22/02/2026
जय महाकाली शिक्षण संस्था संचालित अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तसेच अग्निहोत्री पॉलिटेक्निक नागठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या प्रांगणात 'शिवाज्ञा २०२६' चे आयोजन हर्षउल्हासाने करण्यात आले. यावेळी अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे समन्वयक प्राध्यापक अभिषेक कुमार सिंह, IQAC प्रमुख प्राध्यापक शैलेश वाटेकर तसेच अग्निहोत्री पॉलिटेक्निक नागठाणा च्या प्राचार्य प्राध्यापक गौरी जाधव तसेच सांस्कृतिक चमूच्या प्रमुख प्राध्यापिका स्नेहा हिवरकर यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या वेळेस संगणक विभागाची विद्यार्थिनी राजेश्वरी माठिया हिने संचालन केले.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून अग्निहोत्री कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य प्राध्यापक श्री अभिषेक कुमार सिंह होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष पंडित श्री शंकर प्रसादजी अग्निहोत्री भारतीय महापुरुषांच्या एकत्रित येण्याबद्दल विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या संदेशावर भर दिला, ज्यामध्ये राष्ट्रभक्ती, त्याग आणि समर्पणाचा उल्लेख आहे. जीवनातील ध्येय, उद्देश आणि 'का', 'कसे', 'कुठे' यांसारख्या प्रश्नांवर विचार करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.
शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा दाखला देत, त्यांनी स्पष्ट नियोजन, संयोजन आणि समन्वयाचे महत्त्व सांगितले. अफजल खानाच्या लढाईतील शिवाजी महाराजांच्या युक्तीचे उदाहरण दिले. तसेच, त्यांनी एका गुरु आणि शिष्याच्या कथेद्वारे अहंकार टाळण्याचा संदेश दिला.
नारीच्या भूमिकेवर आणि तिच्यावरील मर्यादांवर त्यांनी प्रकाश टाकला. सीतेच्या लक्ष्मणरेषेचे उदाहरण देत, मर्यादांचे पालन करण्याचे महत्त्व सांगितले. सुराज्याची पाच सूत्रे - पवित्रता, निर्मळता, त्याग, समानता, प्रतिष्ठा आणि आईवडिलांची सेवा यावर जोर दिला.
शिवचरित्र वाचण्याचा सल्ला दिला आणि आईवडिलांचा, शिक्षकांचा व मोठ्यांचा मान राखण्याचे महत्त्व सांगितले.