12/03/2026
एम. बी. मोरे फाउंडेशनच्या शैक्षणिक संकुलात संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
एम. बी. मोरे फाउंडेशन संचालित शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्व. इंदू आणि मनोहरलालजी छाब्रिया यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन बुधवार, दि ११/०३/२०२६ रोजी श्री. नितीन मनोहरलाल छाब्रिया यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक कौशल्य प्रदान करून भविष्यातील तंत्रज्ञानस्नेही रोजगारासाठी त्यांना सक्षम बनविणे यासाठी सुसज्ज संगणक केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात इ ११ वी (विज्ञान) वर्गातील विद्यार्थिनी कु निधी नामदेव मोहिते हिने सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे विश्वस्त, सदस्य, प्राचार्य आणि शिक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री. नितीन छाब्रिया यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून नव्याने सुरू झालेल्या संगणक प्रशिक्षण केंद्राचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले. इ ११ वी (विज्ञान) वर्गातील विद्यार्थिनी कु आयेशा अल्ताफ मेमन हिने उपस्थित मान्यवर, देणगीदार आणि संस्थेचे व्यवस्थापन यांचे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
छाब्रिया ग्रुपचे पदाधिकारी श्री. भगवान अल्वा, श्री. भास्कर शेट्टी, श्री. के. बी. पाई, श्री. सुब्रतो बॅनर्जी, श्री. अरुण भराडी, श्री. हितेंद्र कुमार सिंह, श्री. महेश पुर्भे, श्री. ओंकार मोहिते, श्री. दिपेश जाधव आणि श्री. महेंद्र गुजर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच एम. बी. मोरे फाउंडेशनचे संचालक श्री अशोक मोरे, श्री प्रथमेश मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी देखील याप्रसंगी उदघाटन सोहोळ्यात सहभागी झाले. प्रा. रोहन पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे सुत्रसंचालन केले.