Fabtech Education Society

Call Directions Website Contact the university

Fabtech Education Society "Education is the passport to the future, for tomorrow belongs to those who prepare for it today."

23/09/2026
 #फॅबटेक_सांगोलाफॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर ...
22/09/2026

#फॅबटेक_सांगोला

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी सेसा कमिटी उद्घाटन, प्रथम वर्षातून द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व शिक्षक दिन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विशाल भाकरे यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, प्रा. प्राजक्ता रूपनर, डॉ. वागीशा मथाडा, प्रा. पृथ्वीराज गुंड, प्रा. सोनाली पाटील, प्रा. क्षितिजा मिसाळ, प्रा. नीलकंठ लिंगे, प्रा. संदीप निर्मळ, प्रा. सचिन शेंडगे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञतापूर्वक आदर भाषणातून व्यक्त केला. याशिवाय प्रथम वर्षातून द्वितीय वर्षात प्रवेश घेतलल्या विद्यार्थ्यांचा गुलाब देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर आदीनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भुमिका मोरे व कुमारी प्रतिक्षा होळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुशाल ऐवळे यांनी मानले.

अभियांत्रिकी शिक्षणासोबतच संशोधन आणि नवोपक्रमाची नवी ओळख निर्माण करणाऱ्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ...
22/09/2026

अभियांत्रिकी शिक्षणासोबतच संशोधन आणि नवोपक्रमाची नवी ओळख निर्माण करणाऱ्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला, महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने संशोधन क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. पृथ्वीराज हरिदास गुंड यांनी सह-संशोधकांसोबत विकसित केलेल्या ‘‘एआय स्मार्ट अटेंडन्स डिव्हाईस हाऊसिंग’ या नावीन्यपूर्ण डिझाईनची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून नोंदणी झाली आहे असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.
भारत सरकारकडून या डिझाईनला डिझाईन नंबर प्राप्त झाला असून, आधुनिक बायोमेट्रिक व फेस-रिकग्निशन आधारित उपकरणांसाठी हे हाऊसिंग उपयुक्त ठरणार आहे. उपकरणातील कॅमेरा, थर्मल स्कॅनर्स, बायोमेट्रिक सेन्सर्स तसेच ए आय मायक्रो-कंट्रोलर्सचे संरक्षण, योग्य वायुविजन आणि उष्णता निचरा यांचा विचार या डिझाईनमध्ये करण्यात आला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसारख्या मूलभूत अभियांत्रिकी शाखेत कार्यरत असतानाही प्रा. पृथ्वीराज गुंड यांनी बहुविद्याशाखीय संशोधनाचा वेध घेत ए आय, ऑटोमेशन आणि स्मार्ट उपकरणांच्या क्षेत्रात संशोधनाची दिशा पकडली आहे. त्यांच्या या प्रयत्नातून विकसित झालेले स्मार्ट अटेंडन्स डिव्हाईस हाऊसिंग शैक्षणिक संस्था, आस्थापना, बँका तसेच औद्योगिक क्षेत्रातील स्मार्ट हजेरी प्रणालींसाठी उपयुक्त ठरू शकते. प्रा. पृथ्वीराज गुंड यांच्या संशोधन कार्याची विशेष बाब म्हणजे गेल्या आठ महिन्यांत तब्बल पाच डिझाईन पेटंट्सची नोंदणी झाली असुन या पाच नावीन्यपूर्ण डिझाईन्सचा समावेश आहे.
प्रा. पृथ्वीराज गुंड यांच्या पेटंट नोंदणीमुळे फॅबटेकमधील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम आणि बौद्धिक संपदा निर्मितीची नवी प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल फॅबटेक शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अमित रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांच्या हस्ते प्रा. पृथ्वीराज गुंड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 #फॅबटेक_सांगोलाफॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधी...
22/09/2026

#फॅबटेक_सांगोला

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांचा "स्वागत समारंभ" प्रसंगी पुणे येथील भारत फोर्ज लि. येथील एचआर मॅनेजर जितेंद्र झोपे यांचे "करिअर मधील बदल आणि यशासाठी रणनिती" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे जितेंद्र झोपे यांचे महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. हरिदास पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
"करिअर मधील बदल आणि यशासाठी रणनिती" या विषयावर जितेंद्र झोपे यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी आणि उद्योगक्षेत्राच्या गरजा समजून घेण्यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानाचे प्रास्ताविक ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे यांनी केले. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. ज्योती शिंदे, डाॅ. हरिदास पवार आदींसह प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी परीश्रम घेतले.

Address

Gate No. 565/1
Sangola
413307

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fabtech Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Fabtech Education Society:

Shortcuts

Share