PDVP Jr college, Tasgaon Dist. Sangli

PDVP Jr college, Tasgaon Dist. Sangli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PDVP Jr college, Tasgaon Dist. Sangli, College & University, At Post Tasgaon Dist. sangli, Tasgaon.

11/09/2023
पी. डी. व्ही.पी. महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा.
09/09/2023

पी. डी. व्ही.पी. महाविद्यालयात पालक शिक्षक मेळावा.

07/09/2023
प्रा.एफ.बी.वलांडकर  यांनी महाविद्यालयात शिकत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्याचे ठरविले त्यानुसार दोन मु...
31/08/2023

प्रा.एफ.बी.वलांडकर यांनी महाविद्यालयात शिकत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्याचे ठरविले त्यानुसार दोन मुलींना शालेय गणवेश व वह्यांचे वाटप मा.प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी सर्व गुरुदेव कार्यकर्ते

बहिण भावातील अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हे रक्षाबंधन पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्या...
30/08/2023

बहिण भावातील अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हे रक्षाबंधन पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरे केले. 'एक राखी पुस्तकासाठी ,एक राखी वृक्षासाठी' हा अनोखा उपक्रम साजरा केला.विद्यार्थिनींनी महाविद्यालय परिसरातील वृक्षांना राख्या बांधल्या तसेच ग्रंथालयातील पुस्तकांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात.पुस्तके आपल्याला ज्ञान देतात आणि त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.आज आपण त्यांचे रक्षण केले तर भविष्यात ते आपले रक्षण करण्यासाठी उभे राहतील. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची आवड जोपासावी. आपली प्रगल्भता वाढवण्यासाठी महिन्यातून किमान एक पुस्तक आपण वाचलेच पाहिजे. विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाची अनोखी परंपरा महाविद्यालयात सुरू केली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची पाहणी केली विविध संदर्भ ग्रंथ , पुस्तके , मासिके यांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी मुसळे यांनी मानले.कार्यक्रमाला विज्ञान विभाग प्रमुख प्रा.के.एस.गायकवाड, सहाय्यक ग्रंथपाल प्रा.सुनिता महाडिक , प्रा.ए.एस.सुतार , प्रा.आर.डी.पाटील , प्रा.डी.व्ही.पाटील , प्रा.एल. एस.जाधव , प्रा.रणजीत पाटील, प्रा.सुशांत झांबरे, प्रा.एम.एम.सुर्यवंशी, प्रा.पी. आर.पाटील , प्रा.आर.आर. आष्टेकर, यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या महाविद्यालयातील जूनियर विभागातील इयत्ता अकरावी आर्ट्स मधील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी वैभव सकपाळ हिने रोटरी क्लब...
16/08/2023

आपल्या महाविद्यालयातील जूनियर विभागातील इयत्ता अकरावी आर्ट्स मधील विद्यार्थिनी कुमारी श्रावणी वैभव सकपाळ हिने रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये खुल्या गटात प्रथम क्रमांक चे पारितोषिक मिळवले. त्याबद्दल श्रावणीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पी. डी .व्ही.पी कॉलेज तासगाव येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्...
15/08/2023

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पी. डी .व्ही.पी कॉलेज तासगाव येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य मिलिंद एस. हुजरे .पाटील ए.के. ,काळभोर आर ,जी ,कुंभार व्ही. डी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एन .सी .सी विद्यार्थ्यांनी परेडचे सादरीकरण मान्यवरांसमोर केले .तसेच त्यांना मानवंदना दिली.

Address

At Post Tasgaon Dist. Sangli
Tasgaon
416312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PDVP Jr college, Tasgaon Dist. Sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share