16/09/2025
#इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन विविध उपक्रमाने साजरा
वैराग ता.१६: वैराग येथील साई चॅरिटेबल ट्रस्टच्या इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभियंता दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपले कौशल्य प्रकल्प,पोस्टर,रांगोळी या माध्यमातून दाखवले.
अभियंता दिनाच्या झालेल्या एका विशेष कार्यक्रमात पुणे आकाशवाणीचे निवृत्त उपसंचालक अभियंता गजानन सुरवसे म्हणाले की भावी अभियंत्यांनी नेहमी प्रयोगशील वृत्ती जोपासली पाहिजे.तुमच्या रचनात्मक कामातून देश महासत्ता बनणार आहे याची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेवावी.
पुण्याच्या एमसॉफ्ट कंपनीचे सीइओ अभियंता अमोल व्हनकळस यांनी यावेळी जाहीर केले की पुण्यातील नामवंत कंपन्यांमध्ये इंदिरा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होण्यासाठी आम्ही नेहमी सहकार्य करु.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ मीरा सूर्यवंशी होत्या तर डॉ पार्थ ढेंगळे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भारतरत्न विश्वेश्वरया यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. इंटरनशिप चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल पुण्याच्या एमसॉफ्ट कंपनीतर्फे कॉम्प्युटर विभागाचे विद्यार्थी आणि विभागप्रमुख सुप्रिया शेळके यांचा कंपनीचे सीइओ अभियंता अमोल व्हनकळस यांचे हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रारंभी इलेक्ट्रॉनिकस विभाग प्रमुख सुचेता दुबे कदम यांनी स्वागत केले.प्राचार्य डॉ. डी.आर.पिसाळ यांनी प्रास्ताविक केले.शेवटी मेकॅनिकल विभाग प्रमुख मिथिला धेंडे यांनी आभार मानले.सूत्र संचालन सिव्हिल विभाग प्रमुख समाधान गायकवाड यांनी केले.
संयोजन उपप्राचार्य श्याम झांबरे, प्रा.स्नेहा देशमुख,प्रा.सुधीर भोसले,प्रा.सुप्रिया शेळके,प्रा. जावेद पठाण आदींनी केले.