Lokmanya Education, Kokan Region

Lokmanya Education, Kokan Region Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokmanya Education, Kokan Region, College & University, Rameshvar Plaza, First Floor, Savantvadi.

08/10/2024
जय हिंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त 'कॉफी स्पेशल' सेमिनार संपन्नसाळगाव: आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त जय ...
01/10/2024

जय हिंद कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त 'कॉफी स्पेशल' सेमिनार संपन्न

साळगाव: आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स, साळगाव येथे कॉफीपासून बनणारे विविध पदार्थ आणि पेयांच्या प्रदर्शनासह एक विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला. याचा उद्देश कॉफीचा प्रचार आणि प्रसार करून कॉफी उत्पादकांच्या आर्थिक स्थितीबाबत जागरूकता निर्माण करणे होता.

सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांनी कोल्ड कॉफी, कॉफी पेस्ट्री, कॉफी मफिन्स, फिल्टर कॉफी, कॉफी पुडिंग, अमेरिक्यानो, हॉट कॉफी यांसारखी कॉफीपासून बनवलेली पेये प्रात्यक्षिकांद्वारे सादर केली. याशिवाय, लेमन कॉफी टॉनिक, कॉफी जीन अँड टॉनिक, आईस मोका, एसप्रेसो मार्टिनी यांसारख्या मोकटेल्स आणि कॉकटेल्सच्या प्रयोगांचीही आकर्षक सादरीकरणे करण्यात आली.

कॉफीचा ऐतिहासिक दृष्टिकोन आणि महत्त्व या विषयावर तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. याचना सावंत हिने माहिती दिली. शेफ टॅरी डीसा आणि प्राध्यापक सौ. मनाली सावंत यांनी कॉफीच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील योगदानावर आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांवर मार्गदर्शन केले.

जय हिंद कॉलेज नेहमीच कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवते.

Savor the essence of French culinary mastery as our Third Year students at Jaihind College of Science, Salgaon, present ...
03/09/2024

Savor the essence of French culinary mastery as our Third Year students at Jaihind College of Science, Salgaon, present a delectable menu inspired by classic French cuisine. From the rich and comforting French Onion Soup to the exquisite Croquembouche, each dish reflects the skill and passion of our budding chefs. Bon appétit!"

30/08/2024
लोकमान्य ट्रस्टच्या देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा लोकशाही उत्सव! जनरल सेक्रेटरी निवडणुकीत विश्वम ...
30/08/2024

लोकमान्य ट्रस्टच्या देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा लोकशाही उत्सव! जनरल सेक्रेटरी निवडणुकीत विश्वम कांबळी आणि माया गवस यांची विजयी निवड."

श्रावणातील रानभाज्यांच्या स्वादाचा अनुभव जयहिंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतलासाळगाव: श्रावण महिना सुरू होताच निसर्गाचे...
12/08/2024

श्रावणातील रानभाज्यांच्या स्वादाचा अनुभव जयहिंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला

साळगाव: श्रावण महिना सुरू होताच निसर्गाचे सौंदर्य दाटून येते, आणि त्यासोबतच रानभाज्यांचा अनोखा आस्वाद मिळतो. या नैसर्गिक रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, तसेच त्यांच्या आरोग्यवर्धक गुणांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स (हॉटेल मॅनेजमेंट), साळगाव येथे आरोग्यदायी, शक्तीवर्धक, पौष्टिक आणि चविष्ट पावसाळी (श्रावणी) रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला लोकमान्य एज्युकेशनचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, बीएड कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. मयूर शारबिद्रे, आणि जयहिंद कॉलेजचे प्राचार्य अमेय महाजन यांची उपस्थिती लाभली होती. या पाककला स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध शेफ टॅरी डीसा, ऋषिकेश सूर्याजी, आणि योगेंद्र मराठे यांनी केले.

प्रदर्शनात टाकळा, भारंग, कुरुडू, पेवागा, घोटवेल, फोडशी, कणकीचे कोंब, चीवारी कोंब, आणि सुरण यांसारख्या दुर्मिळ रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यासोबतच, प्रत्येक भाजीचे आरोग्यवर्धक फायदे देखील प्रदर्शनात दर्शवण्यात आले. या भाज्यांवर आधारित पाककला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक रेसिपीजचे मॉर्डन पद्धतीने सादरीकरण केले, ज्यामध्ये 20 पेक्षा जास्त प्रकारचे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ तयार करण्यात आले.

प्रवीण प्रभू केळुसकर यांनी या रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्त्व विषद केले आणि त्यांच्यातील औषधी गुणधर्मांचे लाभ पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “नैसर्गिक रानभाज्या या प्रत्येकासाठी हेल्थ टॉनिक ठरत आहेत,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म, आणि त्यांच्या पाककलेतील उपयोगाची सखोल माहिती मिळाली. प्रदर्शित रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

Going green for a better tomorrow!Jaihind College of Science, in association with Social Forestry Department, Kudal, pla...
03/08/2024

Going green for a better tomorrow!

Jaihind College of Science, in association with Social Forestry Department, Kudal, planted 60 trees on campus!

Special thanks to our guests:
Mr. Pramod Sawant, Round Officer, Sawantwadi, Dodamarg, Banda
Mrs. Shreya Parab, Round Officer, Mangaon
Mr. Sunil Sawant, Round Officer, Kudal
Mr. Sameer Kharwat, Round Officer, Kudal

for sharing valuable insights on the importance of tree plantation!
Let's work together to make our planet a greener and healthier place!

🎖️ Honoring a Hero: Subedar Major Yogendra Singh Yadav, PVCYesterday, I had the privilege of meeting Subedar Major Yogen...
23/06/2024

🎖️ Honoring a Hero: Subedar Major Yogendra Singh Yadav, PVC

Yesterday, I had the privilege of meeting Subedar Major Yogendra Singh Yadav, a true hero. He is the youngest recipient of India’s highest military award, the Param Vir Chakra, which he earned during the Kargil War. His remarkable courage and unwavering commitment to duty led to the capture of major features on Tiger Hill by the 18th Grenadiers. 🇮🇳

It was an unforgettable experience to serve lunch alongside my F&B staff from Jaihind College of Science. Meeting such extraordinary individuals leaves an indelible mark, reminding us of the sacrifices made by our brave soldiers. 🙏🏼🍽️

23/06/2024

Address

Rameshvar Plaza, First Floor
Savantvadi
416510

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmanya Education, Kokan Region posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Lokmanya Education, Kokan Region:

Share