Datey College

Datey College Babaji Datey Arts And Commerce College, Yavatmal. Previously known as Vanijya Mahavidyalaya, Yavatma and Date College. Address:

Note: Datey college is named after late Shri Babaji Datey. Correct spelling is "Datey College". It sometimes is mispelled as 'Date College'

यवतमाळ येथे जिल्हास्तरीय उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे आयोजनयवतमाळ, दि. ९ मे २०२६ :संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्य...
09/05/2026

यवतमाळ येथे जिल्हास्तरीय उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे आयोजन
यवतमाळ, दि. ९ मे २०२६ :
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग तथा दाते कॉलेज, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय “उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष” कार्यक्रमाचे आयोजन दाते कॉलेज, यवतमाळ येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु हे होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या कल्पनेतून आणि विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक प्रा. डॉ.राजीव बोरकर यांच्या प्रयत्नातून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे, असे उद्गार प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. त्यांनी वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, आरोग्य विषयक जनजागृती तसेच मदत कक्षाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. सावित्री ज्योती समाजकार्य महाविद्यालयाचे तथा समिती सदस्य प्रा. डॉ. विक्रांत जाधव यांनी सुद्धा यावेळी उपस्थितांना येथोचीत मार्गदर्शन केले. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे संयोजक प्रा. डॉ. प्रशांत बागडे यांनी केले .
यावेळी जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. वानखेडे , आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. रुपेश कुऱ्हेकर , विद्याभवन महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. अनुप शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना, पुरेसे पाणी पिणे, उन्हात बाहेर पडताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महाविद्यालयात उष्माघात कक्षाचे उद्घाटन व तेथील सुविधांची पाहणी मान्यवरांनी केली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण अशा वातावरणात दाते कॉलेज येथे या जिल्हास्तरीय उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे उद्घाटन पार पडले.

दाते कॉलेज यवतमाळ येथे दिनांक 23 / 4 /26 रोजी बिः .ए भाग 2 मेजर विषया करिता  गृह अर्थशास्त्र विभागामार्फत 'पाणी परीक्षण ...
22/04/2026

दाते कॉलेज यवतमाळ येथे दिनांक 23 / 4 /26 रोजी बिः .ए भाग 2 मेजर विषया करिता गृह अर्थशास्त्र विभागामार्फत 'पाणी परीक्षण ' या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा . हेमा गुल्हाने यांनी विद्यार्थिनींना पाणी परीक्षणाचा हेतू समजून सांगितला व सदर कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले हे देखील सविस्तर सांगितले . कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रा . डॉ .यशवंत राठोड यांनी विद्यार्थिनींना पाण्याचे स्रोत ,
पाण्याचे प्रकार त्याचे परीक्षण कसे करायचे याविषयी सविस्तर माहिती देऊन कोणते पाणी चांगले व कोणते पाणी क्षारयुक्त त्याचे परीक्षण करून दाखवले . तसेच मंचावर उपस्थित असलेल्या प्रा . डॉ . शैलजा माथने यांनी देखील विद्यार्थिनींना पाण्याची सविस्तर माहिती देऊन कोणत्या कोणत्या केमिकल द्वारे पाणी परीक्षण केले जाते हे सविस्तर सांगितले व पाण्याची बचत करावी असा मुलाचा सल्लाही दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना पाणी परीक्षण करताना घ्यावयाची काळजी व रोजच्या आहारा मध्ये पाण्याची असलेली भूमिका समजून सांगितली पाण्याच्या नैसर्गिक श्रोतात पाणी कसे शुद्ध असते हे देखील सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. सुहानी राठोड तर आभार प्रदर्शन कु.पूनम खरतडे ह्यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता बी .ए भाग दोन गृहअर्थशास्त्र मेजर च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .

दाते कॉलेज यवतमाळ येथील गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थिनींना स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत फुलांच्या दुकानाला भेट व...
17/04/2026

दाते कॉलेज यवतमाळ येथील गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गत विद्यार्थिनींना स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत फुलांच्या दुकानाला भेट व पुष्पगुच्छ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि . 17 / 4 /25 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . राजेश शिंगरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले .गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना स्किल डेव्हलपमेंट साठी फुल शेती व फुलांपासून विविध पुष्पगुच्छ तयार करून अर्थार्जण कसे करायचे याचे सविस्तर मार्गदर्शन केले . प्रा . हेमा गुल्हाने यांनी विद्यार्थिनींना फुल व्यवसाय हा आधुनिक व्यवसाय असून याला अर्थार्धनाचे स्वरूप देण्यासाठी नवनवीन पद्धती कशा अवलंबव्या याची माहिती दिली तर प्रा . सीमा खापरे यांनी विद्यार्थिनींना फुलशेती व आर्टिफिशियल फुलांपासून बुके तयार करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा कसा कमवावा याविषयी सांगितले .,श्रीकृष्ण पुष्प मंदिरचे संचालक मुरलीधर शिंगोटे यांनी विद्यार्थिनींना वेगवेगळ्या फुलांपासून पुष्पगुच्छ कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण दिले .तसेच आजकालच्या काळामध्ये बदलती पुष्परचना कशी करायची व त्याला आकर्षित करण्यासाठी कोणते कोणते सामान वापरायचे हे प्रात्यक्षिकातून दाखविले .यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः पुष्पगुच्छ तयार करून आनंद घेतला .कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गृह अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले .

दाते कॉलेज यवतमाळ येथे दिनांक 2/4/26 रोजी गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गतआधुनिक काळातील पालकांसमोर असलेले आव्हाने या गेस्ट...
17/04/2026

दाते कॉलेज यवतमाळ येथे दिनांक 2/4/26 रोजी गृह अर्थशास्त्र विभागाअंतर्गतआधुनिक काळातील पालकांसमोर असलेले आव्हाने या गेस्ट लेक्चरचेआयोजन प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू याच्या मार्गदर्शनात करण्यात आले. गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थीनींना पालक बालक संबंधाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या प्रा .डॉ. विभा घोडखंडे यांनी विद्यार्थिनींना बालकांच्या समस्येंचा पालकांवर कोणता परिणाम होतो व पालकांच्या अपेक्षांचा बालक कशा प्रकारे विचार करतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच दुसऱ्या मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या प्रा . डॉ . मीनाक्षी कांबळे यांनी आधुनिक काळामध्ये पालकांना नवनवीन आव्हाने कोणती पेलावी लागतात व त्याचा सामना कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले व घरातील प्रत्येक व्यक्तींचा एकमेकांवर एकमेकांच्या वागण्यावर कसा परिणाम होतो हे देखील सविस्तर सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . सीमा खापरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा . हेमा गुल्हाने यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गृह अर्थशास्त्राच्या संपूर्ण विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

एम.ए. भाग २ राज्यशास्त्र विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्नदाते कॉलेज मध्ये राज्यशास्त्र विभागातर्फे एम.ए. (रा...
17/04/2026

एम.ए. भाग २ राज्यशास्त्र विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

दाते कॉलेज मध्ये राज्यशास्त्र विभागातर्फे एम.ए. (राज्यशास्त्र ) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन दिनांक 17 एप्रील 2026 रोजी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल यांनी आपले प्रास्ताविकपर भाषण करतांना सर्वप्रथम चालू वर्षातील विभागाच्या उपलब्धी आणि कामगिरीचा आढावा दिला. सोबतच एम.ए. च्या विद्यार्थ्यांसोबत असलेल्या स्मृतींचा उजाळा दिला आणि विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी झळकतील असा आशावाद व्यक्त केला व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
एम.ए. राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद गजभिये यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की निरोप म्हणजे शेवट नसतो ती सुरुवात असते, तुम्ही अध्ययन केलेल्या ज्ञानाचा उपयोग आता तुम्हाला करायचा आहे असे सांगितले व सर्वांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना रोहन गायकवाड, साक्षी माकोडे, माधवी वावरे या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील मागील दोन वर्षातील आठवणी व अविस्मरणीय क्षण यांचा उजाळा दिला व महाविद्यालयाचा प्रवास संपला असला तरी महाविद्यालयाची नाळ तुटणार नाही याची हमी दिली. शिकवलेल्या ज्ञानाचा नक्कीच जीवनात उपयोग करू असा आशावाद सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी राज्यशास्त्र विभागाचा Vibrant विभाग असा उल्लेख केला व राज्यशास्त्र विभागाच्या कृतिशीलतेचे कौतुक केले. सोबतच त्यांची राज्यशास्त्र विषयाशी असलेली नाळ ही विद्यार्थ्यांना सांगितली व शिकवणे हे शिक्षकांचे कर्तव्य राहते पण कोणते कसे घेते यावर यशस्विता अवलंबून राहते असे सांगितले व विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेश सिंगरू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात वावरतांना आपण आपल्याला सहकार्य करणाऱ्या बरोबरच जे आपले निंदक असतात त्यांनाही कृतज्ञ राहिले पाहिजे असा विद्यार्थ्यांना संदेश दिला व पुढील आयुष्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनाली ठाकरे तर आभार प्रदर्शन अमय मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राज्यशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सुंदर अशी सांगता केली.

दाते कॉलेज यवतमाळ येथे गृह  अर्थशास्त्र विभाग अंतर्गत आरोग्य विज्ञान व आहार उपचार या विषयावर सेमिनार चे आयोजन दि. 2/4 /2...
16/04/2026

दाते कॉलेज यवतमाळ येथे गृह अर्थशास्त्र विभाग अंतर्गत आरोग्य विज्ञान व आहार उपचार या विषयावर सेमिनार चे आयोजन दि. 2/4 /26 रोजी प्राचार्य डॉ . राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले . बी.ए भाग २ सेम ४ अंतर्गत मेजर विषयासाठी 'आरोग्य विज्ञान व आहार उपचार ' या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले . गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना आहार उपचार म्हणजे काय सांगून आहार उपचार करताना कोणती काळजी घ्यावी हे सविस्तर सांगितले . व सेमिनारसाठी शुभेच्छा दिल्या प्रा . हेमा गुल्हाने यांनी विद्यार्थिनींना सेमिनार घेण्यामागचा उद्देश सांगून अभ्यासक्रमां अंतर्गत येत असलेल्या सर्व मुद्द्यांचे अवलोकन केले .प्रा. सिमा खापरे यांनी विद्यार्थिनींना आहार उपचारांमध्ये पारंपारिक उपचार कसे केल्या जातात हे सांगून रानभाज्यांचे महत्त्व पटवून दिले . यावेळी एकूण 40 विद्यार्थिनींनी आहारशास्त्र ,आहार उपचार, वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या पारंपारिक रेसिपी , पदार्थ बनवण्याचे बदलते स्वरूप, आवड निवड , अशा असंख्य विषयावर सेमिनार देऊन विषय विद्यार्थिनी समोर उलगडून दाखवला . यावेळी सूत्रसंचालन कु.पायल सुरपाम हिने तर आभार प्रदर्शन कु.सुहानी राठोड हिने केले . सेमिनारच्या यशस्वीते करिता संपूर्ण गृह अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले .

16/04/2026
दाते कॉलेजमध्ये 'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान २०२५' विषयावर  चर्चासत्राचे आयोजनदिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी दाते  कॉलेज, यवत...
09/04/2026

दाते कॉलेजमध्ये 'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान २०२५' विषयावर चर्चासत्राचे आयोजन

दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी दाते कॉलेज, यवतमाळ आणि भारतीय शिक्षण मंडळ, विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे (Symposium) आयोजन महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आले होते. 'विकसित भारत @२०४७' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आणि 'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक, २०२५' मधील विविध तरतुदींवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आखण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११:०० वाजता उद्घाटन सत्राने झाली, ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी अधिष्ठाता डॉ. अशोक पावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट, यवतमाळ चे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी भूषवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु, उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल आणि कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन तेलखडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

या परिसंवादाच्या मुख्य सत्रात श्री अशोक पावडे यांनी प्रस्तावित विधेयकाचे तांत्रिक आणि धोरणात्मक विश्लेषण केले. भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत बदल घडवून आणण्यासाठी या विधेयकाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. चर्चेदरम्यान प्रामुख्याने शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता, पारदर्शक शासन व्यवस्था आणि उत्तरदायित्व यांमधील समतोल राखण्यावर भर देण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात या विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेला कृती आराखडा आणि संभाव्य धोके यावर सविस्तर ऊहापोह झाला. यानंतर उपस्थितांनी वक्त्यांना या विधेयकावर विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरासरण केले. या चर्चासत्राला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्राचार्य उपस्थित होते. यानंतर सर्वांना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आले. चर्चासत्राच्या शेवटी महाविद्यालयाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी या विधेयकाची आवश्यकता का आहे हे समजून सांगितले. उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल राठोड यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन तेलखडे यांनी आभार मानले.

🙏🏻*Invitation* 🙏🏻*Symposium on Viksit Bharat Shiksha Adhisthan*Greetings!*Datey College, Yavatmal & Bhartiya Shikshan Ma...
07/04/2026

🙏🏻*Invitation* 🙏🏻

*Symposium on Viksit Bharat Shiksha Adhisthan*

Greetings!

*Datey College, Yavatmal & Bhartiya Shikshan Mandal, Vidarbha Prant*

cordially invite you to a Symposium focused on the Viksit Bharat Shiksha Adhisthan Bill, 2025.

Join us as we deliberate on the future of India's education ecosystem and contribute to strengthening this landmark legislation.

🗓 Date: 08 April, 2026
📍 Venue: Datey College, Shivaji Nagar, Yavatmal - 445001

🟣Program Schedule:
🔹 Session I (Inaugural): 11:00 AM – 12:00 PM
🔹 Session II: 12:15 PM – 01:30 PM

👤 *Guest of Honour: Dr. Ashok Pawade (Former Dean)*
👤Dr. Rajesh Singru (Principal)
👤 Dr. T. K. Kanthale (Vice-Principal)

Coordinator -
Dr. Sachin Telkhade
(Mob. 8275217282)

🟣Why Attend?
Critically examine the new institutional and regulatory framework.
Contribute evidence-based policy inputs for NEP 2020 alignment.
Engage in consultative dialogue with experts and stakeholders.

🙏🏻We look forward to your presence and valuable insights!

दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दाते महाविद्यालयामध्ये (राष्ट्रीय छात्र सेना) अर्थात एनसीसी ची "बी" व "सी" सर्टिफिकेटची परीक्ष...
27/03/2026

दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दाते महाविद्यालयामध्ये (राष्ट्रीय छात्र सेना) अर्थात एनसीसी ची "बी" व "सी" सर्टिफिकेटची परीक्षा पार पडली. या परीक्षेला संरक्षण मंत्रालयाद्वारे जळगाव बटालियनचे कर्नल धीरज मिनोत्रा तसेच 47 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुप नायर व संपूर्ण आर्मी स्टाफ उपस्थित होते. या परीक्षेला जिल्ह्यातील सर्व एनसीसी महाविद्यालयातील जवळपास ३०० विद्यार्थी (कॅडेड्स) उपस्थित होते. या परीक्षेचे आयोजन महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील ऑफिसर कॅप्टन प्रशांत बागडे यांनी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनात नियोजित केली व परीक्षा यशस्वीपणे संपन्न झाली.

Address

Shivaji Nagar
Yavatmal
445002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Datey College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Datey College:

Share