23/12/2015
महाराष्ट्रातील 24 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आणि कौशल्य प्रशिक्षण मिळावे, या हेतूने महाराष्ट्र सरकार आणि बॉश यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ‘रोजगार निर्मितीतून भारताचा विकास आणि आर्थिक प्रगती’ हा कार्यक्रम बॉश या आयटीआयच्या माध्यमातून राबवित आहे. सुमारे 2000 विद्यार्थी या कार्यक्रमातून प्रशिक्षित होणार असून, हा कार्यक्रम आणखी 5 आयटीआयमध्ये राबविण्याचा मनोदय कंपनीने व्यक्त केला. ज्या 24 आयटीआयमध्ये हा कार्यक्रम राबविला जाईल, त्यात बोरीवली, बेलापूर, रत्नागिरी, कर्जत, सिन्नर, चांदवड, यावल, नाशिक, औंद, शिरूर, खेड, पंढरपूर, लातूर, अंबड, घाटंजी, अकोला, अमरावती, तिरोडा, पोंभूर्णा, नागपूर, भंडारा, मूल, तुमसर, मोखाडा यांचा समावेश आहे.
Glad to witness the signing of MoU between BOSCH & 24 ITIs of Maharashtra for skill devpt & employment of 2000 youth. This MoU is a part of Bosch India 's initiative 'BRIDGE (Bosch's Response to India's Development & Growth Through Employability Enhancement)'. These ITIs include Borivali, Belapur, Ratnagiri, Karjat, Sinnar, Chandwad, Yaval, Nashik, Aundh Pune, Shirur, Khed, Pandharpur, Latur, Ambad, Ghatanji, Akola, Amravati, Tiroda, Pombhurna, Nagpur, Bhandara, Mul, Tumsar and Mokhada.
This program is Coordinated by me as State Coordinator (PPP)
Dr Vijay Mahajan