16/11/2024
आदरणीय शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयाचे सर्व सहकर्मी,
सप्रेम नमस्कार!
महाविद्यालयातील NAAC भेट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी जे योगदान दिले, ते खरोखरच महत्त्वपूर्ण आणि प्रशंसनीय आहे. आपल्या मोलाच्या वेळेचा त्याग, बहुमूल्य सूचना, आणि अथक परिश्रमांमुळे ही प्रक्रिया निःसंशयपणे यशस्वी व फलदायी झाली आहे.
आपल्या संस्थेचे सर्वेसर्वा *मा. डॉ. नंदकुमार वेदक साहेब, मा. उन्मेषजी वेदक साहेब, मा. नानासाहेब यादव सर*, आणि *मा. पुरुषोत्तम मुळे* सर यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला NAAC SSR शी संबंधित कामाची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.
विशेषतः शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेला पुढाकार, ट्यूबलाईट्स आणि सनबोर्ड्स संबंधित कामांपासून परिसर स्वच्छतेपर्यंत केलेली मेहनत ही अत्यंत प्रशंसनीय आहे. आपण घेतलेल्या जबाबदारीमुळेच महाविद्यालयाचा परिसर सुशोभित आणि सुव्यवस्थित झाला, त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.
या प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचारी वर्गाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
NAAC भेटी दरम्यान उपस्थित राहिलेल्या पालक व माजी विद्यार्थी यांचेही मनापासून धन्यवाद आणि आभार.
ज्या महाविद्यालयीन विदयार्थी अतिशय सुरेख अशी रांगोळी काढण्यासाठी मदत केली, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन यशवी केला त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार.
तसेच, ह्या सर्व प्रक्रियेत आपल्या IQAC समन्वयक यांनी केलेल्या कठोर मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी त्यानंचेही आभार मानतो.
आपल्या सर्वांच्या संघटित प्रयत्नांमुळे NAAC peer team च्या सदस्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आणि सुव्यवस्थेचे कौतुक केले, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही असेच सहकार्य आणि समर्पण मिळेल, असा मला विश्वास आहे.
आपल्या योगदानासाठी व *प्रामाणिक* परिश्रमासाठी मनःपूर्वक धन्यवाद!
श्री. जयदीप वाल्मिक देवरे
प्र. प्राचार्य
जी. एम. वेदक सायन्स कॉलेज, तळा-रायगड.