका विचारली.
"काळजी करू नका". सरांनी दाभाडे नावाच्या एका मुलाला बोलवावयास सांगितले. उंचापुरा, गोरापान, सरळ नाक असलेला पायात चप्पल न घातलेला एक तरुण आमच्यासमोर हजर झाला."दाभाडे,हे तुमच्या गावाकडची माणसं आहेत, यांच्या राहण्याची व्यवस्था कर"दाभाडे आम्हाला घेऊन निघाला होता.गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी हे दाभाडेचं गाव.माझ्या आजोळपासून जवळ आहे.त्यामुळे वडीलांना दाभाडे कितीतरी जवळचा वाटत होता.आणि त्यावेळी मी विचार करीत होतो कि यानं पायात चप्पल का घातली नाही.आम्ही त्याला तसं विचारण्याचा प्रयत्नही केला नाही.आम्ही त्या व्हरांड्यातून पुढे निघालोत . माझ्या सारखंच नवीन अॅडमिशन घेतलेले दोन मित्र भेटले.त्यांनी आम्हाला विचारलं ,"कोठून आलात?"आम्ही बीड असं सांगताच त्यांच्यातला तो ढोल्या मित्र म्हणाला,"आम्ही दोघेही माजलगावचे".तो शरीराराने खात्यापित्या घरचा मुलगा सांगू लागला," लय बेकार इतं राहणं राव ,मेसवर नुसता भात वाडायल्याय ती बाई ,माझं काई पोट भरणायं.काका इथं दोन दोन दिवस अंडरेली वाळणात .कपडे धुतले तर चार दिवस वाळत न्हाईत.उगंचच आम्ही एवढ्या लांब आलोत? मला मिचवल भेटलं तर मी जाणाराय." असं बोलणारा हा मित्र सेकंड इयरला माझा रुम पाटनर होता.सचिन गरड हे त्याच नाव.सचिनच्या बोलण्यान माझी बेचैनी वाढली.कॉलेजमध्ये अनेक सिनियर मित्र भेटले. प्रत्येक जण आपुलकीने विचारपूस करत होता.
आम्ही थिबा पॅलेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी चालत असताना समोरून एक मित्र आम्हाला भेटला.तो कॉलेजला निघाला होता.नाव गाव विचारल्यावर ,"बनाजी महात्मे बीड ",असं तो म्हणाला.एकंदरीत वातावरण पाहता मला बीडची हवा इथंसुद्धा आहे हे जाणवलं.बनाजी म्हणाला,"आतापर्यंत बीडचे दहा जण आले आहेत." सिनीयर फस्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही मिळून वीस पेक्षा जास्त बीडचे आहेत .ही माहिती मला समजली.आति माझ्या वडीलांची तसेच माझीही काळजी मिटली होती.आम्ही मनोज जोशीच्या रुमवर पोहोचलो.तिथं संतोष सरवदे,मनोज जोशी,रामाहारी गित्ते आणि दत्ता पवार या मित्रांच्या भेटी झाल्या.संतोष सरवदे म्हणजे कुणी प्राध्यापक भेटीला आले असावेत असं वाटलं परंतु तो माझा गैरसमज होता.मनोज जोशीचं आत्मविश्वासानं बोलणं, गावाकडच्या मित्रांना जवळ करणं या गोष्टी मला खूप आवडल्या.पावसाच्या बारीक सरी चालू होत्या.इथं पाऊस चार महिने उघडत नाही .ही माहिती मला या मित्रांकडून मिळाली."काका तुम्ही काही काळजी करु नका.तुमच्या मुलाला रुम बघून द्यायची,त्याचं कमी जास्त पहायची जबाबदारी माझी आहे.तुम्ही बिनधास्त रहा." जोशीचं हे बोलणं माझ्या वडीलांची सर्व काळजी मिटवणारं होतं.
थोड्या गप्पा झाल्यावर दुपारचे चार वाजले होते.आदोन दिवसांनंतर सर्व सामान घेऊन येतो असं त्यांना सांगून आम्ही त्यांचा निरोप घेतला.चारची बस निघून गेली होती. पाच वाजताची कोल्हापूर आम्हाला सापडली.येताना वाटेत पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता गावात पोहोचलो.पोथी सुटली होती आणि रामराव गुरुजींचा वैजू घराजवळ भेटला आणि म्हणाला,"काय मास्तर पेढे कधी द्यायचेत" वैजूने पहिल्यांदा मास्तर म्हणून मारलेली हाक मला आजही जशाला तशी आठवते. त्यानं मारलेल्या त्या हाके बरोबर माझं मास्तरकीचं लायसन पक्कं झालं होतं. ---
© सिद्धेश्वर इंगोले.
9561204691 ___________________________

16/04/2020

*रत्नागिरीतील*
*स.रा.देसाईतील*
_*पहिला दिवस*_


*संघपाल आडोळे*

औरंगाबादला राउंड झाला आणि रत्नागिरीच्या स.रा. देसाई अध्यापिका विद्यालयात निवड झाली. अॅडमिशन घेण्यासाठी अकोल्याहून दुपारी साडेतीनच्या गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने निघालो . दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या दरम्यान सातारा रेल्वे स्टेशनला उतरलो . पुस्तकातील महाराष्ट्राचा राजकीय नकाशा पाहून रत्नागिरी हे शहर त्या रेल्वेच्या रूटवर साताऱ्यावरून जवळ पडते असे पाहिले होते म्हणून साताऱयाला उतरण्याचे ठरवले. नंतर साताऱ्यावरून पुणे रत्नागिरी गाडीमध्ये बसलो साधारणता: सायंकाळचे साडेपाच पावणेसहाचे दरम्यान रत्नागिरीतील माळनाका येथे उतरलो. बा रे बाप येवढा घाण वास!बसमधून जसं शहराला पाहत होतो दाट झाडी, माडाची झाडं, आंब्याच्या बागा पाहून असं वाटलं नाही. आता जाईल मग जाईल पण वास काही जाईना. जिथे जावं तिथे पाठ काही सोडेना. या वासाने पुढे काही दिवस त्रास दिला नंतर आवडीचा झाला. असो, हाकेच्या अंतरावर तेथून कॉलेज आहे अशी माहिती बसमधील प्रवाशांकडून मिळवली होतीच. त्यामुळे पायी निघालो . अगदी एक दीड मिनिटांतच कॉलेजच्या गेटवर पोहचलो. आपल्याला कॉलेजवर आता कोण मिळणार ? माझ्या मनामध्ये फक्त आज राहण्याची सोय कोठे होईल ? हाच विचार घोंगावत होता. कॉलेजच्या आवारात पोहचलो .कॉलेज परिसर सामसूम होता पण एक शिपाई दिसला. बरं वाटलं. शिपायाशी बोलल्यावर समजलं तळमजल्यावर माध्यमिक विद्यालय आहे आणि वरच्या मजल्यावर आपलं कॉलेज आहे. आणि कॉलेजमध्ये कोणीतरी आहे हे सुद्धा समजले . लगबगीने पायऱ्या चढून वर गेलो आपसूकच ऑफिस शोधण्यासाठी काही वेळ लागला नाही. तेव्हा त्या वेळेस निकम नावाचे कनिष्ट लिपीक हजर होते . त्यांनी माझी चौकशी केली. कोठून आला? मी बोललो अकोल्यावरून.कधी निघाला होता ? काल दुपारी एक वाजता निघालो होतो . सोबत कोण आहे? मी म्हणालो मी एकटाच आहे. बर मग तुला फ्रेश व्हायचं असेल? मी म्हणालो एकाद्या हॉटेलवर जाईल आणि बघेन. कनिष्ठ लिपिक निकम मला म्हणाले थोडावेळ बस तुझे कागदपत्र माझ्याकडे दे मला पाहू दे . तुझे आमच्या कॉलेजमध्ये स्वागत आहे. मी तुझे अॅडमिशन करतो.त्यांनी माझी सगळी कागदपत्रं घेतली. आणि मला म्हणाले खूप दुरून आला आहेस. पहिले जा तुला अंघोळ करायची असेल तर ते बाथरूम आहे. बाथरूममध्ये अंघोळ करून घे . काय म्हणालात सर अंघोळ करून घ्यायची! हो, तुला गरज असेल तर करून घे अंघोळ . मला एवढं चांगलं वाटलं, ते शब्दात मांडता येणार नाही . ऑफिस शेजारी असलेल्या बाथरूममध्ये मी अंघोळ करायला गेलो. मला तरी वाटते मी एवढा नशीबवान आहे . क्वचितच कोणाला तरी त्या कॉलेजच्या बाथरूममध्ये अंघोळ करायला मिळाली असेल त्यामधला मी एक ! सतत सत्तावीस तासांचा प्रवास झाल्यामुळे मलाही अंघोळीची खूपच गरज होती. आणि माझ्या मनासारखे झाले होते . मी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो आणि नीलेश हागवने तेथे अॅडमिशन करता आला .माझी अंघोळ होईपर्यंत याचे अॅडमिशन झाले. अॅडमिशनची प्रक्रिया पूर्ण करत असताना त्याला ही माहितीसुद्धा मिळाली की अकोल्याचा कुणीतरी विद्यार्थी आपल्या आधी आलेला आहे. आणि तो सध्या बाथरूममध्ये अंघोळ करत आहे . माझी बाहेर यायची त्याने वाट पाहिली नाही . नीलेश त्याच्या काकासोबत तिथून बाहेर निघाला आणि नंतर येऊन तो मला भेटणार होता. याबद्दल त्याने लिपिकाकडे सांगितले सुद्धा . मी बाहेर आल्यानंतर मला समजले , माझ्यानंतर अकोल्याचा एक विद्यार्थी आलेला आहे आणि अॅडमिशन करून बाहेर गेलेला आहे. मला खूप बर वाटलं. निकम लिपिक मला बोलले तू आता कुठे जाशील. तर येथेच झोप. बाहेरून जेवण करून ये. त्यांच्याकडे बजाज मोपेड होती त्यांनी मला गाडीवर बसवलं आणि माळ नाक्याजवळ असलेल्या एका हॉटेलवर सोडून ते गेले . तत्पूर्वी कॉलेजवर असलेल्या शिपायाला हा येथे झोपणार आहे हे सुद्धा सांगून गेले. मी जेवण करून आलो आणि बराच वेळ शिपायासोबत गप्पा गोष्टी करत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये थांबलो. नंतर माझ्याकडे गेटची चावी दिली आणि शिपाई घरी गेला. मी आतमधून गेटला कुलूप लावले व हॉलमध्ये गेलो. (ज्या ठिकाणी आपला परिपाठ व्हायचा तो हॉल ) साधारण साडेनऊ ते दहाच्या दरम्यान झोप लागली असेल. त्यानंतर हा बहाद्दर म्हणजे नीलेश हागवणे आणि त्याचा काका तेथे परत आले. पण मी वरच्या मजल्यावर आणि हे खालून मला आवाज देत होते .मी गाढ झोपी गेलो होतो एवढा लांबचा प्रवास केल्यामुळे मला काही कळले नाही . भरपूर आवाज दिले आवाज देऊन देऊन हे दोघेही कंटाळले शेवटी त्यांनी काही खडे खालून वर फेकून मारले तरीही मला जाग आला नाही . शेवटी हे दोघेही कंटाळून कुठल्या तरी हॉटेलवर गेले आणि तिकडे मग त्यांनी काय केले ते त्यांनाच ठाउक . त्या रात्री अख्खी रात्र मी आपले स.रा. देसाई कॉलेज सांभाळलं याचा मला अभिमान आहे . दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज सुरू झाल्यानंतर नीलेश हगवणे सोबत ओळख झाली . रात्री घडलेली सर्व हकीकत त्यांने सकाळी भेटीनंतर सांगितली. आणि आम्ही आता एकाच जिल्ह्याचे म्हटल्यावर सोबत राहण्याचे ठरले. पहिला दिवस राहण्याची काळजी,कॉलेजमधील लोकांचा परिचय, तिथल्या लोकांच्या बोलण्यातील टोनिंग, अकोल्याच्या तुलनेत रत्नागिरीतील महागाई यांवर चर्चा करण्यात गेला. शिपायाकडून मी बरीचशी बारीक सारीक माहिती आधीच घेतली होती . बरेच विद्यार्थी आलेले आहेत आणि तुला रुमही मिळेल आणि रूम पार्टनर सुद्धा मिळतील काही काळजी करण्याची गरज नाही असे त्यांनी मला सांगितले होते. कॉलेजमध्ये *अरविंद देसले, नामदेव गव्हाणे, मारुती वागलगावे, युवराज शिंदे, ही मंडळी मिश्रीवेला येथे राहत होती.* आमचेही तेथेच राहण्याचे ठरले सायंकाळी कॉलेज संपल्यानंतर बॅग घेऊन मिश्रीवेला गाठला. *मी, नीलेश हगवणे, अरविंद देसले आणि संजय वाळुंज* चौघे जण रूम पार्टनर झालो. एकुण १२ लोक आम्ही काही दिवस का होइनात सोबत राहीलो. मिश्रीवेल्यातील ते दिवस खूप आठवतात. आम्ही बऱ्याच वेळा रात्री रोडच्या बाजूला असलेल्या चिऱ्यांवर येऊन बसायचो आणि अंताक्षरी खेळायचो . नाम्या वाकडी मान करून गाणे म्हणायचा . त्याचं आवडतं गाणं म्हणजे *पहिली पहली बार मोहब्बत की है* . जाम मजा यायची.चंगाष्टासासखे खेळही आम्ही तेथे खेळलो. आमच्या १२ मध्ये एक से बढकर एक नमुने होते. न विसरण्यासारखे दिवस होते ते, जे मला शिकवून गेले. घडवून गेले.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

खूप दिवसांनी भेटलेले स. रा . देसाई चे विद्यार्थी ...
11/10/2018

खूप दिवसांनी भेटलेले स. रा . देसाई चे विद्यार्थी ...

11/10/2018
our memories......
05/02/2015

our memories......

Happy diwali to all s r desais students. .....
24/10/2014

Happy diwali to all s r desais students. .....

Address

Ap Shivajinagar Tal Ratnagiri
Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S R Desai Adhyapak Vidyalaya Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share