Sangamner College, Sangamner

Sangamner College, Sangamner Official Page of Sangamner College Official Community of Sangamner College.

युजीसी (UGC) आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, उत्कृष्ट कामगिरी आणि उच्च दर्जा प्राप्त  केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुण...
21/08/2026

युजीसी (UGC) आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, उत्कृष्ट कामगिरी आणि उच्च दर्जा प्राप्त केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संगमनेर स्वायत्त महाविद्यालयास 'अधिकारप्राप्त' (Empowered Autonomous College ) स्वायत्त दर्जा बहाल

अहिल्यानगर जिल्हा योगासन स्पर्धेत संगमनेर महाविद्यालय व श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाची दमदार कामगिरी; १३ सुवर्णांसह २० पदक...
19/08/2026

अहिल्यानगर जिल्हा योगासन स्पर्धेत संगमनेर महाविद्यालय व श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाची दमदार कामगिरी; १३ सुवर्णांसह २० पदकांची विक्रमी कमाई
योगासनातील दमदार कामगिरीच्या जोरावर शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयाने अहिल्यानगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये तब्बल २० पदकांची विक्रमी कमाई करत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. खेळाडूंनी १३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदके पटकावत स्पर्धेत आपला ठसा उमटविला. कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १६ व १७ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत संगमनेर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी ट्रेडिशनल, आर्टिस्टिक व रिदमिक योगासनांच्या विविध प्रकारांत उल्लेखनीय कौशल्य दाखविले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा एक भाग म्हणून संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व...
17/08/2026

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाचा एक भाग म्हणून संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या या रॅलीमध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि CC- एन.एस.एस. फाउंडेशन कोर्सचे विद्यार्थी अशा एकूण जवळपास ६०० विद्यार्थी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

संगमनेर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा(विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य, चारित्र्य व सामाजिक बांधिलकी जोपा...
15/08/2026

संगमनेर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
(विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य, चारित्र्य व सामाजिक बांधिलकी जोपासावी)
- प्राचार्य प्रो.डॉ. अरुण गायकवाड

भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानास प्रणाम करून, स्मरण करण्याचा दिवस म्हणजे स्वातंत्र्यदिन. शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य प्रा. डॉ. अरुण गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि संविधानिक मूल्ये जोपासण्याचे प्रभावी आवाहन केले. सदर ध्वजारोहणासाठी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी उपस्थित होते. संस्थेचे सचिव डॉ.राजेंद्र लढढi व व्यवस्थापनातील पदाधिकारी यांनी स्वातंत्र्य दिनास सुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र तशिलदार, उपप्राचार्य डॉ. प्रविण त्र्यंबके, एनसीसीचे लेफ्ट. प्रा. डॉ.नरेंद्र फटांगरे, लेफ्ट. हेमलता तारे, क्रीडा संचालक डॉ.अजितकुमार कदम, कुलसचिव श्री.संतोष फापाळे, सर्व विभागातील विभाग प्रमुख,प्राध्यापक या राष्ट्रीय कर्तव्यासाठी उपस्थित होते.

29/07/2026
संगमनेर महाविद्यालयाने खुली केली कॉर्पोरेट करिअरची दारे (कंपनी सेक्रेटरी क्षेत्रातील करिअर संधींवर संगमनेर तालुक्यातील क...
22/07/2026

संगमनेर महाविद्यालयाने खुली केली कॉर्पोरेट करिअरची दारे
(कंपनी सेक्रेटरी क्षेत्रातील करिअर संधींवर संगमनेर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य व वाणिज्य शिक्षक यांच्यासाठी एम्पॉवरिंग एज्युकेटर्स’ या विषयावर परिषद संपन्न)
संगमनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर पडून व्यावसायिक शिक्षणाच्या नव्या संधींचा लाभ घ्यावा, या उद्देशाने शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संलग्नित संगमनेर महाविद्यालय (स्वायत्त) आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI), पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम्पॉवरिंग एज्युकेटर्स’ या विषयावर एकदिवसीय शिक्षक परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कंपनी सेक्रेटरी (सीएस) या प्रतिष्ठित व्यावसायिक क्षेत्रातील वाढत्या संधी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झालेल्या नव्या दिशा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअर पर्याय यांचा उहापोह करणाऱ्या या परिषदेला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संगमनेर (स्वायत्त) महाविद्यालय: लोकल ते ग्लोबल प्रगतीचा प्रेरणादायी प्रवास  -प्रा. डॉ. अरुण गायकवाड ,प्राचार्य, संगमनेर ...
08/07/2026

संगमनेर (स्वायत्त) महाविद्यालय: लोकल ते ग्लोबल प्रगतीचा प्रेरणादायी प्रवास
-प्रा. डॉ. अरुण गायकवाड ,
प्राचार्य, संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर

Address

Pune/Nashik Highway
Sangamner
422605

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 1pm

Telephone

+912425225893

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangamner College, Sangamner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Sangamner College, Sangamner:

Shortcuts

Share