03/01/2025
*यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात परिसस्पर्श योजनेचा शुभारंभ*
शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगरची परिसस्पर्श योजना अंतर्गत मार्गदर्शक महाविद्यालय म्हणून निवड केली आहे. महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ यांनी प्रत्येकी ₹१ लाख मंजूर करून एकूण ₹ २लाखांचा निधी मंजूर केला आहे. महाविद्यालयास नॅकच्या चौथ्या सायकलमध्ये A+ दर्जा मिळाल्यामुळे ही निवड झाली आहे. या योजनेचा शुभारंभ बायनरी मूल्यांकन कार्यशाळेने करण्यात आला. उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्या मार्गदर्शन व व्याख्यानाने झाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. उत्तम कदम (समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष) यांनी केले. त्यांनी सहभागी महाविद्यालयांचे समन्वयक व आयक्यूएसी समिती सदस्यांचे स्वागत केले तसेच नवीन मूल्यांकन प्रक्रियेसाठी पूर्वतयारीचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रथम सत्रात, डॉ. सागर डेळेकर यांनी परिसस्पर्श योजनेचा आढावा घेतला आणि सर्व महाविद्यालयांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
द्वितीय सत्रात, त्यांनी "बायनरी मूल्यांकन प्रक्रिया" यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी इनपुट, प्रोसेस, व आऊटपुट यांची विभागणी स्पष्ट केली आणि विद्यार्थ्यांवर प्रभावी कामकाजासाठी त्याचा उपयोग कसा करावा, हे सांगितले. तसेच विविध घटकांतर्गत राबवण्याजोग्या उपक्रमांचे महत्त्वही विशद केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांनी नॅकच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम केल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार होतील असे मत व्यक्त केले, तसेच विद्यापीठ व शासनाच्या उपक्रमाचे महत्त्व सहभागींना सांगितले .
कार्यशाळेत सहभागी महाविद्यालये: १ श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, मलकापूर, २. डॉ. घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज, ३. व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी, ४. डी के एक एस सी, इचलकरंजी, ५. अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी, ६. इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय, ७. राजश्री शाहू महाविद्यालय, रूकडी, ई.
श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. आ. डॉ. विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कार्जीनी यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले व योजनेअंतर्गत होणाऱ्या आगामी कार्यक्रमांसाठी सहकार्याचे आश