PSGVP Mandal's College of Pharmacy,Shahada

PSGVP Mandal's College of Pharmacy,Shahada P. S. G. V. Mandal’s College of Pharmacy was established in the year 1994 by Honorable Sahakar Maharashi Late Shree Annasaheb P.K.Patil

TRAINING & PLACEMENT CELL

The training & Placement cell of institute is actively involved in industrial training, project work and placement of students. The objective of T&P cell is to bridging between pharmaceutical industry and academic institute for better development of pharmacy students and makes them employable. The core function of cell is to make contacts with HR departments to pharmaceu

tical companies and forwarded resumes for suitable job position. Cell regularly arrange placement training and aptitude test for pharmacy student to have better prospect and career growth. Also organizes the Industrial visit for up gradation of current scenario in the technology of pharmaceutical sector

26/05/2026
◆ शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी चव्हाण भारती संजू हीची विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल(महिला) संघात ...
26/05/2026

◆ शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी चव्हाण भारती संजू हीची विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल(महिला) संघात निवड ◆

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाची विद्यार्थिनी कु. चव्हाण भारती संजू हीची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) संघात निवड करण्यात आली होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन व आंतरविभागीय सॉफ्टबॉल मुलींच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने तिची विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली होती. ह्या वर्षी सॉफ्टबॉल (महिला) आंतरविद्यापीठ स्पर्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती (महाराष्ट्र) येथे येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) स्पर्धेसाठी कु. चव्हाण भारती संजू हीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या संघात निवड करण्यात आली होती आणि ती विद्यापीठाच्या संघाकडून खेळून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. कु. चव्हाण भारती संजू ही सध्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून तिने सॉफ्टबॉल खेळात उत्तम कामगिरी केल्याने तिची विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली होती आणि तिने महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे. तिच्या या निवडीबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूर भाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले. कु. चव्हाण भारती संजू हीस महाविद्यालयाचे क्रीड़ा विभाग प्रमुख प्रा.हितेंद्र चौधरी यांनी प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले. तिच्या ह्या निवडीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

*⭕ शहादा येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी चव्हाण भारतीय संजू विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल महिला संघात निवड*

https://www.samikaran.in.net/2026/04/bharti.html

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात (अॅकॅडमिक ऑडिटात)  - 'अ' दर्जाचे मानांकन...
04/05/2026

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात (अॅकॅडमिक ऑडिटात) - 'अ' दर्जाचे मानांकन प्राप्त, सलग सहाव्यांदा मान, महाविद्यालयाची उल्लेखनीय झेप..

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मागील वर्षांचे (अॅकॅडमिक ऑडिट) शैक्षणिक अंकेक्षण झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास या जाहीर केलेल्या महाविद्यालयांच्या मानांकनामध्ये 'अ' दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे शैक्षणिक अंकेक्षणात महाविद्यालयास सलग सहाव्यांदा 'अ' दर्जा प्राप्त झाला आहे. विद्यापीठातर्फे मिळणाऱ्या या मानांकनाकरिता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये अध्यापनाची गुणवत्ता, संशोधन उपक्रम, विद्यार्थी विकास कार्यक्रम तसेच संस्थेची एकूण शैक्षणिक प्रगती यांचे सर्वंकष मूल्यमापन करून हे मानांकन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांमधून सक्षम नागरिक घडविण्याचे उपक्रम, विद्यापीठाच्या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या, विविध परीक्षांचे निकाल, महाविद्यालय गुणवत्ता यादीतील विद्यार्थी, राबवित असलेल्या विद्यार्थी हिताच्या योजना, महाविद्यालयात उपलब्ध सोयी - सुविधा, महाविद्यालयातील संशोधन उपक्रम, प्राध्यापकांनी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात नोंदविलेला सहभाग व सादर केलेले शोधनिबंध, अद्ययावत ग्रंथालय सुविधा, सामाजिक उपक्रम, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधा, महाविद्यालयाने विद्यार्थी केंद्र बिंदू ठेवून त्यात शैक्षणिक सोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, युवारंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे योगदान, विविध प्लेसमेंट मुलाखती द्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी माहिती मागविण्यात आली होती. कुलगुरूंनी गठित केलेल्या समितीने विद्यापीठाला प्राप्त झालेले अर्ज व त्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची खातरजमा करून महाविद्यालयास 'अ' दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयाला वर्ष २०२२ मध्ये नॅककडून "अ" दर्जा प्राप्त झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील औषधनिर्माणशास्त्र शाखेतून नॅकला सामोरे जात "अ" दर्जा प्राप्त करणारे हे महाविद्यालय कबचौ उमवि कार्यक्षेत्रातील 3.15 सीजीपीए प्राप्त करणारे एकमेव महाविद्यालय असून विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अॅकॅडमिक ऑडिटच्या या उत्तुंग यशाबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, मंडळाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य यांनी अभिनंदन व समाधान व्यक्त केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा राखून महाविद्यालयास सन्मानजनक ग्रेड मिळविण्यासाठी सहभाग दिल्याबद्दल प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी सर्वांचे अभिनंदन करीत आभार मानले आहे.

मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्‍या "थांबला तो संपला" हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या विविध ज्ञानशाखांची वाटचाल सुरू आहे. विद्यापीठातर्फे शैक्षणिक अंकेक्षणात पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला 'अ' दर्जा प्राप्त होणे ही अभिमानास्पद बाब आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक आलेख उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सोयी -सुविधा मिळाव्यात, महाविद्यालयाची गुणात्मक कामगिरी उत्तम रहावी यासाठी संस्थेची भूमिका नेहमीच आग्रही असते. याचा परिणाम निश्चितपणे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीवर होत असतो.
● बापूसाहेब दीपकभाई पाटील (अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक अंकेक्षणातून महाविद्यालयाला सलग सहाव्यांदा 'अ' दर्जा मिळवून महाविद्यालयाने गुणवत्ता टिकविण्यात सातत्य राखले आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या सामूहिक व प्रामाणिक प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळातर्फे नेहमीच गुणात्मक विकासासाठी प्रोत्साहन मिळत असते. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची गुणवत्तापूर्ण घोडदौड सुरू असून विद्यार्थी हितास प्राधान्य देत सर्वच विद्याशाखांचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी यापुढेही सांघिक प्रयत्न सुरूच राहतील. भविष्यातही गुणवत्ता वृद्धीसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल.
● प्रा. मकरंदभाई पाटील (समन्वयक - शैक्षणिक व सामान्य प्रशासन, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा

महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जा जोपासण्यासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाकडून मिळणारे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची समाधानकारक कामगिरी, महाविद्यालयात विविध उपक्रम राबविताना असणारी सांघिक भावना यामुळे महाविद्यालयास 'अ' दर्जा प्राप्त झाला आहे. यापुढेही महाविद्यालयाचे नावलौकिक करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. ‘अ’ दर्जाचे मानांकन मिळाल्यामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक प्रतिमा अधिक बळकट झाली असून, भविष्यातील शैक्षणिक, संशोधन, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उपक्रमांना यामुळे नवे बळ मिळणार आहे.
● डॉ. एस. पी. पवार (प्राचार्य - पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा)

https://youtu.be/PxPON1u5ZLo?si=naOCeQE0fgmq1C1O
===================
शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला सलग सहाव्यांदा ‘अ’ दर्जा

⭕शहादा येथील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठ शैक्षणिक संरक्षणात दर्जाचे मानांकन प्राप्त
https://www.samikaran.in.net/2026/04/a.html

◆ पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जी - पॅट राष्ट्रीय स्पर्धा ...
25/04/2026

◆ पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जी - पॅट राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश .. ◆

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (एनबीईएमएस) मार्फ़त घेण्यात आलेल्या जी - पॅट २०२६ (ग्रॅज्युएट फार्मसी एप्टीट्यूड टेस्ट) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. दरवर्षी जी - पॅट परीक्षा संपूर्ण देशातून बी. फार्मसी पदवीधारक किंवा पदवीच्या अंतिम वर्षांमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच एम. फार्मसी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेच्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यात पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील ४ विद्यार्थी जी - पॅट २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यात जी - पॅट परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी पाटील रुचिका राजेंद्र (२३३ गुण), पाटील योगिता मोतिलाल (२१९ गुण), निकुंभे जयदीप विष्णू (१९५ गुण), पाटील डिंपल किशोर (१७८ गुण) मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. जी - पॅट २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी दरमहा १२ हजार ४०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते त्यासाठी महाविद्यालयातील चार विद्यार्थी पात्र झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याना देशातील नामांकित संस्थेमध्ये प्रवेशाची संधी मिळते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन व भविष्याच्या दृष्टीने जी - पॅट परीक्षा ही खूप महत्वाची ठरते. विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सातत्याने महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यास वर्गांचे आयोजन व मार्गदर्शन, तज्ञ प्राध्यापकांचे मार्गर्शनवर आधारित गेस्ट लेक्चर, विशेष मार्गदर्शन सत्र वर्षभरात आयोजित करण्यात आले होते. जी - पॅट २०२६ परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांना दिले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, अनिल भंसाली, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार तसेच संस्थेच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.सैय्यद हमीद हसनी, डॉ.सुनिला पाटील, प्रा.डॉ.राहुल लोव्हारे, प्रा.सुलभा महाजन, प्रा.योगेश रोकडे, प्रा.अमित धनकानी, प्रा.अमृता पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.मानसी धनकानी, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.दिवाकर पाटील, प्रा.आझम शेख, प्रा.समीर शेख, प्रा.रोशन चौधरी, प्रा.मृणाल पेंढारकर, प्रा.नेहा पाटील, प्रा.कृतज्ञा पाटील व कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले व परिश्रम घेतले. जी - पॅट राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेसाठी जी - पॅट परीक्षा प्रमुख प्रा.योगेश रोकडे यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

*⭕ पूज्य साने गुरुजी विद्या प्रचारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जी - पॅट राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश*

https://www.samikaran.in.net/2026/04/jpet.html

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात "नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न..कवयित्री...
08/04/2026

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात "नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न..

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग, केसिआयआयएल आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने "नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.के.पटेल, प्रमुख अतिथी, वक्ते व केसिआयआयएल जळगावचे सी.ई.ओ डॉ नवीन खंडारे, केसिआयआयएल जळगावचे कार्यक्रम समन्वयक कु.रोशनी जैन, स्टेमसेज टेकवर्ल्ड एलएलपी व निवाची सोल्युशनचे सह-संस्थापक हर्षल सोनवणे उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात झाली. कार्यशाळेत पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते डॉ नवीन खंडारे यांनी विद्यार्थ्याच्या कल्पनांचे ‘स्टार्टअप्स’ मध्ये रूपांतर करण्याविषयी एक अत्यंत उद्बोधक व्याख्यान दिले. ज्यामध्ये त्यांनी समस्येची ओळख, प्रत्यक्ष अमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने असलेली सज्जता या बाबींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. या पहिल्या सत्राचा मुख्य विषय “कॅम्पस ते कंपनी : कल्पनेपासून स्टार्टअपपर्यंतचा प्रवास हा होता. त्यानंतर दुसऱ्या सत्रात रोशनी जैन यांनी ‘इंन्क्यूबेशन सपोर्ट’ म्हणजेच उद्योजकीय विकासासाठीचे सहाय्य आणि स्टार्टअप्सना सक्षम करण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्याना केसिआयआयएलच्या इंन्क्यूबेशन परिसंस्थेची, उपलब्ध मार्गदर्शनाची आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुनियोजित मार्गांची सविस्तर ओळख कारकून दिली. त्यानंतर तिसऱ्या सत्रात हर्षल सोनवणे यांनी स्टार्टअप परिसंस्थेतील स्वतःचे प्रत्यक्ष उद्योजकीय अनुभव आणि त्यातून शिकलेली व्यावहारिक धडे उपस्थितांशी सामायिक केले. विद्यार्थांचा प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ एम.के.पटेल यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना सांगितले की, औषधनिर्माण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून औषध निर्मिती करता येईल. त्यावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करून संशोधन करावे त्याचप्रमाणे औषधनिर्मिती करतांना विविध तंत्रज्ञानाचा वापर केला तर येणाऱ्या काळात त्याचा नक्कीच सर्वाना फायदा होईल. भारताला जगात एक विश्वसनीय स्तरावर पोहचवण्यासाठी सर्वांना नवीन तंत्रज्ञान अंगीकृत करून त्याचा वापर करून भारताची अर्थव्यवस्था ही अजून बळकट बनविण्यासाठी हातभार लावता येईल. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन नवतंत्रज्ञान कौशल्य कशा पद्धतीने विकसित करता येईल या कडे लक्ष केंद्रित करावे. तसेच या उपक्रमाचे मूल्य आणि त्याचा होणारा प्रभाव यावर विशेष मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता व त्याना त्याबाबतचे प्रमाणपत्र ही देण्यात आले. या कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन, संयोजक, प्रा. योगेश रोकडे यांनी केले तर आभार प्रा.हितेंद्र चौधरी यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सौ. अमृता पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

◆ शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आयोजित मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यूत ७० विद्यार्थ्यांची मॅक्लॉइड्स फार्मासुट...
12/03/2026

◆ शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आयोजित मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यूत ७० विद्यार्थ्यांची मॅक्लॉइड्स फार्मासुटीकल कंपनीत निवड…◆

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखती) चे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी दमण येथील नामांकित मॅक्लॉइड्स फार्मासुटीकल कंपनीचे अधिकारी पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) घेण्यासाठी आले होते. त्यात कंपनीचे उपव्यवस्थापक राजकुमार, एचआर हिरेन पटेल यांनी इंटरव्ह्यू घेतले. सदर कंपनीत प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अशुरन्स, फर्मेंटेशन इंजीनियरिंग, स्टोर, वाटर सिस्टम, एचवीएस सिस्टम ह्या विभागांसाठी विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेण्यात आली असून नोकरीचे ठिकाण कळविण्यात येणार आहे. सदर पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) मध्ये सामान्य अभियोग्यता चाचणी आणि या प्रक्रियेनंतर निवडक विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. सदर पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एकूण १७० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी एकूण ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना त्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. या पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे चांगले व उत्तम पॅकेज दिले जाणार आहे. सदर कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, मंडळाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.समीर शेख, प्रा.अमित धनकानी व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

कॅम्पस प्लेसमेंट ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि संस्थेच्या गुणवत्तेची पावती व प्रतिक आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. संस्थेतर्फे नेहमीच परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या, शेतकरी कुटुंबातील मुला - मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून त्यांना नोकरीसाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागणार नाही ह्या दृष्टीने, उद्देशाने दरवर्षी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येत असते व यावर्षीही चांगला प्रतिसाद मिळाला तसेच विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असते. कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना थेट उद्योगविश्वात प्रवेश मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे.”
(बापूसाहेब दीपकभाई पाटील - अध्यक्ष - पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)

https://youtu.be/waYmTATFrJM?si=MD3cH0El_iJcs4_w

Pool Campus Drive / Macleods Pharmaceuticals / PSGVPM’s Cop Shahada

Address

Lonkheda
Shahada
425409

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912565229168

Alerts

Be the first to know and let us send you an email when PSGVP Mandal's College of Pharmacy,Shahada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to PSGVP Mandal's College of Pharmacy,Shahada:

Share