Chitrai School Of Performing Art's

Chitrai School Of Performing Art's Chitrai school of performing arts
It’s a Acting school
Our address
lotus
Front of Tripursundari Hotel ,
VIP Road
Sath Rasta
Solapur

विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल - विनोबा भावे.                                                     Pc-
15/10/2020

विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल

- विनोबा भावे. Pc-

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण        गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. ...
11/10/2020

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. With .bhave #मावशी

19/09/2020

जन्मापासूनच तो गृहीत धरला जात होता.
त्याने सर्व ताकदीचीच कामे करावी असा समज होता.
त्याने भावनिक होऊन चालणार नाही अशी ही त्याच्या कडून अपेक्षा केली जात होती.
त्याने सगळ्या घराची जबाबदारी घ्यायलाच हवी अशी सगळ्यांचीच समजूत झाली. अगदी त्याची सुद्धा.
त्याने आयुष्याच्या रंगमंचावर मुलगा,भाऊ,बाप,सासरा,आजोबा,मित्र,नवरा अशी कित्येक पात्र निभवलीत.
पण ही सगळी पात्रं निभावताना तो कधी ' तो ' म्हणून जगलाच नाही.
असमानतेचा त्रास त्याला ही झाला.
पण त्यानें आजपर्यंतच त्याच म्हणणं कधी व्यक्त केलंच नाही.
पण आता बास झालं..
तो ही थकलाय..
त्याला ही मोकळं व्हायचंय.
त्यासाठीच तो येतोय.
त्याच म्हणणं व्यक्त करायला.
तर पहायला विसरु नका,

प्रायोगिक सदन प्रस्तुत,
मैफल पत्रांची.

उद्या सकाळी ११ वाजता.
लेखक आणि सादरकर्ता
पृथ्वीराज महेंद्र मुऱ्हे

12/09/2020

काय चूक होती तीची?
तिचं एकट्याने घराबाहेर पडणं?
की तिचं उशिरा पर्यंत घराबाहेर राहणं?
तिचं प्रतिकार करणं?
का तीच 'स्त्री' असणचं ही तिची एक मोठ्ठी चूक होती?

आज आपण खूप उत्साहाने प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दीन साजरा करतो...पण खरंच आपला देश प्रजासत्ताक आहे?? खरंच स्त्रियांना त्यांचं स्वातंत्र्य मिळत?

भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत. या वाक्याचा आपण कितपत विचार करतो?

का प्रत्येक स्त्रीकडे एकाच नजरेने पाहिल जात?
का क्षनिक शारीरिक सुखासाठी तीच अस्तित्व तिच्याकडून हिसकावून घेतल जात?
आणि त्या विरूद्ध तक्रार केल्यास तिला न्याय मिळायला का इतकी वर्षे लागतात?
का समाजात एक वेळ दोषी ला स्वीकारलं जात पण त्या पीडित व्यक्तीला नाही?

हे सगळ होत असताना उलट हीच्या कुटुंबानेच का अपमान सहन करायचा?
या सगळ्यात तीची आणि तिच्या कुटुंबाची काय घालमेल होत असेल याचा विचार केलाय?
नाही ना?
तिने केलाय.

तिचे विचार, तिचे प्रश्न, तिच्या भावना पत्राद्वारे मांडायला,
ती येतेय.

पहायला विसरू नका.

प्रायोगिक सदन प्रस्तुत,
मैफल पत्रांची.

सादरकर्ती - ऐश्वर्या स्वाती अनिल दिवाणजी
लेखक - अभिनंदन दत्तात्रय बासुतकर

उद्या संध्याकाळी सहा वाजता.








05/09/2020

प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारी नाती असतात...
पण हे नात प्रत्येकाच्या नशिबात असेलच अस नाही...
आणि ज्यांच्या आयुष्यात हे नातं असतं ते खूप नशीबवान असतात असं मी म्हणेन.
ह्या नात्याला शब्द नसतात पण भावना असते..
द्वेष नसतो.. फक्त प्रेम असत...
फसवणूक तर नाहीच तर उलट शेवटपर्यंत मिळणारी साथ असते...
त्याच्या सोबत मैत्री कराल तर फक्त आणि फक्त प्रेम, जिव्हाळा आणि निष्ठाच मिळेल...
याच्या एवढी माणूसकी बाकी कोणत्याही नात्यात नसते.
अस म्हणतात की निरपेक्ष प्रेम म्हणजे काय तर ते ह्या नात्याकडून शिकावं.
ह्याला आपण आपल्या मनातलं सगळं काही सांगू शकातो,अगदी बिनधास्तपणे.
कारण हे असं एकच नातं असतं जे आपल्याला कधीचं judge करत नाही.
तर मग अश्या या नवीन नात्यासाठी आम्ही आमचं पुढचं पत्र घेऊन येत आहोत.
हे पत्र आम्हाला तुमच्याच पैकी एका प्रेक्षकाने पाठवलेलं आहे. सौरभ धुमाळ.
तर पाहायला विसरू नका.

प्रायोगिक सदन प्रस्तुत

मैफल पत्रांची.
उद्या संध्याकाळी सहा वाजता.
धन्यवाद.

असं नात जे खूप कमी जणांच्या नशिबात येतं.ह्या नात्यात बोलायची जास्त गरज पडत नाही,पण तरीही एकमेकांना एकमेकांच सगळं कळतं.हे...
04/09/2020

असं नात जे खूप कमी जणांच्या नशिबात येतं.

ह्या नात्यात बोलायची जास्त गरज पडत नाही,
पण तरीही एकमेकांना एकमेकांच सगळं कळतं.

हे नात आयुषभर जरी टिकतं नसल ना तरी
त्याच्या आठवणी आयुषभरासाठी राहतात.

ज्याला तुम्ही तुमच्या मनातलं सर्वकाही सांगू शकता,
आणि तो सगळं ऐकून घेईल,
तुम्हाला judge न करता.

मग या अश्या नवीन नात्याला आम्ही आमचं पुढचं पत्र लिहत आहोत.

प्रायोगिक सदन प्रस्तुत,
सादर करीत आहोत.

* मैफ़ल पत्रांची*

लेखक- सौरभ धुमाळ
सादरकर्ता-
निखिल नितीन पाटील

तुम्ही पाठवलं आहे का कोणाला पत्र ????
पाठवलं असेल तर कोणाला ??????
पाठवलं असेल तर like करा share करा subscribe करा

29/08/2020

ह्या व्यक्तीबद्दल जेवढ बोलावं तेवढं कमीच आहे.
घरी आल्या आल्या आपली नजर पहिल्यांदा तिचाच शोध घेते.
ती घरी नसते ना तेंव्हा घर एकदम रिकाम रिकाम वाटतं.
जेंव्हा आपल्या बरोबरच काही तरी वाईट घडतं तेंव्हा आपण तिच्याच कुशीमध्ये धाव घेतो,
आणि ती ही तितक्याच प्रेमाने आपल्याला तिच्या कुशीत घेते.
मग तिथं ना वेळेचं भान असतं ना वयाच.
त्या व्यक्तीबद्दल आपल प्रेम शब्दात मांडणं शक्य नाहीये.
तिने आपल्यासाठी खूप काही केलं आहे,
अजुन ही करतेच आहे.
तिच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत.
कधी गोड बोलून,कधी रागावून, तर कधी काहीच न बोलता.
पण आपण तसं नाही करू शकत.
पण आता तेच प्रेम व्यक्त करायला भेटलेला एक सोप्पा मार्ग म्हणजे पत्र.
तिच्या साठीच आम्ही आमचं उद्याच पत्र घेऊन येत आहोत.

प्रायोगिक सदन प्रस्तुत,
मैफल पत्रांची.

उद्या संध्याकाळी सहा वाजता,
पाहायला विसरू नका.
धन्यवाद.

सादरकर्ता आणि लेखक
सोहेल शेख.







प्रायोगिक सदन प्रस्तुत, “ मैफ़ल पत्रांची “ सादरकर्ता आणि लेखक:-सोहेल शेख. आम्ही घेऊन येत आहोत  नवीन पत्र नवीन नात्याला य...
28/08/2020

प्रायोगिक सदन प्रस्तुत,
“ मैफ़ल पत्रांची “
सादरकर्ता आणि लेखक:-सोहेल शेख.
आम्ही घेऊन येत आहोत नवीन पत्र नवीन नात्याला येत्या रविवारी तर पहायला विसरू नका
तुम्ही पाठवलंय का पत्र?
पाठवलंय असेल तर कोणाला ?
पाठवला असाल तर नक्की पहा आणि आमच्या चॅनेल ला subscribe करा

कलावंत pc-      #खंत                                               a
26/08/2020

कलावंत pc- #खंत a

आगमन तर झाले पण वादना शिवाय!!                 बाप्पा, या वर्षी कोरोना महामारी मुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होतोय...
24/08/2020

आगमन तर झाले पण वादना शिवाय!! बाप्पा, या वर्षी कोरोना महामारी मुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होतोय. ढोल ताशा वादनाची सेवा या वर्षी करता येणार नाही याची खंत सर्व वादकांना आहे. या वर्षी जरी साधे पणाने गणेशोत्सव साजरा होत असला तरीही पुढच्या वर्षी याच्या दुप्पटीने पूर्ण जोशात, जोमात आणि उत्साहात साजरा करू. गणपती बाप्पा मोरया..! मंगलमुर्ती मोरया..! गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!🌺 Missing all kalawant team & my partners. #खंत

22/08/2020

प्रायोगिक सदन प्रस्तुत,
“ मैफ़ल पत्रांची “

सादरकर्ता आणि लेखक :-
सुधीर जयकुमार खोगरे

घरातील अशी एक व्यक्ती जी वयाने सर्वात मोठी असते.त्या व्यक्तीचा आपण नेहमी आदर करतोत.काळजी घेतोत.
त्या व्यक्तीकडून आपल्याला त्यांच्या काळातील काही
मजेशीर गोष्टी ऐकायला मिळतात. त्यांचं वागणं,बोलणं,राहणीमान सर्वच amazing वाटतं. असं म्हणतात की , घरातील लहान मुलं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांचा पुनर्जन्म असतो म्हणे. किती छान ना! आयुष्यातल्या जवाबदारीतून मुक्त होऊन ते आपल्या कुटुंबासाठी वेळ देतात. घरातील लहान मुलांना सांभाळणं , त्यांच्या सोबत छान वेळ घालणं. अगदी कधी कधी लहान मुलांसारखं वागणं हे त्यांचं आयुष्य बनून जात.त्या व्यक्तीसाठी हा पुढचा पत्र .

तर कळालं का आम्ही कोणाला पत्र लिहतोय ?

तुम्ही पाठवलं आहे का कोणाला पत्र ????
पाठवलं असेल तर कोणाला ??????
पाठवलं असेल तर like करा share करा subscribe करा
stay tuned
link in bio



the_superhero



राष्ट्रभान. (Rashtrabhan) Award winning Shortfilm. लेखक/दिग्दर्शक : कन्हैय्या कुबेर वाघमारेविशेष मार्गदर्शक : अभिनंदन बा...
15/08/2020

राष्ट्रभान. (Rashtrabhan) Award winning Shortfilm.

लेखक/दिग्दर्शक : कन्हैय्या कुबेर वाघमारे
विशेष मार्गदर्शक : अभिनंदन बासुतकर
निर्माता :कन्हैय्या कुबेर वाघमारे
छायाचित्रीकरण : करण जाधव,पैगंबर शेख,सागर पुजारी,सिद्धेश्वर पुजारी
सहाय्यक दिग्दर्शक : स्वप्नील वाघमारे
संकलन: दिनेश म्याना
डबिंग : सचिन जगताप
प्रोडक्शन मॅनेजर : सुशांत वाघमारे
कलाकार : अभिजित अधटराव,राहुल चवरे,रेखा बासुतकर,किरण फडके,सोमशेखर करके,विनायक,रमेश राचरला,राजू झुंजा,शशिकांत मल्लाडे,सुमित मडूर
बाल कलाकार : जान्हवी सोनवणे
सहकार्य : जॉनी दंडीन,बासुतकर परिवार (घर),क्षीरसागर (कँटीन),इम्रान शेख (मार्केट स्टॉल)
प्रसिद्धी प्रमुख - योगेश वाघ.

Address

@hotel Lotus
Solapur
413004

Opening Hours

Monday 6pm - 9pm
Tuesday 6pm - 9pm
Wednesday 6pm - 9pm
Thursday 6pm - 9pm
Friday 6pm - 9pm
Saturday 6pm - 9pm
Sunday 6pm - 9pm

Telephone

7507339627

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chitrai School Of Performing Art's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share