Konkan Gyanpeeth Uran College of Commerce & Arts, Uran

  • Home
  • India
  • Uran
  • Konkan Gyanpeeth Uran College of Commerce & Arts, Uran

Konkan Gyanpeeth Uran College of Commerce & Arts, Uran UGC Recognised as 2(f) 12(B) | Affiliated to University of Mumbai | Re-accredited 'B' Grade by NAAC

01/05/2026

It gives me immense pleasure to share that two of our FYBAF students, Sankalp Patil and Madhavi Gurav, have successfully...
12/03/2026

It gives me immense pleasure to share that two of our FYBAF students, Sankalp Patil and Madhavi Gurav, have successfully cleared the CA Foundation Examination. This remarkable achievement is a proud moment for our institution and reflects their dedication, hard work, and determination.

Their success is not only a personal milestone but also an inspiration for other students to pursue their goals with commitment and perseverance. Achievements like these bring great pride to our college and strengthen our belief in nurturing academic excellence.

On behalf of the KGUC Management, Teaching and Non-Teaching Staff, I extend my heartfelt congratulations to both the students and wish them continued success in their future academic and professional endeavours.

I also appreciate the constant guidance and motivation provided by Prof. Riyaz Pathan, HOD – BAF, in encouraging students to strive for excellence.

I wish Sankalp and Madhavi a bright and successful future ahead.

*Dr. Valmik Garje*

*Principal KGUC*

*कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील सांस्कृतिक विभा...
27/02/2026

*कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा*
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचे साहित्य व कला मार्गदर्शक प्रा. विवेक पूनम मधुकर वारभुवन (स्वामी विवेकानंद महाविद्यालय, चेंबूर) हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी मराठी भाषेची ताकद व महत्त्व किती आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले. मातृभाषेतून शिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यानंतर त्या मराठीचे संवर्धन व जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे हे होते. त्यांनी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांना मराठीचे ज्ञान कमी होत आहे. त्यामुळे त्यांची चिंतनशीलता विकसित होत नाही असे सांगितले. पाहुण्यांचा स्वागत व परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पराग कारुळकर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या आयोजनात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ.ए.के. गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात ज्येष्ठ प्रा. व्ही.एस. इंदुलकर, ऐकू येसी समन्वयक डॉ. ए.आर. चव्हाण, मराठी विभागाच्या श्रीमती कल्पना गोगटे, डॉ. एच. के.जगताप आदी मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

26/02/2026
Annual Gathering 2025 - 2026
25/02/2026

Annual Gathering 2025 - 2026

ANNUAL PRIZE DISTRIBUTION 2025 - 2026
25/02/2026

ANNUAL PRIZE DISTRIBUTION 2025 - 2026

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसादकोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना वि...
28/01/2026

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, लिओ क्लब उरण, टायगर ग्रुप, राजे शिवाजी मित्र मंडळ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यावेळी महात्मा गांधी मिशन कामोठे नवी मुंबईच्या ब्लड बँकेचे सहाय्य घेण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही व्ही गर्जे, एम जे एफ ला.मा. सदानंद गायकवाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष मा. रावसाहेब ओहळ, उपाध्यक्ष ला. संदीप सदानंद गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. विशाल पाटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर आयोजित केले गेले, या रक्तदान शिबिरात एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले व आपली सामाजिक बांधिलकी त्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला, महात्मा गांधी मिशनचे डॉ. शुभम शिंगारे, डॉ. नम्रता भोईर, डॉ. प्राची घरत, डॉक्टर निकिता चोरट आदींनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सदस्य,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

*हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!**कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण रायगड**(Ph.D. विभाग*)आपल्या महाविद्...
21/01/2026

*हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!*

*कोंकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण रायगड*
*(Ph.D. विभाग*)

आपल्या महाविद्यालयातील कु. हन्नत युसुफ शेख ह्या विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेतील Business Policy and Administration या विषयातून मुंबई विद्यापीठाची (विद्या वाचस्पती) संशोधन पदवी (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे.
तिचा संशोधनाचा विषय "An Analysis of Corporate Social Responsibility Activities of Companies with Special Reference to Raigad District". असा होता.
या साठी तिला प्रा. डॉ. पराग कारूळकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे उरण महाविद्यालय हे आता Ph.D. चे सेंटर असून या मधून प्रथम Ph.D. होण्याचा मान हन्नत शेख हिला मिळाला आहे तसेच डॉ.पराग कारूळकर यांच्या मार्गदर्शना खालील ती प्रथम विद्यार्थीनी ठरली आहे.
महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे सर, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे हार्दिक अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Annual Sports 2025-2026
20/01/2026

Annual Sports 2025-2026

Utopia 6.0  # Andaz-e-Bayan
16/01/2026

Utopia 6.0 # Andaz-e-Bayan

Address

Near Tahsil Office
Uran
400702

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 5pm

Telephone

+912227221567

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Gyanpeeth Uran College of Commerce & Arts, Uran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Konkan Gyanpeeth Uran College of Commerce & Arts, Uran:

Share