Karmaveer Bhaurao Patil University Satara

Karmaveer Bhaurao Patil University Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Karmaveer Bhaurao Patil University Satara, College & University, Karmaveer Bhaurao Patil University Satara, YCIS Campus Satara, Satara.

Dr Lesan Azadi, Director of the Bahá'í Academy,
24/04/2026

Dr Lesan Azadi, Director of the Bahá'í Academy,

Congratulations .......Madhura Dhamangaonkar and Ojas Deotale
24/04/2026

Congratulations .......
Madhura Dhamangaonkar and Ojas Deotale

14/04/2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांची राज्यपालांसोबत बैठकमुंबई, दि. १३ एप्रिल : राज्यातील समूह विद्यापीठांच...
13/04/2026

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांची राज्यपालांसोबत बैठक

मुंबई, दि. १३ एप्रिल : राज्यातील समूह विद्यापीठांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज दुपारी १२ वाजता लोकभवन, मुंबई येथे माननीय राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत समूह विद्यापीठांच्या गुणवत्तावाढीबाबत आणि राष्ट्रीय स्तरावरील मानांकन सुधारण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती मा. जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले की, समूह विद्यापीठे नव्याने स्थापन झाली असली तरी त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये जुनी व नामांकित आहेत. त्यामुळे या विद्यापीठांनी राष्ट्रीय विद्यापीठ मानांकनामध्ये आपले स्थान उंचावण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. गुणवत्ता वृद्धीसाठी ठोस आणि नियोजनबद्ध उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीला कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री. चंद्रकांत दळवी, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार, राज्यपाल यांचे सचिव मा. डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह राज्यातील इतर समूह विद्यापीठांचे कुलगुरू व कुलसचिव उपस्थित होते.
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना क्षयरोगाचे (टीबी) समूळ उच्चाटन होणे आवश्यक असल्याचे नमूद करून राज्यपालांनी ‘टीबी मुक्त भारत’ अभियानात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. यासाठी विद्यापीठांनी पोस्टर स्पर्धा, मराठी व हिंदी भाषेतील जिंगल्स स्पर्धा तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सुचविले.
बैठकीदरम्यान समूह विद्यापीठांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला. यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, सर्वोत्तम पद्धती, संशोधन प्रकल्प, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची नोंदणी, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी तसेच देश-विदेशातील विद्यापीठांसोबत सुरू असलेल्या सहकार्याची माहिती राज्यपालांना देण्यात आली.

जागतिक तिरंदाजी स्पर्धा मेक्सिको  2026कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजची ...
11/04/2026

जागतिक तिरंदाजी स्पर्धा मेक्सिको 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजची विद्यार्थीनी कु. मधुरा धामणगावकर हिचा समावेश असलेल्या महिला भारतीय तिरंदाजी संघाने, मेक्सिको मधील Pubela येथे झालेल्या 50 मी. Compound Round स्पर्धेत अमेरिका संघाचा 233 - 232 अशा अटीतटीच्या लढतीत पराभव करत देशासाठी सुवर्णपदक खेचून आणले! त्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
💐💐

11/04/2026
कु. मधुरा धामणगावकर हिची जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अंतिम फेरीत धडक! तर ओजस कास्य पदकासाठी लढणार! जागतिक तिरंदाजी स्पर्धा ...
11/04/2026

कु. मधुरा धामणगावकर हिची जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अंतिम फेरीत धडक! तर ओजस कास्य पदकासाठी लढणार!

जागतिक तिरंदाजी स्पर्धा २०२६: पुबेला (मेक्सिको)

मेक्सिको मधील पुबेला येथे ७ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान होत असलेल्या जागतिक तिरंदाजी स्टेज १ स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराची (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा) आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. मधुरा धामणगावकर हिचा समावेश असलेल्या भारतीय महिला तिरंदाजी संघाने ५० मी.कम्पौंड राउंड सांघिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारताना तुर्की संघाचा २३३-२३० अशा गुणांनी पराभव केला. यात नेत्रदीपक खेळ करत मधुराने भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी बजावली.
मधुरा, ज्योती वेंनाम, प्रगती यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत अमेरिकेच्या संघाबरोबर लढत होणार असून ती भारतीय प्रमाण वेळेनुसार ११ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता सुरु होईल.

या स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराचा आंतरराष्ट्रीय खेळाडू (कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा), अर्जुन पुरस्कार विजेता ओजस देवतळे हा सुद्धा खेळत असून मिश्र प्रकारात प्रगतीच्या साथीने भारतासाठी कास्य पदकासाठी भारतीय प्रमाण वेळेनुसार १२ एप्रिल रोजी रात्री २.00 लढत देणार आहे. उपांत्य सामन्यात या भारतीय जोडीचा डेन्मार्क कडून १५७ – १४९ अशा गुणांनी पराभव झाला. तत्पूर्वी मधुरा आणि ओजसचे वैयक्तिक प्रकारात तिसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात आले.
२०२८ ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी मिश्र कम्पौंड राउंड प्रकाराचा समावेश झाल्याने त्या पार्श्व भूमीवर या स्पर्धामधील भारतीय खेळाडूंचे यश महत्वाचे आहे.

Address

Karmaveer Bhaurao Patil University Satara, YCIS Campus Satara
Satara
415001

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Telephone

+912162229907

Website

https://maps.app.goo.gl/DfvzMb1Ahx6Q945F8

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karmaveer Bhaurao Patil University Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Karmaveer Bhaurao Patil University Satara:

Share