YCM College. Ambajogai

YCM College. Ambajogai YCM College Ambajogai

प्रा. अनंत कांबळे {सर} यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂💐
20/02/2026

प्रा. अनंत कांबळे {सर} यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂💐

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राज्यस्तरीय सामान्य ज्ञानस्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद...१७० हुन अधिक विद्या...
18/02/2026

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राज्यस्तरीय सामान्य ज्ञानस्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद...

१७० हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग...

गिऱ्हे शीतल संजीव हिने शंभरपैकी ९४ गुण घेत प्राप्त केला प्रथम क्रमांक...

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ वार, गुरुवार रोजी राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा,तयारी व्हावी, व पुढील काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच अंबाजोगाई शहरातील विविध महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या परीक्षेमध्ये एकूण १७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोलीस भरती, तलाठी भरती परीक्षेवर आधारित अभ्यासक्रम ठेवण्यात आला होता.
या परीक्षेत अनुक्रमे गिऱ्हे शीतल संजीव- ९४ प्रथम, केकाण सोमनाथ - ८९ द्वितीय, बहिरवाल नितीन बाबा - ८७ तृतीय, देशमुख अतुल रवींद्र -८७ तृतीय तर ८६ गुण मिळवून उत्तेजनार्थ पारितोषिके जाधव लोचना साहेबराव, हंगे प्रियंका काशिनाथ, सुरनर मिनिनाथ कैलास, खंदाडे निवृत्ती दासू, सानप सचिन विश्वंभर, चोले ज्ञानेश्वरी मदन, गिरी विजय रामानंद या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रा. प्रताप जाधव, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. दिलीप भिसे, प्रा. महेश गोरे, प्रा.प्रकाश लोखंडे, प्रा.रोहित पाटील, प्रा. शुभम बालूरे प्रा.संजय जाधव, प्रा.संकेत हंडीबाग, प्रा.बाबासाहेब माने इतर सर्व प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी सूर्यकांत घाडगे राम सरवदे यांच्या सहकार्यातून संपन्न झाली. सोबतच श्री. दत्ता दराडे, श्री. दिनेश पवार यांचे ही विशेष सहकार्य लाभले.

BA BCOM & BSC APRIL 2026 EXAM FEES SUBMISSION NOTICE.
31/01/2026

BA BCOM & BSC APRIL 2026 EXAM FEES SUBMISSION NOTICE.

प्रा. डॉ. इंद्रजीत भगतविभाग प्रमुख,वाणिज्य व व्यवस्थापन विभाग,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई,यांना वाढदिवसाच्या ह...
06/03/2025

प्रा. डॉ. इंद्रजीत भगत
विभाग प्रमुख,
वाणिज्य व व्यवस्थापन विभाग,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई,
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

.

यश उद्योग समूहाच्या विविध प्रकल्पांना भेटी देत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.अंबाजोगाई येथील यशवंतर...
05/10/2024

यश उद्योग समूहाच्या विविध प्रकल्पांना भेटी देत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.

अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची शैक्षणिक वर्ष २०२४.२५ अंतर्गत शैक्षणिक अभ्यास सहल दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच सभोवतालचे कौशल्यपूर्ण उपक्रम, निसर्ग स्थळे, ऐतिहासिक किल्ले वास्तू यांना भेटी देऊन येथील कार्याचे स्वरूप अथवा ऐतिहासिक माहिती समजून यावी, या हेतूने अशा सहलीचे आयोजन करण्यात येते. प्रारंभी महाविद्यालय विकास समिती सदस्य माणिकराव बावणे, प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे यांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. ही अभ्यास सहल अंबाजोगाई पासून जवळ असलेल्या दगडवाडी येथील निसर्गरम्य परिसरात कार्यान्वित असलेल्या यश उद्योग समूहाला भेट देत येथील सिमेंट काँक्रिट मटेरिअल निर्मिती, डांबरीकरण मटेरिअल, सीताफळ अर्क निर्मिती, वीज निर्मिती प्रकल्प,नव्याने उभारण्यात येत असलेला दुग्ध निर्मिती प्रकल्प, येथील नियोजनबद्ध आंबा व सीताफळ लागवड, त्यासाठीची पाणी व ठिबक सिंचन व्यवस्था या सर्वांचे सूचना पाहणी करत विद्यार्थ्यांनी सर्व कार्य समजावून घेतले. यासाठी यश उद्योगाचे प्रमुख प्रदीप ठोंबरे, गणेश जाधव, भागवत जाधव, सी.ए.प्रवीण भिसे, यांनी या अभ्यास सहलीसाठी सहकार्य केले. त्या त्या प्रकल्पाचे संचालक यांनी सविस्तर माहिती देत प्रकल्पाचे कार्य समजावून सांगितले. या अभ्यास सहलीमध्ये एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या अभ्यास सहलीस डॉ दिलीप भिसे (सहल प्रमुख) डॉ. मुकुंद राजपंखे (अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाचे प्रमुख), डॉ. ईंद्रजीत भगत (वाणिज्य विभाग प्रमुख), डॉ. दीपक भारती, प्रा डॉ अहिल्या बरुरे, प्रा डॉ अरविंद घोडके, डॉ अनंत मरकाळे, प्रा. मनोरमा पवार, प्रा.ए.डी.राठोड,डॉ. दत्ता मोरे, प्रा डिगांबर व्हंडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

 #शालेय_शिक्षणातील_गुरु_आदरणीय_इंद्रजीत_भगत_सर_आपणास_वाढदिवसाच्या_हार्दिक_हार्दिक_शुभेच्छा # 🎊🎊🎊🎂🎂🎂🎂
06/03/2024

#शालेय_शिक्षणातील_गुरु_आदरणीय_इंद्रजीत_भगत_सर_आपणास_वाढदिवसाच्या_हार्दिक_हार्दिक_शुभेच्छा # 🎊🎊🎊🎂🎂🎂🎂

30/09/2023

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई
राष्ट्रीय सेवा योजना विभाग (N.S.S.)

दिनांक ३०.०९.२०२३
सूचना
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, मा. प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार दि. ०१.१०.२०२३ रोजी सकळी १०.०० वाजता पासून एक तास स्वच्छताही सेवा अंतर्गत राज्यभरात स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रम करण्याचे अभिप्रत आहे. त्यानुसार आपल्या महाविद्यालयात स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान या कार्यक्रमास उपस्थित राहावे. ..

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की BA, Bcom & BSc प्रथम  वर्ष प्रथम सत्र (I sem Regular Exam Fees ) नियमित परीक्...
25/09/2023

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की BA, Bcom & BSc प्रथम वर्ष प्रथम सत्र (I sem Regular Exam Fees ) नियमित परीक्षा फीस 27 तारखेपर्यंत भरून घ्यायची आहे. नंतर परीक्षा फीस भरता येणार नाही. याची नोंद सर्वानी घ्यावी..

25/09/2023
आपल्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ इंद्रजीत भगत हे नेहमीच विद्यार्थ्यांना सहकार्य करतात त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील अ...
07/09/2023

आपल्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ इंद्रजीत भगत हे नेहमीच विद्यार्थ्यांना सहकार्य करतात त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतात.
शिक्षक दिनी 5 सप्टेंबर 2023 रोजी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सरांना सर्व विद्यार्थ्यांकडून खूप खूप शुभेच्छा....🌹💐💐

सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन भरून घ्यावे. संपर्क: 7972126664
31/12/2021

सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाईन भरून घ्यावे. संपर्क: 7972126664

Address

Ambajogai
431517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YCM College. Ambajogai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to YCM College. Ambajogai:

Share