College of Food Technology, Yavatmal

College of Food Technology, Yavatmal This is the 1st Government College of Food Technology in Vidarbha and 2nd In Maharashtra state. This college was established on 2019.

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यवतमाळ येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 रोजी भारत...
17/10/2022

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यवतमाळ येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 रोजी भारताचे मिसाईल मॅन तथा थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉ. विजयराव माने सर यांच्या मार्गदर्शनात व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री उघाडे मॅडम यांच्या उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयातील अधिकारी / प्राध्यापक / कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

08/10/2022
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे“एच ए सी सी पी, आय एस ओ २२०००: २०१८ आणि फोस्टॅक” दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम ...
17/07/2022

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे
“एच ए सी सी पी, आय एस ओ २२०००: २०१८ आणि फोस्टॅक” दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यवतमाळ अंतर्गत येथे दिनांक ११ व १२ जुलै २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना द्वारा “एच ए सी सी पी, आय एस ओ २२०००: २०१८ आणि फोस्टॅक” दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कार्यक्रम अधिकारी( रासेयो) डॉ. जयश्री उघाडे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन.डी.पार्लावार, प्रशिक्षक म्हणून एएसके सेफ फुड सोलूशन प्रा.ली., मुंबई चे संचालक श्री. संजयजी इंदाणी इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
श्री. संजयजी इंदाणी यांनी “एच ए सी सी पी, आय एस ओ २२०००: २०१८ आणि फोस्टॅक” दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम अतर्गत अन्न पुरवठा साखळी मध्ये अन्न पदार्थ उत्पादन व विपणन करीत असतांना अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये एच ए सी सी पी ची भूमिका संदर्भातील माहिती विध्यार्थ्यांना दिली.
अन्न प्रक्रिया क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञाना सह मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीकडे अन्न शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन डॉ. एन.डी.पार्लावार यांनी केले.
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रथम तुकडी हि सत्र ७ मध्ये प्रवेशित असल्याने त्यांना अन्न प्रक्रिया उत्पादन क्षेत्रात प्रत्यक्षपणे काम करतांना अन्न पुरवठा उत्पादन ते विपणन पर्यंत सर्व प्रात्यक्षिक बाबी, नियम व कायदे यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची भविष्याची गरज लक्ष्यात घेवून सदर प्रशिक्षनाचे महत्व अध्यक्षीय भाषणात डॉ. जयश्री उघाडे यांनी विषद केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी वैष्णवी दहातोंडे व पूर्वेश हिवसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भारताच्या स्वतंत्र महोत्सवी वर्षांत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. जयश्री उघाडे कार्यक्रम अधिकारी( रासेयो), श्री. आनंद भुसारी उपकार्यकारी अधिकारी( रासेयो), डॉ. प्रदिप थोरात, डॉ. निखील सोळंके, डॉ. प्रिती ठाकूर, डॉ. नितीन सुरडकर, डॉ. रोजी वाघमारे, डॉ. जगदीश सांगळे व श्री. भुषण जगताप यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनि प्रिया कराळे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रदिप थोरात व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा विध्यार्थी पूर्वेश हिवसे यांनी केले. महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे “कृषि दिन” साजरा.
04/07/2022

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे “कृषि दिन” साजरा.

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे “कृषि दिन” साजरा   अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्या...
04/07/2022

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे “कृषि दिन” साजरा

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) अंतर्गत यवतमाळ येथे दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजना द्वारा कृषी क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्य “कृषिदिन” साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने, प्रमुख मार्गदर्शक तथा सत्कारमूर्ती उमरखेड येथील शेतीमित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.अशोकराव वानखेडे तसेच यवतमाळ येथील प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन.डी.पार्लावार, यवतमाळ येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार आणि कृषि संशोधन केंद्र यवतमाळ येथील प्रभारी अधिकारी डॉ. आशुतोष एस. लाटकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
कृषि दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील संयुक्त कुटुंब संस्कृती सोबतच शेतीशी आपली नाळ जोपासत असलेले राष्ट्रीय कृषी पुरस्कार प्राप्त प्रगतीशील शेतकरी श्री. अशोकराव वानखेडे यांचा महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या हस्ते शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
श्री. वानखेडे यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देतांना, सन १९७२ साली भारत देशात अन्न धान्याचा तुटवडा निर्माण झाला असता हरितक्रांती घडविणारे *कृषि संत* असे गौरवोद्गार काढले. तसेच कै.वसंतराव नाईक यांनी सदैव कटिबद्ध राहून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय कसे घेतले, शेतकरी कारखानदार व्हावा, शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध कृषियोजना तसेच पंचायत राज इत्यादी योजना राबवून शेतकरी वर्गाची कश्यापद्धतीने विकासाकडे वाटचाल घडवून आणली याविषयी मार्गदर्शन केले.
सहकार क्षेत्रामार्फत शेतकऱ्यांना शेतीविषयक कर्ज सुविधा, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला मिळावा याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना, कापूस एकाधिकार योजना, शेतीला पाण्याची उपलब्धता निर्माण करण्याकरिता पाझर तलाव, वसंत बंधारा इत्यादींची निर्मिती केली. असे प्रतिपादन डॉ. एन.डी.पार्लावार यांनी केले.
थोर महापुरुषांच्या जयंती निमित्य त्यांचे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारणे गरजेचे आहे. आज जयंती दिनी संकल्प करूया असे प्रतिपादन डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले.
कै. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती सोबतच श्वेतक्रांती करून संपूर्ण देश सुजलाम सुफलाम केला. तसेच महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक रचनेनुसार विविध भागात चार कृषी विद्यापीठाची स्थापना, विदर्भातील पहिला वसंत सहकारी साखर कारखाना व सूतगिरणी ची निर्मिती केली. अन्न तंत्रज्ञान च्या विध्यार्थ्यानी गुणवत्तेला महत्व देवून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला देण्याकरिता विविध संशोधन व तंत्रज्ञानाच्या सानिध्याने विषमुक्त आणि गुणवत्तापूर्ण प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्माण करण्याकरिता प्रयत्न करावा हीच खऱ्या अर्थाने कै. वसंतराव नाईक यांना आदरांजली ठरेल असे अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयराव माने यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी रोशनी कोंबे व यश वालदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भारताच्या स्वतंत्र महोत्सवी वर्षांत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. जयश्री उघाडे कार्यक्रम अधिकारी( रासेयो), श्री. आनंद भुसारी उपकार्यकारी अधिकारी( रासेयो), डॉ. निखील सोळंके, डॉ. प्रिती ठाकूर, डॉ. प्रदिप थोरात, डॉ. नितीन सुरडकर, डॉ. रोजी वाघमारे, डॉ. जगदीश सांगळे व श्री. भुषण जगताप यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनि प्रिया कराळे व साक्षी डोंगे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन सुरडकर व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचा विध्यार्थी पूर्वेश हिवसे यांनी केले. महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे *जागतिक योग दिन* संपन्न.                                                       ...
23/06/2022

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ येथे *जागतिक योग दिन* संपन्न.
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित “जागतिक योग दिन” दिनांक २१ जुन व २२ जुन २०२२ रोजी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ व विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रमोद यादगिरवार प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग तथा सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ व अड. राजश्री ठाकरे, प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
योग क्रियेद्वारे विध्यार्थ्यांमध्ये बौद्धिक पातळी सोबतच भावनात्मक समतोल राखण्यास मदत होते. विध्यार्थ्यांना अपयश आल्यावर सुद्धा भावनिक समतोल राखून त्या परिस्थितीवर मात करण्याकरिता सकारात्मक भावना ह्या योग क्रियेतून वृद्धिंगत होण्यास मदत होणारे योग, त्याचे प्रात्यक्षिके व त्याबाबतची माहिती डॉ. प्रमोद यादगिरवार व अड. राजश्री ठाकरे यांनी विध्यार्थ्यांना दिली.
मानवी जीवनात योगासनाचे व पोषक आहाराचे महत्व विषद करताना “अन्न हे पूर्णब्रम्ह” कसे? याविषयी अध्यक्षीय भाषणात डॉ. विजयराव माने यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यामार्फत अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत हर्बल ज्यूस पेय सशुल्क उपलब्ध करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भारताचा स्वतंत्र महोत्सवी वर्ष्यात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. जयश्री उघाडे कार्यक्रम अधिकारी, रासेयो, श्री. आनंद भुसारी उपकार्यकारी अधिकारी, रासेयो, डॉ. नितीन सुरडकर, डॉ. निखील सोळंके, डॉ. प्रिती ठाकूर, डॉ. प्रदिप थोरात, डॉ. रोजी वाघमारे, डॉ. जगदीश सांगळे व श्री. भुषण जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आनंद भुसारी व आभार प्रदर्शन डॉ. नितीन सुरडकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचा विद्यार्थि तुषार खेडकर याने केले. महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न.

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित “...
07/06/2022

अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित “जागतिक अन्न सुरक्षा दिन” दिनांक ०७ जुन २०२२ रोजी साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जयश्री उघाडे, प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. एन.डी. पार्लावर तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग , यवतमाळ श्री. कृष्णराव जयपूरकर व महाविद्यालयाच्या सहायक कुलसचिव कु. स्वाती बा. सोळंके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी आयुष कुमार, साफिया खान, रोहन राठोड, विशाखा हिवाळे, दर्शना एकलारे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थि कु. सुकन्या अडकीने व प्रथमेश महांगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन यश वालदे यानी केले. महाविद्यालयाचे अधिकारी-कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ आज दिनांक 5 जुन2022 रोजी जागतीक पर्यावरण द...
07/06/2022

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ आज दिनांक 5 जुन2022 रोजी जागतीक पर्यावरण दिवसा निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी यांनी यवतमाळ येथील बस स्टँड ची साफसफाई प्लॅस्टिक पिशवी, पाणी खाली बॉटल, कागद याची पुर्ण साफसफाई केली, व बस स्टँड ते दत्त चौक पायदळ रॅली काढण्यात आली यात पर्यावरण समधीत स्लोग्न फलक तयार करून जण जागृती अभियान राबविण्यात आले भाजी मंडी दत्त चौक येथे भाजी विक्रेते, ग्राहक यांना कापडी पिशवी चे वाटप करून त्यांना पर्यावरणा विषयी प्लॅस्टिक पिशवी का वापरूनये बद्धल ची माहिती विद्यार्थी, व प्राध्यापक यांनी समजाऊन सांगितली या साठी महाविद्यालया ची शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जयश्री उघाडे मॅडम, डॉ. निखिल सोळंके सर, आनंद भुसारी सर,एस टी डेपो नियंत्रण अधिकारी मॅडम सर्व विद्यार्थ्यां उपस्तीत होते.

 -2022         The fifth edition, Pariksha Pe Charcha 2022 has begun with the prime minister Narendra Modi interacting w...
02/04/2022

-2022

The fifth edition, Pariksha Pe Charcha 2022 has begun with the prime minister Narendra Modi interacting with students, teachers and parents on handling board exam stress. Pariksha Pe Charcha 2022 is conducted by the department of school education and literacy, ministry of education. Pariksha Pe Charcha 2022 date and time are April 1 and 11 am. The venue is Talkatora Stadium, New Delhi.
COLLEGE OF FOOD TECHNOLOGY, YAVATMAL Affiliated to Dr. PANJABRAO DESHAMUKH KRISHI VIDYAPEETH, AKOLA, attending a live session of -2022 with Hon’ble Prime Minister Narendra Modi to be held on 1st April.
We are attending the -2022 in the Presence of our Associate Dean Hon'ble Dr. Vijayrao P. Mane sir, Dr. Jayashree D. Ughade, Ms. S. B. Solanke and Staff members and Students were present to attained the live session on .

Date:- 01 April 2022
Place:- COLLEGE OF FOOD TECHNOLOGY, YAVATMAL.

  of Food Technology, Yavatmal Celebrate "World Consumer Rights Day" with enthusiasm. #"World Consumer Rights Day" was c...
16/03/2022

of Food Technology, Yavatmal
Celebrate "World Consumer Rights Day" with enthusiasm.

#"World Consumer Rights Day" was celebrated on 15th March, 2022 at College of Food Technology, Yavatmal affiliated to Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola. The program was presided over by our Associate Dean Hon'ble Dr. Vijayrao Mane, President of All India Consumer Panchayat Vidarbha Province, who was the chief guide Narayan Govind Mehre and also Assistant Commissioner, Food and Drug Administration Yavatmal Shri. Dr. Krishnarao Rangarao Jaipurkar was the chief guest. Shekhar Bund Taluka Secretary Consumer Panchayat Yavatmal, Shri. Vipul Pobaru Taluka Treasurer Consumer Panchayat Yavatmal, Shri. Gopal Mahure Food Safety Officer Yavatmal, Dr. Jayashree Ughade, Executive Officer NSS, Shri. Anand Bhusari Deputy Program Officer NSS and Ms. S. B. Solanke Assistant Registrar CFT, Yavatmal , and all staff members and Students were present on the occasion.
Date:- 15 March 2022.
Place:- College of Food Technology, Yavatmal.

Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur organized a "Entrepreneurship Development Training Program: A...
16/03/2022

Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur organized a "Entrepreneurship Development Training Program: Animal Husbandry and Dairy Business" at College of Food Technology, Yavatmal

Date:- 10 March 2022
Place:- College of Food Technology, Yavatmal, Maharashtra

Address

Yavatmal
445001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when College of Food Technology, Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share