Rayat Shikshan Sanstha

Rayat Shikshan Sanstha Official page of Rayat Shikshan Sanstha. रयत शिक्षण संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज. Throughout his life he tried to translate this belief into reality.

A premier institution of education like the Rayat Shikshan Sanstha, known and honoured far and wide, not only at the national level, but at the global level too, needs no introduction. The institution itself is regarded as a noble mission, a noble cause, so earnestly and so endearingly pursued by its founder- father Karmaveer Bhaurao Patil, the educator of the educators and his legendary wife Sou.

Laxmibai Patil with her exemplary sacrifices made to turn the mission into a reality. The Rayat Shikshan Sanstha is one of the leading educational institutions in Asia. The value of its contribution to education in general is enormously great as it has, from the very beginning, tried all its best to lay emphasis on the education of the down-trodden, the poor and the ignorant who really form the major bulk of society. The founder of the institution, late Dr. Karamaveer Bhaurao Patil, was a man of the masses who devoted all his mind and heart to the cause of their education. He had an incisive understanding of the social ills that beset his times and fully realized the dire need of the spread of education. He believed that education alone could correct the social ills such as caste-hierarchy, money-lending, illiteracy, untouchability, superstitions and social and economic inequality. He was the champion of the poor, the weak, the dispossessed and left no stone unturned for their upliftment. He was a great humanitarian who endeavored hard to educate the masses to bring a kindly light of hope in their lives of misery and ignorance. He realised that the social ills could be remedied through the education of the masses alone and laid the foundation of the Rayat Shikshan Sanstha by opening a Boarding House at Kale (Tal-Karad, Dist-Satara) in 1919. Soon, however, in 1924 he shifted the head-quarters of his educational institution to Satara.

रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची बैठक खेळीमेळी संपन्न (संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून श्री चंद्रकांत दळवी यांची एक...
23/05/2026

रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची बैठक खेळीमेळी संपन्न
(संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून श्री चंद्रकांत दळवी यांची एकमताने निवड)
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची पहिली बैठक शुक्रवार दिनांक 23 मे 2026 रोजी पुणे येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदरावजी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये स २०२६-२७ ते २८-२९ या तीन वर्षासाठी विविध पदांच्या निवडी एकमताने झाल्या. यामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून श्री चंद्रकांत दळवी साहेब यांची तर संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून ॲड. भगीरथ शिंदे साहेब यांची निवड झाली. त्याचबरोबर मध्य विभागाचे विभागीय अध्यक्ष म्हणून मा. संजीव पाटील सोलापूर, दक्षिण विभागाचे विभागीय अध्यक्ष म्हणून मा. सौ संगीता प्रशांत पाटील, पश्चिम विभागाचे विभागीय अध्यक्ष मा. आ. चेतन तुपे साहेब, उत्तर विभागाचे विभागीय अध्यक्ष मा. आ. रोहित पवार साहेब आणि रायगड विभागाचे विभागीय अध्यक्ष म्हणून मा. बाळाराम पाटील साहेब यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याबरोबर संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव म्हणून श्री बी एन पवार आणि ऑडिट विभागाचे सहसचिव म्हणून प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदरावजी पवार साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कामकाजास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा. आ. दिलीप वळसे- पाटील साहेब, संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील साहेब, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य ॲड. रवींद्र पवार मा. खा. सुप्रिया सुळे मा. आ. विश्वजीत कदम तसेच संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते

17/05/2026

*Padmashri Prataprao Pawar New Age Skill Centre*
(*AI IoT Robotics Simulation*)
Rayat Shikshan Sanstha's Rashtriy Jaltaranpatu Sagar Patil Vidyalay Dhawli (Sangli)

11/05/2026
जागतिक विद्यापीठाशी रयतचा समन्वय –- खासदार शरदचंद्रजी पवारसातारा दि. “नव नवीन तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे वेगवेगळे विचार...
09/05/2026

जागतिक विद्यापीठाशी रयतचा समन्वय –

- खासदार शरदचंद्रजी पवार
सातारा दि. “नव नवीन तंत्रज्ञानामुळे जग बदलत आहे वेगवेगळे विचार आणि संकल्पना जागतिक पातळीवर रूढ
होत असताना या सर्व संकल्पनांना समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी करण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या वतीने केले
जात आहे. जगातील नामवंत विद्यापीठांशी समन्वय साधून रयतच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद वाढवण्याचा प्रयत्न केला
जात आहे. कर्मवीर अण्णांचा त्याग आणि दूरदृष्टी घेऊन संस्थेचा विस्तार अधिक व्यापकपणे सुरु आहे. आज रयत
शिक्षण संस्थेची जी उंची वाढली याचे श्रेय रयत शिक्षण संस्थेतील सेवकांना जाते”, असे प्रतिपादन रयत शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरद पवार यांनी केले.
सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या
पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी खा. सुप्रियाताई सुळे, आ.दिलीप वळसे-पाटील, व्हा.
चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, जयश्रीताई चौगुले,
सरोज पाटील (माई), महेंद्र लाड, अॅड.रवींद्र पवार, आ. डॉ.विश्वजित कदम आ.शशिकांत शिंदे, खा. धैर्येशील
मोहिते,आ. रोहित पवार, आ. परेश ठाकूर, आ.चेतन तुपे, आ. आशुतोष काळे, आ. बाळासाहेब पाटील, अॅड.
दिलावर मुल्ला, जे.के. बापू जाधव, थोर देणगीदार शकुंतला ठाकूर, कर्मवीर कुटुंबीय, आदी मान्यवरांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, कर्मवीर अण्णांनी अतिशय कष्टाने, त्यागाने आणि दूरदृष्टी ठेवून
शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावेत, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हाच
त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 742 शाखा असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत झाला आहे. सव्वा चार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. थोर
देणगीदारामुळे ऊर्जा वाढते, संस्थेला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यापुढे ही शैक्षणिक धोरणात्मक बदल करून निर्णय
घेतले जात आहेत. जगभरातील नामवंत विद्यापीठाशी समन्वय साधून रयत शिक्षण संस्था प्रगती करणार असून
सर्वांनी त्यास साथ द्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी मान्यवरांचे हस्ते रयत मासिक, रयत विज्ञान पत्रिका, ॲड. बी.एन.
नलावडे याच्या कर्मवीरांचा सांगाती आत्मचरित्राचे, शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा आदींचे प्रकाशन करण्यात
आले. थोर देणगीदार, कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा, यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,
रयत मासिकाचे कार्यकारी संपादक डॉ.सुधीर भोंगळे इत्यादींचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरणाचे
निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या
माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन.पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले. या
कार्यक्रमास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ मेंम्बर, लाईफ वर्कर, शाखांचे शाखाप्रमुख,
प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

९ मे २०२६ I पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी I रयत शिक्षण संस्था, सातारा
09/05/2026

९ मे २०२६ I पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी I रयत शिक्षण संस्था, सातारा

Welcome to Rayat Shikshan Sanstha's official YouTube Channel !

विद्यार्थ्यांना समुपदेशन ही काळाची गरज - चंद्रकांत दळवीरयत शिक्षण संस्थेच्या ७४२ शाखांमध्ये १५ जुलैपासून समुपदेशन उपक्रम...
08/05/2026

विद्यार्थ्यांना समुपदेशन ही काळाची गरज - चंद्रकांत दळवी

रयत शिक्षण संस्थेच्या ७४२ शाखांमध्ये १५ जुलैपासून समुपदेशन उपक्रम

सातारा - प्रतिनिधी

देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी समुपदेशन ही काळाची गरज बनली आहे.
आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या वातावरणात विद्यार्थ्यांना मानसिक आधाराची गरज आहे. शिक्षणासोबत त्यांच्या भावना, विचार आणि क्षमतांचा विकास होणे तितकेच महत्त्वाचे आहे. समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता आराखडा तयार केला असून दि. १५ जुलैपासून संस्थेच्या तब्बल ७४२ शाखांमध्ये शालेय समुपदेशन कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे," असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी आयोजित माध्यमिक शिक्षण परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.

परिषदेतील दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात जनमाहिती अधिकार कायद्यावर शिवाजी राऊत ( सातारा) यांनी मार्गदर्शन करताना माहिती अधिकार कायदा हा सामाजिक व्यवस्था सक्षम करणारा प्रभावी कायदा असल्याचे सांगितले.

दुसऱ्या सत्रात ‘परिवर्तनशील शिक्षणाची वाट’ या विषयावर डॉ. कालिदास पाटील (ईश्वरपूर) यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करताना
“आज शिक्षण स्मार्ट बोर्ड, ऑनलाईन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश संशोधनापर्यंत पोहोचले आहे. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांची एकाग्रता, संवाद कौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी समुपदेशन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते,” असे स्पष्ट केले.

तिसऱ्या सत्रात डॉ. चंद्रकांत कणसे (आळे फाटा) यांनी बदलत्या काळातील तंत्रज्ञान आणि शिक्षणातील नव्या प्रवाहांवर प्रभावी मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे सचिव विकास देशमुख, प्राचार्य टी. एस. साळुंखे, विभागीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

प्रत्येक शाळेत एक समुपदेशक

विद्यार्थ्यांच्या मनातील शंका, अडचणी, ताणतणाव आणि विविध समस्यांचे निरसन होणे आवश्यक आहे. विद्यार्थी शाळेत आणि जीवनात आनंदी, उत्साही व सकारात्मक राहावा यासाठी शासन स्तरावर “१०० विद्यार्थ्यांमागे एक समुपदेशक” नेमण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती डॉ. कालिदास पाटील यांनी दिली.

Address

Rayat Shikshan Sanstha, Central Office, Karmaveer Samadhi Parisar, Near Powai Naka
Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rayat Shikshan Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Rayat Shikshan Sanstha:

Share