16/04/2026
*चित्रकला शिक्षणतील दैदिप्यमान व समृद्धतेचा वारसा जपणारी संस्था..*
ठाणे स्कुल आॅफ आर्ट ही ठाणे शहरातील चित्रकलेचे औपचारिक शिक्षण देणारी एकमेव संस्था आहे..गेली ४० वर्षे ही संस्था चित्रकला क्षेत्रात समृद्धतेने कार्यरत आहे.. १९८६ साली श्रीम. नीलिमा कढे , श्रीम. वर्षा कुलकर्णी, श्रीम. अरूणा मोहीत यांनी संस्थेची स्थापना केली. गेल्या ४० वर्षात अनेक विद्यार्थी घडवले.
या संस्थेतील विद्यार्थ्यांनी देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा यासाठी दर्जात्मक व वैविध्यपूर्ण अशा प्रायोगिक स्वाध्यायांची सतत रचना करत आहे..
आत्तापर्यंत या संस्थेमधून शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी यशस्वीपणे देशविदेशात मार्गक्रमण करत आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून अनेक विद्यार्थी या संस्थेत दरवर्षी शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात.
आत्मियतेने ज्ञानदानाचे कार्य या संस्थेतील सर्व शिक्षक करत आहेत.
मूल्यात्मक औपचारिक शिक्षणाबरोबरच विविध प्रयोग व कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी जीवन समृद्ध होण्यासाठी भर दिला जातो..
नुकतेच या संस्थेचे वार्षिक कला प्रदर्शन संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांनी एक दिलाने भारतीय चित्रशेलीचे वाॅलपेंटिग साकारल्या मुळे प्रदर्शनात एक वेगळाच उत्साह दिसून येत होता..
या प्रदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी विविध वैविध्यपूर्ण अशा कलाकृती सादर केल्या होत्या..
या वर्षी फौडेशन व एटिडि या वर्गातील विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील मुख्य विषया बरोबरच मेटल वर्क, सिरॅमिक वर्क, पेपर क्राफ्ट, पेपर मॅशे, रेझिन आर्ट व प्रिंट मेकिंग या विषयातील विविध प्रयोगशील कलाकृती तयार केल्या होत्या..
एडिडी वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेले डिझाईन, स्टील लाईफ,रेझिन आर्ट, पपेट वर्क विशेष उल्लेखनीय होत्या..
जी.डी.आर्ट या वर्गातील विद्यार्थ्यांची कामे अतिशय अभ्यासपूर्ण व व्यावसायिक दर्जाची होती. विशेषत प्रिंट मेकिंग व पेंटिंग यांचा दर्जा सर्वोत्कृष्ट होता..
या प्रदर्शनासाठी संस्थेचे विश्वस्त, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
पारितोषिक वितरण समारंभातील प्रमुख पाहुणे मा. मिलिंद बल्लाळ. मुख्य संपादक ( ठाणे वैभव ) यांनी संस्थेच्या सर्व विश्वस्त, शिक्षक व विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले..
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक उत्कृष्ट अशी कविता ही सादर केली.
या चाळीस वर्षांच्या संस्थेच्या जडणघडणीत संस्थेने कोणत्याही व्यावसायिक आमिषांना बळीने पडता फक्त विद्यार्थी हित व शैक्षणिक गुणवत्ता यावरच भर दिल्यामुळे ठाणे स्कुल आॅफ आर्ट हे महाविद्यालय महाराष्ट्रातील अग्रणी नावलौकिक टिकवून राहील.