Nutan Vidyalaya Shikshan Sanstha, Selu

Nutan Vidyalaya Shikshan Sanstha, Selu Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nutan Vidyalaya Shikshan Sanstha, Selu, Nutan Vidyalaya, Selu.

स्वा. रा. तीर्थ यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र म्हणून उदयास आलेली व त्यागी भावनेतून कार्य करणारे शिक्षक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या कार्याची व चळवळीची केंद्र असलेली नूतन विद्यालय शिक्षण संस्था भारतीय स्वातंत्र्यपूर्वी १९३९ ला स्थापन झाली

01/01/2026
नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जि.परभणी संचालित कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला सुवर्ण महोत्सवी व्याख्यानवक...
20/08/2025

नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू जि.परभणी संचालित
कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला
सुवर्ण महोत्सवी व्याख्यान
वक्ते :- पद्मश्री.महाराष्ट्रभूषण डॉ.अभय बंग
विषय :- वेगळे शिक्षण शक्य आहे काय ?
शनिवार दि.23 ऑगस्ट 2025
सकाळी 11 वाजता.
स्थळ :- श्रीमती.ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला सांस्कृतिक सभागृह,सेलू

16/08/2025

सौ. सावित्रीबाई बद्रीनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा सेलू

नूतन विद्यालय शिक्षण संस्था,सेलू संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला वश्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अ...
30/07/2025

नूतन विद्यालय शिक्षण संस्था,सेलू संचालित
श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व
श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग,सेलू जि.परभणी
वर्धापन दिन तसेच गुणवंत विद्यार्थिनी सत्कार समारंभ 2024 - 2025

निमंत्रण पत्रिका

13/07/2025

विद्यार्थी मनोगत चि.आरीजखान पठाण

13/07/2025

प्रमुख पाहुणे डॉक्टर अशोक नाईकनवरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

शिष्यवृत्तीधारक व एम.टी.एस. परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा.नूतन विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक ...
13/07/2025

शिष्यवृत्तीधारक व एम.टी.एस. परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा.

नूतन विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ दिनांक 12 जुलै 2025 रोजी नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब. गिल्डा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर होते. प्रमुख पाहुणे व शाळेचे माजी विद्यार्थी सेलू येथील प्रसिद्ध अस्थितज्ञ डॉक्टर अशोक नाईकनवरे यांच्या शुभहस्ते शिष्यवृत्ती व महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेतील एकूण 30 विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
"विद्यार्थ्यांनी चिकाटी राखत सातत्याने प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते" असे प्रतिपादन डॉक्टर अशोक नाईकनवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
प्रमुख उपस्थिती लाभलेले संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांनी केला.
कार्यक्रमाचे स्वागत गीत श्री सच्चिदानंद डाखोरे व संच, प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री किरण देशपांडे, पाहुण्यांचा परिचय श्री अशोक लिंबेकर, सूत्रसंचालन श्री बाळू बुधवंत,सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्री सुनील तोडकर,आभार प्रदर्शन श्री सुधीर जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री बन्सीलाल पद्मावत, श्री अरविंद अंबेकर, श्री किशोर कटारे,श्री संतोष मलसटवाड, श्री विजय धापसे, श्री फुलसिंग गावित, श्री गजानन मुळी व श्री प्रभू भुसारे यांनी सहकार्य केले.

श्रीमती.लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या 10 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थिनी
17/05/2025

श्रीमती.लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या 10 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थिनी

नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन विद्यालय सेलू प्रशालेचा विद्यार्थी चि.स्वराज लक्ष्मण जाधव 100% गुण मिळवल्य...
15/05/2025

नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन विद्यालय सेलू प्रशालेचा विद्यार्थी चि.स्वराज लक्ष्मण जाधव 100% गुण मिळवल्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.एस.एम.लोया चिटणीस मा.प्राचार्य.डॉ.व्ही.के.कोठेकर नूतन विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष मा.श्री.सितारामजी मंत्री प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एस.व्ही.पाटील उपमुख्याध्यापक श्री.के.के.देशपांडे पर्यवेक्षक श्री.आर.एस.मोगल सहशिक्षक श्री.एस.एम.हिवाळे यांची उपस्थिती होती.

Nutan Mahavidyalaya Selu
15/05/2025

Nutan Mahavidyalaya Selu

Address

Nutan Vidyalaya
Selu
431503

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 5pm

Telephone

(2451) 222 750

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nutan Vidyalaya Shikshan Sanstha, Selu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Nutan Vidyalaya Shikshan Sanstha, Selu:

Share